टीव्हीवरील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरणारा लोकप्रिय कार्यक्रम ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’. गेल्या अनेक वर्षांपासून हा कार्यक्रम प्रेक्षकांना मनमुराद हसवण्याचा काम करत आहे. या कार्यक्रमाचे जगभरात जितके चाहते आहे, तितकाच चाहतावर्ग कार्यक्रमातील प्रत्येक विनोदवीरांचे सुद्धा आहेत. याच कार्यक्रमातील दोन असे विनोदवीर आहे, ज्यांचे एक मोठा चाहतावर्ग आहे. ते म्हणजे अभिनेता गौरव मोरे आणि पृथ्वीक प्रताप. (Gaurav More & Prithvik Pratap relationship)
गौरव आणि पृथ्वीक गेल्या अनेक वर्षांपासून एकांकिकेमध्ये काम करत आहे. एकांकिकेव्यतिरिक्त दोघांनी नाटक, मालिका व चित्रपटांमध्येही काम केलेलं आहे. पण या दोघांना खरी ओळख मिळाली, ती महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमातून. कार्यक्रमातील या लोकप्रिय जोडीचे मैत्रीपलीकडचे एक वेगळं नातं असून त्याचा खुलासा गौरवने खुद्द एका मुलाखतीत केला आहे.
अभिनेता पृथ्वीक प्रताप हा गौरवचा जवळच्या मित्राचा सख्खा भाऊ आहे. याचा खुलासा करताना गौरवने एक किस्सा सांगितला. ज्यात तो म्हणाला, “कॉलेजमध्ये असताना माझी एक एकांकिका गाजली. त्यानंतर दुसऱ्या वर्षाला असताना आम्ही एकांकिका स्पर्धा बघायला गेलो. तेव्हा पृथ्वीकच्या कॉलेजची एकांकिका सुरू होती. मी त्याला एका कोपऱ्यात खूप वळवळ करताना पाहिलं. त्यानंतर मी माझ्या मित्रांना सांगितलं, की तो शेवटचा पोरगा आहे, भारी काम करतोय. त्याला काहीतरी करायचं आहे, पण तो खूप मागे आहे.”
हे देखील वाचा – हातात फोन, हटके पोझ अन्…; ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अरुण कदम यांनी शेअर केला तरुणपणीचा फोटो, नेटकरी म्हणतात, “एकदम चिकना आणि…”
“पुढे आम्ही दोघं भेटलो, त्याच्या अभिनयाचं कौतुक करत म्हणालो की तुला पुढे यायचं आहे, पण तसं काम मिळत नाहीये. त्यानंतर पृथ्वीक म्हणाला, दादा मी तुला एक बोलू का? मी तुला ओळखतो. पुढे बोलताना म्हणाला, मी तसं ओळखत नाही पण तू माझ्या घरचा आहेस. मी म्हटलं, घरचा? म्हणजे? त्यावर तो म्हणाला, तू प्रतिक दादाचा मित्र आहेस ना? मी म्हटलं, हो.”
हे देखील वाचा – चेकइन केल्यानंतर चार बॅग गायब, विमानसेवा देणाऱ्या कंपनीवर भडकला सुप्रसिद्ध मराठी अभिनेता, म्हणाला, “खूप त्रास होतोय कारण…”
“नंतर मला कळलं की हा माझ्या जिगरी मित्राचा सख्खा भाऊ आहे, त्याला लगेच बोलवलं आणि म्हटलं तू या घोळक्यात काय करतोय? तू प्रतीकचा भाऊ म्हणजे आपला भाऊ. तू आता प्रमुख भूमिका करणार, असं मी सहज भावाच्या प्रती त्याला बोललो. नंतर आम्ही ‘जजमेंट डे’ नावाची एकांकिका करत होतो. तेव्हा त्या तीन प्रयोगानंतर मला प्रशांत दामलेंच्या नाटकात काम करण्याची संधी मिळाली. तेव्हा प्रसाद खांडेकर मला म्हणाला, मला एक पोरगा दे जो तुझ्यासारखं काम करेल. मी त्याला म्हटलं, माझ्या एक नजरेत पोरगा आहे. तो आपल्या प्रतिकचा भाऊ. त्यावर प्रसाद म्हणाला, ‘मी त्याचं काम फारस पाहिलं नाही, पण घेतो त्याला यात.’ पुढे त्या नाटकात पृथ्वीक आला आणि ती एकांकिका गाजवली.”