शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“दादा मला एक वहिनी आण…”, ओंकार भोजनेच्या लग्नाबाबत नम्रता संभेरावचं भाष्य, म्हणाली, “माझ्या भावाला…”

Majja Webdeskby Majja Webdesk
नोव्हेंबर 15, 2023 | 1:01 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
namrata sambherao demands a sister in law

namrata sambherao demands a sister in law

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाने प्रेक्षकांना अगदी वेडं लावलं आहे. कार्यक्रमातील प्रत्येक कलाकारचं प्रेक्षकांशी अगदी वेगळं नातं जुळून आलं आहे. कलाकारांचा हटके अंदाज व भन्नाट विनोदीशैलीमुळे प्रेक्षकांनी या कार्यक्रमाला अगदी डोक्यावर उचलून घेतलं. कार्यक्रमातील कलाकाराचं प्रत्येकाशी वेगळं असं नातं आहे. त्यांच्यातील नात्यांची गोडी नेहमी स्कीटमध्ये पण आपल्याला पाहायला मिळते. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमात दोन हटके विनोदी कलाकार म्हणजे अभिनेता ओंकार भोजने व अभिनेत्री नम्रता संभेराव, हे दोघं खऱ्या आयुष्यात एकमेकांचे मानलेले भाऊ-बहिण आहेत. नुकतीच त्यांची ‘इट्स मज्जा’ने भाऊबीज स्पेशल मुलाखत घेतली. यावेळी नम्रताने ओंकारकडे वहिनी आणण्याची मागणी केली.(namrata demands a sister in law from onkar)

या मुलाखतीत नम्रता व ओंकारला तुमच्या नात्यात कधी भांडणं होतात का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना नम्रता म्हणाली, “आमच्या नात्यात कधी भांडण नाही होत. मला भांडण असं आठवत नाही. पण मी त्याला नेहमी असं सांगत असते की, भाऊ माझा भाऊ…. पुढचे शब्द नाही सांगू शकत”, असं म्हणत तिने पुढे ओंकारकडे एक फरमाईश केली. 

आणखी वाचा – अंकिता लोखंडे गरोदर? ‘बिग बॉस १७’च्या घरात पहिल्यांदाच खरं काय ते बोलून गेली अभिनेत्री, म्हणाली, “मला आंबट खाण्याचं…”

पुढे एक खास गाणं गात तिने, “दादा मला एक वहीनी आण”, असं सांगितलं. यावर ओंकारही मजेमजेत म्हणाला, “तु त्यांना विषय देतेस का?”  या विषयावर ओंकार थोडा लाजलेला दिसला. या मुद्दयावर पुढे उत्तर देत नम्रताच म्हणाली, “माझ्या भावाचं सध्या कामावर म्हणजे अभिनयातवर लक्षकेंद्रित आहे. त्याच्यामुळे सध्या तो पूर्णपणे त्याच्यावर लक्ष ठेवून आहे. खरंच तो पूर्णपणे त्याकडे एकाग्र आहे”. त्यावर ओंकारही म्हणतो, “ती एकाग्रता असायला हवीच”.

आणखी वाचा – सलमान खानचा ‘टायगर ३’ पाहण्यासाठी चित्रपटगृहांमध्ये तुफान गर्दी, ‘जवान’चाही मोडला रेकॉर्ड, आतापर्यंत कमावले तब्बल इतके कोटी

पण यासगळ्यात नम्रता पुन्हा म्हणते, “पण हा तरीही वहिनी असायला हवी. पण ठीक आहे माझाकडून काही जबरदस्ती नाही. त्याने त्याच काम चोख करावं. घरच्यांची, बहिणीची काळजी घ्यावी. बहिणीचं म्हणणं ऐकावं आणि बस छान काम करत रहावं”, असं म्हणत तिने ओंकारकडे मजेशीर रित्या वहिनीच्या मागणी केली. त्याचबरोबर तिने त्याला करिअरकडे लक्ष दे व स्वतःची काळजी घेण्याचाही सल्ला दिला.  

Tags: bhaubij specialmaharashtrachi hasyajatranamrata sambheraoonkar bhojane
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
tharla tar mag serial new promo pratima will visit subhedar house on the occasion of diwali

लक्ष्मीपूजनाला सुभेदारांच्या घरात होणार प्रतिमाची एंट्री; मालिकेत येणार नवा ट्विस्ट, तर सायलीच्या आयुष्यात घडणार…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.