शनिवार, एप्रिल 25, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

किर्लोस्कर बंगल्यात पारू-हरीशच्या केळवणाची जय्यत तयारी, पारूच्या आग्रहाखातर अहिल्यादेवीही जेवणार का?, आलेलं वादळ शांत होईल का?

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जुलै 5, 2024 | 10:45 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Paaru Serial Update

किर्लोस्कर बंगल्यात पारू-हरीशच्या केळवणाची जय्यत तयारी, पारूच्या आग्रहाखातर अहिल्यादेवीही जेवणार का?, आलेलं वादळ शांत होईल का?

‘पारू’ या मालिकेत असं पाहायला मिळणार आहे की, पारूच्या डोक्यात आलेली केळवणाची आयडिया सगळ्यांनाच पटलेली असते तर प्रीतम इकडे केळवणाची तयारी सुरु करायला गावाकडून आलेल्या शिक्षिकेला थांबवून घेतो. अहिल्यादेवी समोर सगळेच नोकर माणसं येतात त्यांना एकत्र पाहून अहिल्यादेवी म्हणतात तुम्ही आज सगळे एकत्र कसे आहात यावर सावित्री सांगते की, आम्हाला पारूचं केळवण करायचं होतं मात्र घरातली आताची परिस्थिती पाहता पारूने या गोष्टीला साफ नकार दिला आहे. तुम्हाला काय वाटेल, तुम्हाला वाईट वाटेल म्हणून तिने हे करायला नकार दिला आहे असं म्हणतात. (Paaru Serial Update)

अहिल्यादेवी म्हणतात मी का नाही म्हणेन पारुचं केळवण हे व्हायलाच हवं आणि ते आपल्याच बंगल्यात व्हायला हवं असं म्हणत त्या ऑर्डर सोडतात आणि तयारीला लागा असं सांगतात. त्यानंतर त्या शिक्षिका पारूच्या केळवणाची जय्यत तयारी करत असतात. सगळी सजावट्या एकटीने करतात तेव्हा प्रीतम त्यांच्यावर खूप खुश होतो आणि त्यांच्यासह गप्पा मारू लागतो. तर दामिनी आणि दिशाला तिला काम करताना पाहून फारच वाईट वाटतं. त्या तिच्यावरही जळू लागतात. दिशा तिच्याकडे पाण्याच्या ग्लास ही पाठवून देते. तर इकडे आदित्यने आई जेवल्याशिवाय मी जेवणार नाही असं सांगितलेलं असतं त्यामुळे पारूवर एक मोठं दडपणच असतं. पारूने केळवणाचा घाट घालत अहिल्यादेवीना जेवायला लावायचं असतं याचा ती विचार करत असते.

आणखी वाचा – बेबी बम्प दिखावा असल्याचा लोकांचा दावा, सुप्रसिद्ध अभिनेत्रीने गरोदर असल्याचं केलं सिद्ध, म्हणाली, “हा पुरावा आहे की…”

तर अहिल्यादेवी इकडे किचनमध्ये स्वतः पारूच्या केळवणाची तयारी करायला येतात. त्यांना स्वतः जेवण करताना पाहून प्रीतमही खूप खुश होतो. त्यानंतर अहिल्यादेवी पारूला बोलावून घ्यायला सांगतात. पारू व हरीश केळवणासाठी तयार होऊन येतात तेव्हा अहिल्यादेवी त्यांना स्वतःच्या हाताने बनवलेलं जेवण वाढतात. औक्षण झाल्यानंतर अहिल्यादेवी पारूला सोन्याच्या बांगड्या देखील देतात आणि हरीशला श्रीकांत गिफ्ट देतो. तर हे पाहून दामिनीला फारच राग येतो. दामिनी जेव्हा औक्षण करते तेव्हा ती मात्र काहीच देत नाही तर दिशा औक्षण करते तेव्हा ती स्वतःच्या हातातलं ब्रेसलेट काढून पारूच्या हातात देते आणि मनातल्या मनात म्हणते की, मला हे ब्रेसलेट द्यावेच लागेल नाहीतर सासू मॉमला माझ्याबद्दल गैरसमज होईल असं म्हणून दिखावा करण्यासाठी ते सगळं करते. त्यानंतर इकडे पारुला जेवण वाढल्यानंतर पारू जेवायला सुरुवात न करता म्हणते की आधी आपण देवाला नैवेद्य देतो आणि तो नैवेद्य सगळेजण वाटून खातो यावर अहिल्यादेवी म्हणतात तुला जे काही बोलायचे ते स्पष्ट बोल.

आणखी वाचा – भारतीय संघाला प्रत्यक्ष पाहून ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम प्रसाद खांडेकर भारावला, व्हिडीओ शेअर करत म्हणाला, “हार्दिकने माझ्याकडे बघून…”

तेव्हा पारू म्हणते की माझी देवी आई गेले दोन दिवस जेवली नाही आणि मी केळवणाचे जेवण जेऊ का? यावर अहिल्यादेवी तिला ओरडतात आणि सांगतात की, मला शब्दात अडकवू नकोस तो माझा वैयक्तिक निर्णय आहे आणि इथे देव वगैरे काही नाही, असं म्हणत त्या रागावतात. आता मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात पारू अहिल्यादेवींना जेवायला भाग पाडणार का हे सर्व पाहणं मालिकेत रंजक ठरणार आहे.

Tags: marathi serialpaaru serialPaaru Serial Updatezee marathi
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Raj Sharma Passes Away
Entertainment

प्रसिद्ध कॉमेडियनचे वयाच्या ५०व्या वर्षी निधन, बऱ्याच दिवसांपासून होते रुग्णालयात, मृत्यूचे कारण अस्पष्ट

एप्रिल 25, 2026 | 1:12 pm
Biplab Dasgupta death
Entertainment

वयाच्या ७५व्या वर्षी सुप्रसिद्ध अभिनेत्याचे निधन, रुग्णालयात नेतानाच वाटेत मृत्यू, सिनेसृष्टीवर शोककळा

एप्रिल 25, 2026 | 11:58 am
anupam kher sold mumbai home
Entertainment

भाड्याने राहायला सुप्रसिद्ध अभिनेत्याने विकलं घर, २२ वर्षात आलिया भट्टने घेतल्या अभिनेत्याच्या दोन्ही मालमत्ता, किंमत…

एप्रिल 25, 2026 | 10:18 am
Nehha Pendse tv shows
Entertainment

“त्याने मला अचानक पकडलं”, मुंबईच्या भररस्त्यात अभिनेत्रीसह घडलं असं काही की…; म्हणाली, “जवळ जाऊन…”

एप्रिल 25, 2026 | 9:57 am
Next Post
Tharal Tar Mag Serial Update

तन्वीने दिली आत्महत्येची धमकी, अर्जुनने या सगळ्याला पूर्णा आजीला धरलं जबाबदार, सायली मिटवू शकेल का हा अबोला?

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.