बुधवार, जून 3, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

चुलीचे पूजन, होमहवन अन्…; ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील सावत्याचं असं आहे नवं घर, व्हिडीओद्वारे दाखवली झलक, बायकोसह पूजा करताना दिसला

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जुलै 19, 2024 | 11:08 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Rohit Mane New Home

चुलीचे पूजन, होमहवन अन्…; 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधील सावत्याचं असं आहे नवं घर, व्हिडीओद्वारे दाखवली झलक, बायकोसह पूजा करताना दिसला

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाने आजवर रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. जगभरात या विनोदी कार्यक्रमाचे लाखो दिवाने चाहते आहेत. आजवर या कार्यक्रमाने अनेक नवोदित कलावंतांना प्लॅटफॉर्म देत खूप मोठी संधी दिली आहे. ही कलाकार मंडळी त्यांच्या कलेच्या जोरावर प्रेक्षकांची मन जोपासताना दिसत आहेत. असाच एक कलाकार म्हणजे अभिनेता रोहित माने. रोहित मानेने आजवर स्वमहेनतीच्या जोरावर स्वतःचे असे स्थान निर्माण केले आहे. ‘साताऱ्याचा विनोदी तारा’, ‘देशी हॉटनेस’ अशा अनेक बिरुदांनी लोकप्रिय असा हा अभिनेता सिनेसृष्टीत त्याच नशीब आजमावत आहे. (Rohit Mane New Home)

प्रेक्षकांच्या या लाडक्या अभिनेत्याने काही दिवसांपूर्वीच मुंबईत नवं घर घेतलं. मुंबईत घर घेण्याचं स्वप्न हे बऱ्याच कलाकारांचं असतं. असंच स्वप्न अभिनेता रोहित माने यानेदेखील पाहिलं आणि पूर्ण केलं आहे. नवीन घर घेण्याचे स्वप्न पूर्ण करत रोहित मानेने त्याच्या नवीन घराची माहिती सोशल मीडियावर शेअर केली होती. रोहितने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे एक खास व्हिडीओ शेअर करत घराची झलकही दाखवली.

आणखी वाचा – तन्वी-अर्जुन निघाले अलिबागला, सायलीचा होत आहे जळफळाट, पुढे काय घडणार?

View this post on Instagram

A post shared by Rohit Mane (@mane_ya._.na_mane)

यानंतर आता रोहितने त्याच्या या नव्या घराची झलक शेअर करत एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. ‘सुख कळले’ असं कॅप्शन देत त्यांनी नव्या घराचा गृह्प्रवेशाचा सुंदर असा व्हिडीओ इन्स्टाग्राम अकाउंटवरुन शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये अभिनेता बायकोसह पूजा करत असल्याचं पाहायला मिळत आहे. रोहित त्याच्या कुटुंबीयांच्या उपस्थितीत नव्या घरात प्रवेश करत असल्याचं दिसत आहे. यावेळी दोघांचा पारंपरिक अंदाज पाहायला मिळत आहे.

आणखी वाचा – गुरुजींकडूनही पारू व आदित्यला मिळाला आशीर्वाद, दोघांचं हे नातं नेमकं कोणतं वळण घेणार?, मालिकेत येणार मोठा ट्विस्ट

रोहित मानेचं हे मुंबईतलं हे पहिलं घर आहे. नव्या घराची पहिली किल्ली शेअर करत त्याने नवं घर घेतल्याची बातमी चाहत्यांसह शेअर केली होती. यानंतर आता अभिनेत्याने थेट गृहप्रवेश पूजेचा व्हिडीओ शेअर केला आहे. रोहितच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कमेंट करत त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. तर प्रियदर्शिनी इंदलकर, सौरभ चौघुले, वनिता खरात, प्रथमेश परब या कलाकार मंडळींनी व्हिडीओवर कमेंट्स करत रोहितचं कौतुक केलं आहे.

Tags: entertainmentmaharashtrachi hasyajatramarathi actorrohit manerohit mane new home
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Amol Kolhe on Me Savitribai Jotirao Phule
Entertainment

सहा नव्या मालिका येताच ‘ही’ जुनी मालिका होणार बंद, ‘स्टार प्रवाह’चा मोठा निर्णय

जून 1, 2026 | 1:08 pm
Swanandi Tikekar new home photos
Entertainment

तीन वर्षाचं स्वप्न…; मराठी सेलिब्रिटी कपलने मुंबईत घेतलं नवं घर, बाल्कनीत पोज देत शेअर केली आनंदाची बातमी

जून 1, 2026 | 12:00 pm
Suman Kalyanpur Death
Entertainment

“आजकल तेरे मेरे प्यार के” गाण्याचा आवाज हरपला, सुप्रसिद्ध गायिकेचं वयाच्या ८९व्या वर्षी निधन

जून 1, 2026 | 9:55 am
Tumbadchi Manjula Makarand Anaspure
Entertainment

‘तुंबाडची मंजुळा’मधील मकरंद अनासपुरेंचा लूक समोर, अभिनेत्याचा साधू अवतार चर्चेत

मे 30, 2026 | 5:08 pm
Next Post
Natasa Stankovic Net Worth

हार्दिक पांड्याबरोबर घटस्फोट, आता नताशाचा कमाईचा मार्ग नेमका कोणता?, इतके स्टायलिश राहणीमान, सगळा खर्च नक्की कसा करते?

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.