शुक्रवार, जून 6, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

भारतीय संघाला प्रत्यक्ष पाहून ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम प्रसाद खांडेकर भारावला, व्हिडीओ शेअर करत म्हणाला, “हार्दिकने माझ्याकडे बघून…”

Saurabh Moreby Saurabh More
जुलै 5, 2024 | 9:57 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Maharashtrachi Hasyajatra fame Prasad Khandekar overwhelmed by seeing the Indian cricket team video shared on Instagram

भारतीय संघाला प्रत्यक्ष पाहून ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम प्रसाद खांडेकर भारावला, व्हिडीओ शेअर करत म्हणाला, “हार्दिकने माझ्याकडे बघून...”

भारतीय क्रिकेट संघानं टी-२०  विश्वचषकावर नाव कोरल्यानंतर अखेर संघ मायदेशी परतला. पंतप्रधनांची भेट घेतल्यानंतर संघानं दिल्लीहून मुंबई गाठली आणि इथं आयोजित करण्यात आलेल्या व्हिक्ट्री परे़डसाठी मुंबईकरांसह क्रिकेटप्रेमींनी मरीन ड्राइव्ह इथे तोबा गर्दी केल्याचं पाहायला मिळालं. या गर्दीत अनेक क्रिकेट प्रेमींनी गर्दी केल्याचे पाहायला मिळाले. याच गर्दीत सहभागी होण्याची इच्छा ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम प्रसाद खांडेकरचीदेखील झाली होती. मात्र गर्दीमुळे प्रसाद खांडेकरने तिकडे जाण्याचा मोह टाळला. मात्र म्हणतात णा एखादी गोष्ट तुमच्या नशीबात असेल तर ती कशीही सध्या होतेच. याचबद्दल प्रसादने त्याच्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये भाष्य केलं आहे.

प्रसादने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये त्याने भारतीय संघाला पाहिल्याचा आनंद व्यक्त केला आहे. प्रसादने या पोस्टमध्ये “आणि हार्दिकने माझ्याकडे बघून वर्ल्ड कप उंचावला” असं म्हटलं आहे. यापुढे त्याने असं म्हटलं आहे की, “आज साऊथ मुंबई ला कामानिमित्त जायचंच होत विचार केला की नरिमन पॉईंट ला जाऊन चॅम्पियन्स च्या विजयी मिरवणुकीत पण सहभागी होऊया. पण न्यूजमधले  गर्दीचे फोटो पाहिले आणि जायचा मोह टाळला आणि गप्प बोरिवलीला निघालो. साधारण सांताक्रूझच्या दरम्यान रस्त्याच्या दुतर्फा गर्दी जमत असलेली दिसली आणि पटकन ट्यूब पेटली की अरे आपले चॅम्पियन्स इथूनच जाणार आहेत. नंतर थोड्या वेळात आजूबाजूला पाहिलं तर संपूर्ण हायवेवर गाड्या रस्त्यात मध्येच आडव्या टाकून सगळेच टीम इंडियाची वाट बघत होते”.

View this post on Instagram

A post shared by Prasad Khandekar (@prasadmkhandekarofficial)

आणखी वाचा – शुभंकर तावडेचं ठरलं! गर्लफ्रेंडबरोबर शेअर केलेला फोटो चर्चेत, वडील म्हणाले, “देवाने बनवलेली जोडी…”

यापुढे त्याने असं म्हटलं आहे की, “क्षणाचाही विलंब न करता गाडीतून उतरलो आणि दुसऱ्या क्षणाला जगजेत्ते गाड़ीतून समोर आले. अगदी आतून मनातल्या मनात त्यांना एक सॅल्युट ठोकला. कदाचित तो मनातल्या मनात अगदी मनापासून ठोकलेला सॅल्युट टेलिपथीने हार्दिक पांड्यापर्यंत पोहोचला असावा. त्यानेसुद्धा पुढील क्षणाला बसमधून माझ्याकडे बघून वर्ल्डकपचा कप उंचावला”.

आणखी वाचा – वृषभ, कर्क व कन्या राशीच्या लोकांना शुक्रवारी मिळणार गुडन्यूज, नोकरी-व्यवसायात होणार आर्थिक लाभ, जाणून घ्या…  

यापुढे प्रसादने हार्दिकबद्दल असं म्हटलं की, “आयपीएलदरम्यान ज्या मुंबईने हार्दिकला ट्रोल केलं, आज त्याच मुंबईकरांच स्वागत खुल्या दिलाने स्वीकारायला हार्दिक अगदी ड्राइव्हरच्या बाजूला बसलेला. त्याच्या पाठोपाठ अर्ध्या अर्ध्या सेकंदसाठी दर्शन झालं ते ‘द वॉल राहुल द्रविड. गरजेच्या क्षणी उभा राहणार बुम बुम बुमराह. दुखापतीवर मात करून दमदार पुनरागमन करणारा ऋषभ पंत आणि आमचा बोरिवलीकर रोहित. विराट, सूर्या या सगळ्यांनाच सॅल्युट ठोकायचा होता. भेटतील ते ही असे अचानक. गर्दी जमणे आणि जमवणे ह्यातील फरक पाहिला. स्वागतासाठी अशी गर्दी स्वतःहून जमली पाहिजे”.

Tags: maharashtrachi hasyajatramarathi entertainment newsprasad khandekar
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
Paaru Serial Update

किर्लोस्कर बंगल्यात पारू-हरीशच्या केळवणाची जय्यत तयारी, पारूच्या आग्रहाखातर अहिल्यादेवीही जेवणार का?, आलेलं वादळ शांत होईल का?

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.