शुक्रवार, एप्रिल 24, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“आम्ही मुलांना जन्म देतो पण…”, सैफ अली खान व करीना कपूरचं वक्तव्य चर्चेत, म्हणाले, “जन्माला आलं म्हणून…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
फेब्रुवारी 9, 2024 | 10:37 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Saif Ali Khan And Kareena Kapoor

“आम्ही मुलांना जन्म देतो पण…”, सैफ अली खान व करीना कपूरचं वक्तव्य चर्चेत, म्हणाले, “जन्माला आलं म्हणून…”

अनेकदा आपण पाहिलं आहे की, कलाकारांना आपल्या मुलांना कॅमेरापासून दूर ठेवायला आवडतं. त्यांच्या मुलांना अनावश्यक प्रसिद्धी मिळू नये, ज्याची त्यांना या वयात गरज नाही असंही अनेक कलाकार पालकांचं म्हणणं असतं. सैफ अली खान व करीना कपूर यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतींमध्ये, कलाकारांच्या मुलांबद्दल केलेलं भाष्य चर्चेत आलं आहे. सैफ व करीना यांची दोन्ही मुले तैमूर व जेह यांच्याबद्दल खूप चर्चा आहे. (Saif Ali Khan And Kareena Kapoor)

स्टारकिड्स व नेपोटिझमसारख्या मुद्द्यांवर सैफ व करीनाने ‘फिल्म कम्पेनियन’ सह चर्चा करताना भाष्य केलं. सिनेतारकांच्या मुलांकडे लक्ष वेधले जाते यावर ते म्हणाले की, प्रेक्षकांना आधीपासूनच त्या स्टारकिड्समध्ये रस असतो. लहानपणीच ते लोकप्रिय होतात, त्यांचे फोटो काढण्यात येतात, त्यांना पाहायला गर्दी होते.तैमूर खेळत होता , तेव्हा त्याचे फोटो काढायला एकच गर्दी झाली होती. त्याचे व्हिडीओ, रील व्हायरल होतात. आम्हाला हे नकोय. आम्ही मुलांना जन्म देतो पण मीडिया , फोटोग्राफर्स आणि चाहते त्यांना स्टारकिड्स बनवतात, असं सैफनं म्हटलं आहे.

आणखी वाचा – तितीक्षा तावडेचंही ठरलं, सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्याबरोबर विवाहबंधनात अडकणार, केळवणाला सुरुवात

View this post on Instagram

A post shared by Kareena Kapoor Khan (@kareenakapoorkhan)

सैफ अली खानने त्याची मुलं तैमूर व जेह यांच्याबाबत बोलताना सांगितले की, “पापाराझी त्यांच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवतात. काहींनी तर तैमूरच्या तायक्वांदो सरावाची छायाचित्रे कॅप्चर केली आहेत आणि नंतर ती इंटरनेटवर व्हायरल केली आहेत. त्यांनतर तो हसत हसत म्हणाला की, “तो जन्मत: स्टारचा मुलगा असल्यामुळे त्याच्या स्टारकिडच्या स्थितीचा खरा आकार पत्रकार, छायाचित्रकार व प्रेक्षक यांच्याकडून घडवला जातो”.

आणखी वाचा – बायकोला डोसा बनवून देत आहे पियूष रानडे, स्वयंपाकघरात करत आहे मेहनत, सुरुची म्हणाली, “आधीच मी तुझ्यावर…”

करीना म्हणाली की, “बॉलिवूडमधल्या लोकप्रिय घराण्यात जन्माला आलं, लोकप्रिय आडनाव लागेलही, पण मग टॅलेंटचं काय? तुमच्याकडं टॅलेंट असेल तरच तुम्ही काही तरी करु शकता”. असं करिनानं म्हटलं आहे. “तसंच सोशल मीडियाच्या या जगात कुणीही स्टार नाही आहे. तुम्हाला लाखो फॉलोअर्स आहेत, तुमच्या फोटोला हजारोंमध्ये लाइक्स येतात, म्हणजे तुम्ही स्टार नाहीत, तुम्हाला तुम्ही स्टार आहात हे कामातूनच सिद्ध करावं लागेल” असंही ती म्हणाली.

Tags: entertainmentkareen kapoorkareena kapoor on nepoyismsaif ali khansaif ali khan and kareena kapoorsaif ali khan on strakid
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Akshay Kelkar Father
Entertainment

अक्षय केळकरचे वडील आजही चालवतात रिक्षा, रिक्षाचालक आणि मराठी वादाबाबत म्हणाले, ” इथे कमवता आणि…”

एप्रिल 24, 2026 | 4:39 pm
kashmira kulkarni injured leg
Entertainment

पायाला दुखापत, शस्त्रक्रिया आणि…; ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ फेम अभिनेत्री मालिकेतून घेणार ब्रेक?, मोठी अपडेट समोर

एप्रिल 24, 2026 | 1:55 pm
Sunita Ahuja viral video
Entertainment

गोविंदा आणि त्याच्या पत्नीमध्ये पुन्हा बिनसलं, समोर आलेल्या व्हिडीओने झालं स्पष्ट, Video व्हायरल

एप्रिल 24, 2026 | 12:55 pm
Gayatri Datar Wedding
Entertainment

मराठी अभिनेत्रीची लगीनघाई, ग्रहमखचे फोटो समोर, होणाऱ्या नवऱ्यानेही लग्नविधीचे फोटो केले शेअर

एप्रिल 24, 2026 | 11:51 am
Next Post
Marathi actress Mugdha Godbole exposed her money fraud call incident post shared on social media

“कुणीतरी आपले कष्टाचे पैसे चोरतो…”, सुप्रसिद्ध अभिनेत्रीने उघडकीस आणला फसवणुकीचा प्रकार, म्हणाली, "अकाऊंटला पैसे आले अन्..."

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.