‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाने आजवर रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. जगभरात या विनोदी कार्यक्रमाचे लाखो दिवाने चाहते आहेत. आजवर या कार्यक्रमाने अनेक नवोदित कलावंतांना प्लॅटफॉर्म देत खूप मोठी संधी दिली आहे. ही कलाकार मंडळी त्यांच्या कलेच्या जोरावर प्रेक्षकांची मन जोपासताना दिसत आहेत. असाच एक कलाकार म्हणजे अभिनेता रोहित माने. रोहित मानेने आजवर स्वमहेनतीच्या जोरावर स्वतःचे असे स्थान निर्माण केले आहे. ‘साताऱ्याचा विनोदी तारा’, ‘देशी हॉटनेस’ अशा अनेक बिरुदांनी लोकप्रिय असा हा अभिनेता सिनेसृष्टीत त्याच नशीब आजमावत आहे. (Rohit Mane New Home)
प्रेक्षकांच्या या लाडक्या अभिनेत्याने काही दिवसांपूर्वीच मुंबईत नवं घर घेतलं. मुंबईत घर घेण्याचं स्वप्न हे बऱ्याच कलाकारांचं असतं. असंच स्वप्न अभिनेता रोहित माने यानेदेखील पाहिलं आणि पूर्ण केलं आहे. नवीन घर घेण्याचे स्वप्न पूर्ण करत रोहित मानेने त्याच्या नवीन घराची माहिती सोशल मीडियावर शेअर केली होती. रोहितने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे एक खास व्हिडीओ शेअर करत घराची झलकही दाखवली.
आणखी वाचा – तन्वी-अर्जुन निघाले अलिबागला, सायलीचा होत आहे जळफळाट, पुढे काय घडणार?
यानंतर आता रोहितने त्याच्या या नव्या घराची झलक शेअर करत एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. ‘सुख कळले’ असं कॅप्शन देत त्यांनी नव्या घराचा गृह्प्रवेशाचा सुंदर असा व्हिडीओ इन्स्टाग्राम अकाउंटवरुन शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये अभिनेता बायकोसह पूजा करत असल्याचं पाहायला मिळत आहे. रोहित त्याच्या कुटुंबीयांच्या उपस्थितीत नव्या घरात प्रवेश करत असल्याचं दिसत आहे. यावेळी दोघांचा पारंपरिक अंदाज पाहायला मिळत आहे.
रोहित मानेचं हे मुंबईतलं हे पहिलं घर आहे. नव्या घराची पहिली किल्ली शेअर करत त्याने नवं घर घेतल्याची बातमी चाहत्यांसह शेअर केली होती. यानंतर आता अभिनेत्याने थेट गृहप्रवेश पूजेचा व्हिडीओ शेअर केला आहे. रोहितच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कमेंट करत त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. तर प्रियदर्शिनी इंदलकर, सौरभ चौघुले, वनिता खरात, प्रथमेश परब या कलाकार मंडळींनी व्हिडीओवर कमेंट्स करत रोहितचं कौतुक केलं आहे.