‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या छोट्या पडद्यावरील कार्यक्रमाने प्रत्येक प्रेक्षकाला पोट धरून हसायला लावलं. या कार्यक्रमाचे विशेषपण आहे, ते दमदार विनोदी स्किट्स आणि कलाकारांचे दमदार विनोदी सादरीकरण. हास्यजत्रेत असे अनेक कलाकार आहेत, ज्यांनी आपल्या सादरीकरणाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. त्यातीलच एक दमदार अभिनेत्री म्हणजे वनिता खरात. वनिताने आपला दमदार अभिनय व स्वमेहनतीच्या जोरावर मराठीसह हिंदी मनोरंजनसृष्टीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. (Vanita Kharat)
हास्यजत्रेतून नावारूपास आलेली अभिनेत्री वनिता खरात हिने आजवर अनेक चित्रपट, वेबसिरीजमध्ये काम केलं आहे. शिवाय, ‘कबीर सिंग’ या हिंदी चित्रपटात वनिता दिसली असून तिची छोटीशी भूमिका मात्र भरपूर भाव खाऊन गेली. वनिता खरातने काही दिवसांपूर्वीच आपला वाढदिवस तिच्या खास मित्रांसोबत साजरा केला होता. वनितासाठी हा वाढदिवस विशेष होता. कारण, तिचा यंदाचा वाढदिवस तीन देशांमध्ये झाला होता. त्यानिमित्त वनिताने एक व्हिडिओ शेअर करत तिचा पती सुमित व कुटुंब, मित्र आणि चाहत्यांचे आभार मानले आहे.
वनिता या पोस्टमध्ये म्हणते, “यावर्षीचा माझा वाढदिवस खूप विशेष होता. कारण दीड दिवस माझा वाढदिवस साजरा झाला, तोही ३ देशांमध्ये अमेरिका, कॅनडा आणि भारत… तोही माझ्या लाडक्या माणसांबरोबर! इतक्या जल्लोषात आणि उत्साहात, इतक्या वेगवेगळ्या गोष्टी बघत माझा वाढदिवस साजरा होईल असं खरंच वाटलं नव्हतं. प्रेक्षकांच्या प्रेमाची ताकद मला आज इथवर घेऊन आली आणि माझ्या मित्रांनी या वाटेवर माझी सोबत केली. घरच्यांच्या शुभाशीर्वादाने मला मार्ग दाखवला आणि नाजूक क्षणात सुमितने माझा हात धरला!”
हे देखील वाचा – ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अरुण कदमांनी केले नातवाचे जल्लोषात स्वागत, फोटो आले समोर
“इतके प्रचंड देश पाहताना, तिथलं सौंदर्याने भारावून जाताना आणि प्रत्येक केक कापताना, सुमितची मात्र प्रचंड आठवण आली. मी तिथे असताना भारतात वाढदिवस साजरा करण्याची धुरा सुमितने सांभाळली, आणि शुभेच्छा ही माझ्यापर्यंत पोहोचवल्या. या वाढदिवसानिमित्त स्वतःसाठी काही गोष्टी ठरवल्या आहेत, त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन. मिळणार प्रेम द्विगुणित करण्याचा प्रयत्न करेन. जितकं हसवते आहे, तितकाच मीही हसत राहण्याचा प्रयत्न करेन, सोबत तुम्ही असालच ही आशा बाळगून. पुढच्या वाढदिवसाला बघुया कुठल्या देशात असेन! ????”, असं वनिता या पोस्टमध्ये म्हणते.
हे देखील वाचा – त्याक्षणी वनिता खरातसाठी तिचा नवरा सिद्धीविनायकच्या मंदिरात पोहोचला कारण…; अभिनेत्रीलाही भरुन आलं आणि…
सहा महिन्यांपूर्वी अभिनेत्री वनिता खरात सुमित लोंढेसोबत विवाहबद्ध झाली असून तिचे सुमितसोबत असलेलं प्रेम नेहमीच दिसून येतं. दोघांच्या प्रेमाबाबत सांगताना वनिताच्या वाढदिवशी तिचा पती सुमित जेव्हा भारतात होता. तेव्हा तो तिच्यासाठी देवदर्शनाला गेल्याचा खुलासा इट्स मज्जाला दिलेल्या मुलाखतीत केला होता. (Vanita Kharat share a birthday video)