बुधवार, एप्रिल 15, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या मंचावर प्रभाकर मोरे व गायिका मोनल कडलकने धरला ‘या’ गाण्यावर ठेका, व्हिडिओ व्हायरल

Kshitij Lokhandeby Kshitij Lokhande
सप्टेंबर 26, 2023 | 12:34 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Prabhakar More sings with Monal Kadlak

Video : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'च्या मंचावर प्रभाकर मोरे व गायिका मोनल कडलकने धरला 'या' गाण्यावर ठेका, व्हिडिओ व्हायरल

छोट्या पडद्यावरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा विनोदी कार्यक्रम प्रेक्षकांना नेहमीच खळखळून हसवलं आहे. विनोदी स्किट्स व कलाकारांच्या विविधांगी अभिनयाने हा कार्यक्रम अनेकांच्या जवळचा बनला आहे. याच कार्यक्रमात असा एक कलाकार आहे, ज्यांनी आपल्या कोकणी अंदाजाने प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले आहे. ते म्हणजे अभिनेते प्रभाकर मोरे. मूळचे चिपळूणचे असलेले प्रभाकर मोरे या कार्यक्रमात कोकणी अंदाज व शालू डान्ससाठी विशेष ओळखले जातात. त्यांनी आपल्या विनोदी शैलीने नेहमीच प्रेक्षकांची मने जिंकली आहे. (Prabhakar More sings with Monal Kadlak)

अभिनयाबरोबरच प्रभाकर मोरेंना गायनाची विशेष आवड असून त्यांच्या आवाजाची जादू प्रेक्षकांना ऑनस्क्रीन अनुभवायला मिळाली आहे. असाच एक व्हिडिओ त्यांनी नुकताच त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला आहे. जो चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे. आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये प्रभाकर मोरे हास्यजत्रेतील गायिका मोनल कडलकसह हास्यजत्रेच्या सेटवर एक हिंदी गाणं गाताना दिसत आहे. त्यांच्या या गाण्याला कार्यक्रमातील वाद्यवृंद साथ देत आहे. त्यांच्या या व्हिडिओला चाहत्यांनी असंख्य प्रतिक्रिया दिल्या आहेत.

हे देखील वाचा – Tharal Tar Mag New Promo: कोणी केला सायलीवर जीवघेणा हल्ला? अर्जुन वाचवू शकेल का सायलीला?

View this post on Instagram

A post shared by Prabhakar More (@its_prabhakarmore)

‘पांघरुण’, ‘टकाटक’, ‘भाई-व्यक्‍ती की वल्ली’ यांसारख्या अनेक चित्रपटांमधून प्रभाकर मोरेंनी आपल्या अभिनयाची जादू दाखवली. त्याचबरोबर ‘रानबाजार’ वेबसीरिजमध्ये त्यांची छोटीशी भूमिका प्रचंड गाजली होती. हास्यजत्रेबरोबर कॉमेडीची बुलेट ट्रेन या कार्यक्रमात ते झळकले होते. त्यांच्या अभिनयाला प्रेक्षकांची नेहमीच विशेष पसंती मिळाली.

हे देखील वाचा – Mission Raniganj Trailer : कोळशाची खाण अन् ६५ कामगारांना वाचवण्याची धडपड, अक्षय कुमारचा बहुचर्चित ‘मिशन राणीगंज’चा ट्रेलर पाहिलात का ?

दरम्यान, प्रभाकर यांनी काही महिन्यांपूर्वीच राजकारणात प्रवेश केला आहे. ते एका पक्षाच्या सांस्कृतिक पदाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळत आहेत.

Tags: maharashtrachi hasyajatraprabhakar morePrabhakar More sings with Monal Kadlak
Kshitij Lokhande

Kshitij Lokhande

Latest Post

Salman Khan Skipped Asha Bhosle Funeral
Entertainment

Asha Bhosle Funeral : मुंबईत असूनही आशा भोसलेंच्या अंत्यसंस्काराला शाहरुख आणि सलमान खान का आले नाहीत?, कारण समोर…

एप्रिल 15, 2026 | 9:47 am
Bapya Marathi Movie Songs
Entertainment

‘कारट्या’ची धूम, ‘बाप्या’च्या युथफुल रॅप साँगचा सोशल मीडियावर धुमाकूळ, सिनेमॅटिक शूट लक्षवेधी

एप्रिल 14, 2026 | 4:46 pm
Alia Bhatt Has Opened Up About Motherhood
Entertainment

आलिया भट्टच्या तीन वर्षीय मुलीला वाटते अपयशाची भीती, सद्गुरुंना विचारलं, “मी चांगली आई आहे का?”

एप्रिल 14, 2026 | 2:24 pm
Abhishek Bachchan 0n IPL
Entertainment

“ते माझ्या बजेटच्या बाहेर होतं”, अभिषेक बच्चनने IPL मध्ये कोणताही संघ न खरेदी करण्यामागचे सांगितलं कारण, म्हणाला, “खूप महाग…”

एप्रिल 14, 2026 | 1:10 pm
Next Post
Swara Bhaskar Baby

बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्करला कन्यारत्न प्राप्त, इन्स्टाग्रामवर लेकीबरोबरचे फोटो शेअर करत केला तिच्या नावाचा खुलासा

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.