मराठी चित्रपट सृष्टीतील अभिनेते सुनील तावडे यांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. सुनील तावडे हे गेली अनेक वर्षे मराठी मनोरंजन सृष्टीत कार्यरत आहेत. त्यांनी आपल्या विनोदी व नकारात्मक भूमिकांनी प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केलं आहे. त्यांच्याच पाउलावर पाऊल ठेवत त्यांचा मुलगा शुभंकर तावडेदेखील या क्षेत्रात आला आहे. शुभंकरने आजवर अनेक मालिका, चित्रपट व सीरिजमधून प्रेक्षकांचे मनोरंजन केलं आहे. आपल्या अभिनयाने चर्चेत राहणारा शुभंकर हा सोशल मीडियाद्वारेही तितकाच सक्रीय असतो. सोशल मीडियावर तो आपले अनेक फोटो व व्हिडीओ शेअर कारेत चाहत्यांच्या संपर्कात राहत असतो.
अशातच शुभंकरने नुकत्याच शेअर केलेल्या एका फोटोमुळे तो चांगलाहक चर्चेत आला आहे. शुभंकरने नुकतीच त्याच्या सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला असून या फोटोची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे. शुभंकरने सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर समीक्षा टक्केबरोबर फोटो शेअर करत आपल्या प्रेमाची कबुली दिली आहे. शुभंकरने समीक्षाबरोबरचा एक खास फोटो शेअर करत त्याखाली “तुम हो… जेव्हा तुमचा आनंद सांत्वनाची जागा घेतो” असं लिहिलं आहे. शुभंकरने शेअर केलेला हा फोटो होळीमधील असल्याचे दिसत आहे.
आणखी वाचा – अधिपतीच्या घरामधून पैसे चोरीला, भूवनेश्वरीनेच केला होता प्लॅन, अक्षरा चोराला पकडणार का?
शुभंकरने समीक्षाबरोबरचा फोटो शेअर करतातच त्यावर मराठी मनोरंजन सृष्टीतील अनेक कलाकारांनी शुभेच्छांच्या कमेंट्स केल्या आहेत. अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकर, अमृता खानविलकर, मिताली मयेकर, प्रियदर्शनी इंदलकर, अमृता देशमुख, ऋता दुर्गुळे यांसारख्या अनेक कलाकारांनी व चाहत्यांनी या फोटोवर कमेंट्स करत प्रतिसाद दिला आहे. सुनील तावडे यांनी स्वत: सुद्धा या फोटोवर कमेंट करत “रब ने बना दी जोडी, तुम्हाला पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा…लव्ह यू… देव तुम्हा दोघांच्या कायम पाठिशी असेल” असं म्हटलं आहे.
आणखी वाचा – ‘आठवी-अ’ वेबसीरिजचा शेवटचा भाग प्रदर्शित, भरघोस प्रतिसादानंतर ‘दहावी अ’ची घोषणा, लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला
दरम्यान, शुभंकरची गर्लफ्रेंड समीक्षा ही समीक्षा सोशल मीडियावर कॉमेडी, लाईफस्टाइल, फॅशन व स्पोर्ट्स या विषयावर वेगवेगळे कंटेंट शेअर करत असते. तिने शेअर केलेल्या रील्सला चाहत्यांकडून अनेक लाईक्स व कमेंट्स मिळतात. तर शुभंकर हा अभिनेता असून आजवर त्याने अनेक चित्रपट, मालिकाव सीरिजमध्ये काम केले आहे. त्याची काळे धंदे ही वेब सिरीज खूप गाजली. नुकतीच त्याने रितेश देशमुख यांच्या ‘वेड’ चित्रपटातही काम केले होते.