भाजप आमदार सुरेश धस यांनी बीडमध्ये माध्यमांशी बोलताना अभिनेत्री प्राजक्ता माळीसह सपना चौधरी आणि रश्मिका मंदाना यांच्या नावाचा वादग्रस्त उल्लेख केल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. या प्रकरणानंतर अभिनेत्री प्राजक्ता माळीने तीव्र संताप व्यक्त केला असून, धस यांच्याविरोधात महिला आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. बीडमध्ये बोलताना सुरेश धस यांनी, “मला जर इव्हेंट मॅनेजमेंट दिले, तर मी नाचायला प्राजक्ता माळी, सपना चौधरी, रश्मिका मंदाना यांना बोलवेन” असे वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. सोशल मीडियावर या सर्व प्रकरणी एकच गदारोळ झाला. या प्रकरणी प्राजक्ताच्या प्रतिक्रियेची सर्वजण वाट पाहत होते यावर आता स्वत: प्राजक्ता माळीने पत्रकार परिषद घेत तिची प्रतिक्रिया दिली आहे. (prajakta mali on suresh dhas controversial statement)
प्राजक्ता माळीने पत्रकार परिषद घेत असं म्हटलं आहे की, “गेल्या दिड महिन्यांपासून हा सगळा प्रकार सुरु आहे. गेले दिड महिने अत्यंत शांतपणे मी या सगळ्याला सामोरी गेली आहे. माझी शांतता म्हणजे माझी मुकसंमती नाही आहे. मी, माझ्यासारख्या अनेक महिला कलाकार या सगळ्यांची ही हतबलता आहे. एक व्यक्ती कुठल्या तरी रागाच्या भरात बरळून जाते आणि त्यानंतर हजारो व्हिडीओ बनतात. एकमेकांना उत्तर देण्यामध्ये चिखलफेक होत राहते. महिलांची अब्रु निघते. या संपूर्ण प्रकारात सगळ्यांचं मनोरंजन होतं”.
आणखी वाचा – उर्मिला कोठारेच्या गाडीची दोन मजुरांना धडक, एकाचा दुर्दैवी मृत्यू, नेमकं काय झालं?
यापुढे ती म्हणाली की, “काल जर लोकप्रतिनिधींनी माझ्यावर टिपण्णी केली नसती तर मी शांत बसले असते. कधीच या विषयावर येऊन बोलले नसते. पण त्यांनी वक्तव्य केल्यामुळे मला तुम्हा सगळ्यांसमोर यावं लागलं. माझा सुरेश धस यांना साधा प्रश्न आहे की, तुम्ही राजकारणी आणि आम्ही कलाकार आहोत. राजकारण्यांमध्ये तुम्ही एकमेकांवर कुरघोडी करता. पण या सगळ्यात तुम्ही कलाकारांना का खेचता? आम्हा कलाकारांचा यामध्ये काय संबंध? बीडमध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला आहे. त्याबाबत बोलत असताना कलाकारांवर गाडी का घसरते?”
यापुढे अभिनेत्री म्हणाली की, “इव्हेंट मॅनेजमेंटचंही काहीतरी मुद्दा ते बोलत होते. पण परळीला कोणच कधी पुरुष कलाकार कार्यक्रमाला गेले नाहीत का?. त्यांची नावं का नाही येत? अतिशय संघर्ष करत, छोट्या कुटुंबातून महिला येऊन आपलं नाव कमावतात, मोठ्या होतात त्यांची प्रतिमा असं बोलून डागाळतात. हे कितपत योग्य आहे?”. त्यामुळे एकाअ महिलेबद्दल वक्तव्य करताना पुरुष कलाकार दिसत नाहीत का? असं म्हणत प्राजक्ताने सुरेश यांना थेट सवाल केला आहे.