कोकणात भात लावणीची कामे आटोपल्यावर पावसाचा जोर ओसरू लागतो. वाऱ्याच्या झोक्यावर डुलणाऱ्या हिरव्यागार शेताकडे बघताना कोकणवासीयांची नजर लागते ती श्रीगणरायाच्या आगमनाकडे. कोकणातील अनेक चाकरमनी श्रीगणरायाच्या आगमनाकडे आस लावून बसलेले असतात आणि गणपती म्हटले, की नृत्याच्या कल्पनेने प्रत्येकाचं अंग संचारले जाते. कोकणातील गणपती म्हटले आहे की, ‘बाल्या नृत्य’ हे ओघाने येतेच. बाल्या नृत्यालाच ‘जाखडी नृत्य’ किंवा ‘चेऊली नृत्य’ असेही म्हणतात. कोकणात गणपतीच्या दिवसांत या नृत्याचे सादरीकरण हे हमखास केलं जातं. अशातचं ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील कलाकारांनी या बाल्या डान्सवर सादरीकरण केलं आहे. (Maharashtrachi Hasyajatra team Balya dance)
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील निखिल बने हा कोकणातला असून त्याचं कोकण प्रेम हे जगजाहीर आहे. निखिल हा मूळचा कोकणातला आहे. त्यामुळे तो त्याचं गावावरील प्रेम सोशल मीडियावर अनेक व्हिडीओद्वारे व्यक्त करत असतो. याआधी त्याने अनेक व्हिडीओ शेअर करत त्याच्या कोकण प्रवासाची सफर घडवून आणली असल्याचे पाहायला मिळाले आहे. अशातच निखिलने नुकत्याच शेअर केलेल्या एका व्हिडीओने सर्वांचे लक्ष वेधून घेतलं आहे. या व्हिडीओमध्ये निखिल व ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील सगळे कलाकार बाल्या डान्स करताना दिसत आहेत.
निखिलने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ‘काजळ नयनी कुंकू कपाळी’ या लोकप्रिय कोकणी गाण्यावर सगळे कलाकार थिरकतानाचे पाहायला मिळत आहे. यात निखिल बने, प्रसाद खांडेकर, पृथ्विक प्रताप, प्रथमेश शिवलकर, मंदार मांडवकर व वनिता खरातचा नवरा सुमित लोंढे यांनी बाल्या डान्स केला आहे. गणपती जवळ येत आहेत तर डान्स झालाच पाहिजे” असं म्हणत निखिलने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे हा व्हिडीओ शेअर केला आहे. तसेच या व्हिडीओखाली अनेक चाहते मंडळींनी त्यांना हा व्हिडीओ आवडल्याचेही म्हटलं आहे.
आणखी वाचा – Video : लग्नानंतर बदलतो नवरा, जिनिलीया देशमुखच्या Birthday साठी रितेश देशमुखचा व्हिडीओ, म्हणाला, “बायको…”
दरम्यान, वनिता खरातच्या वाढदिवसानिमित्त ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ची टीम अलिबागला गेली होती. ‘हास्यजत्रे’च्या टीमपैकी वनिता खरात, तिचा नवरा, निखिल बने, पृथ्विक प्रताप,मंदार मांडवकर, प्रसाद खांडेकर, रोहित माने, ईशा डे, शिवाली परब, रसिका वेंगुर्लेकर व ओंकार राऊत ही मंडळी या पिकनिकला गेली होती, तेव्हा निखिल, प्रसाद, ओंकार, पृथ्वीक, रोहित, मंदार व निखिल यांनी हा बाल्या डान्सवर नाचल्याचा व्हिडीओ केला आहे.