शुक्रवार, मे 16, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्करला कन्यारत्न प्राप्त, इन्स्टाग्रामवर लेकीबरोबरचे फोटो शेअर करत केला तिच्या नावाचा खुलासा

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
सप्टेंबर 26, 2023 | 9:56 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Swara Bhaskar Baby

बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्करला कन्यारत्न प्राप्त, इन्स्टाग्रामवर लेकीबरोबरचे फोटो शेअर करत केला तिच्या नावाचा खुलासा

सिनेमासृष्टीत सध्या बऱ्याच कलाकार मंडळींकडून खुशखबर ऐकू येत आहेत. अनेक कलाकारांनी त्यांच्या चाहत्यांबरोबर आनंदाच्या बातम्या शेअर केल्या आहेत. अनेकांनी ‘आमचं ठरलं’ म्हणत गुडन्यूज दिली आहे, तर काहींनी बाळ झाल्याची खुशखबर दिली आहे. अशातच आणखी एका बॉलिवूड अभिनेत्रीने चाहत्यांना गुडन्यूज दिली आहे. ही अभिनेत्री म्हणजे स्वरा भास्कर. (Swara Bhaskar Baby)

स्वरा भास्करने बॉलिवूड इंडस्ट्रीतील चाहत्यांबरोबर एक आनंदाची बातमी शेअर केली आहे. बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्करने काल म्हणजेच २५ सप्टेंबर रोजी एका लाडक्या मुलीला जन्म दिला. स्वरा भास्कर आई झाली असल्याची खुशखबर तिने चाहत्यांसह शेअर केली. अखेर त्यांच्या घरात आनंदच वातावरण निर्माण झालं आहे. ही माहिती तिने स्वतः तिच्या चाहत्यांबरोबर इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केली आहे.

आणखी वाचा – Video : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या मंचावर प्रभाकर मोरे आणि गायिका मोनल कडलकने धरला ‘या’ गाण्यावर ठेका, व्हिडिओ व्हायरल

View this post on Instagram

A post shared by Swara Bhasker (@reallyswara)

स्वरा भास्कर हिने तिच्या इंस्टाग्रामवर स्वतःचे आणि तिच्या मुलीचे काही फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये तिने चाहत्यांना खुशखबर देत सरप्राईज दिले आहे. या फोटोंमध्ये स्वरा व तीच बाळ दोघेही निरोगी दिसत आहेत. या फोटोंसोबत स्वराने कॅप्शन लिहीत साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. स्वरा हिने एका मुलीला जन्म दिला आहे. त्याचे फोटो शेअर करत अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “देवाने एक प्रार्थना ऐकली आणि आशीर्वाद ही मिळाला. आमची मुलगी राबिया हिचा जन्म २३ सप्टेंबर २०२३ रोजी झाला. कृतज्ञ व आनंदी अंतःकरणाने, तुम्ही दिलेल्या प्रेमाबद्दल धन्यवाद. हे संपूर्ण नवीन जग आहे”.

आणखी वाचा – Mission Raniganj Trailer : कोळशाची खाण अन् ६५ कामगारांना वाचवण्याची धडपड, अक्षय कुमारचा बहुचर्चित ‘मिशन राणीगंज’चा ट्रेलर पाहिलात का ?

स्वराने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिच्या बाळाचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये स्वराने आपल्या मुलीला तिच्या मांडीवर घेतलेले पाहायला मिळतंय. तर तिचा नवरा फहाद अहमद तिच्या जवळ उभा आहे आणि दोघेही कॅमेऱ्यासमोर पोज देताना दिसत आहेत. या फोटोंमध्ये स्वराने ब्लॅक अँड व्हाइट ड्रेस परिधान केला आहे. तर स्वराने लेकीला गुलाबी रंगाच्या कपड्यात गुंडाळले आहे. तसेच काही रुग्णालयातील लेकीबरोबरचे काही फोटो स्वराने इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत.

Tags: entertainmentswara bhaskarswara bhaskar baby
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Virat Kohli Fitness
Lifestyle

वाढतं वजन, धावायलाही अवघड, स्वतःचीच लाज वाटू लागली अन्…; विराट कोहलीने असं कमी केलं वजन

मे 15, 2025 | 7:00 pm
navri mile hitlerla serial off air
Entertainment

झी मराठी वाहिनीवरील सुप्रसिद्ध मालिका वर्षभरानंतर बंद होणार, कलाकार भावुक, म्हणाले, “इथली माणसं…”

मे 15, 2025 | 5:16 pm
kalki koechlin water birth
Entertainment

कल्की कोचलिनने पाण्यात मुलाला दिला जन्म, चुडैल म्हणून लोकांनी हिणवलं अन्…; ‘वॉटर बर्थ’ नक्की काय?

मे 15, 2025 | 3:43 pm
Tinnu Anand On Trolling
Entertainment

रस्त्यावरच्या कुत्र्यांना हॉकी स्टिकने मारण्याच्या विधानावरुन टिनू आनंद यांचं स्पष्टीकरण, म्हणाले, “कुत्र्यांनी माझ्यावर हल्ला केला तर…”

मे 15, 2025 | 3:33 pm
Next Post
Vanita Kharat Mangalsutra

भरजरी पैठणी भेट दिल्याने वनिताने मानले अरुण कदमांचे आभार; तर मराठमोळ्या लूकमधील वनिताच्या हटके मंगळसूत्राने वेधलं लक्ष

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.