बुधवार, एप्रिल 15, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

त्याक्षणी वनिता खरातसाठी तिचा नवरा सिद्धीविनायकच्या मंदिरात पोहोचला कारण…; अभिनेत्रीलाही भरुन आलं आणि…

Kshitij Lokhandeby Kshitij Lokhande
ऑगस्ट 11, 2023 | 4:41 pm
in Trending
Reading Time: 3 mins read
google-news
Vanita Kharat Sumit Londhe

त्याक्षणी वनिता खरातसाठी तिचा नवरा सिद्धीविनायकच्या मंदिरात पोहोचला कारण…; अभिनेत्रीलाही भरुन आलं आणि…

सोनी मराठी वाहिनीवरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमाने रसिक प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावलं आहे. या कार्यक्रमाची क्रेझ फक्त महाराष्ट्रातच नव्हे, तर जगभरातही आहे. या कार्यक्रमातील कलाकारांची आज एक वेगळीच फॅन फॉलोविंग आहे. या कार्यक्रमाने दोन महिन्यांसाठी छोट्या पडद्यावर ब्रेक घेतला होता. दरम्यान ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’चे कलाकार अमेरिका दौऱ्यावर होते. परदेशात त्यांनी विविध शहरांमध्ये शो केले. आता परदेशातून ही कलाकार मंडळी भारतात परतली आहेत. (Maharashtrachi Hasyajatra)

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रम दोन महिन्यांच्या ब्रेकनंतर पुन्हा प्रसारित होणार आहे. या कार्यक्रमाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट पाहत आहेत. कार्यक्रमातील कलाकार परदेशात असताना त्यांना त्यांच्या कुटुंबियांची खूप आठवण येत होती. याचदरम्यानचे काही किस्से आता समोर आले आहेत. वनिता व तिचा पती सुमितचा एक किस्सा अभिनेत्री रसिका वेंगुर्लेकरने सांगितला.

हे देखील वाचा – पृथ्वीक प्रतापचं मोठं मन, अमेरिकेत शो करत असताना दत्तू मोरेसाठी केली मोठी गोष्ट, प्रियदर्शिनी म्हणते, “पहिल्या दोन शोनंतर…”

View this post on Instagram

A post shared by Vanita Kharat (@vanitakharat19)

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या टीमने ‘इट्स मज्जा’शी संवाद साधला. यावेळी कार्यक्रमातील कलाकारांनी परदेशातील किस्से सांगितले. यावेळी रसिका म्हणाली, “ज्यादिवशी वनिताचा वाढदिवस होता, त्यादिवशी तिचा नवरा भारतात होता. तेव्हा त्याने माझ्या नवऱ्याला फोन करत तू ‘माझ्याबरोबर सिद्धिविनायक मंदिरात येतोस का?’ अशी विचारणा केली”.

हे देखील वाचा – समीर चौघुलेंनी औक्षण केलं, सचिन गोस्वामींच्या पाया पडली अन्…; प्राजक्ता माळीच्या पोस्टने वेधलं लक्ष, डान्स, गाणी आणि बरंच काही

“तेव्हा त्याने होकार दिला आणि ते दोघं एकत्र मंदिरात दर्शनासाठी गेले. हे सगळं होत असताना मी लंडनला होते आणि नुकताच माझा वाढदिवस झाला होता. आम्हाला त्यावेळेस इतकं भरून आलं, की आमचे नवरे तिकडे मंदिरात देवदर्शनासाठी चालले आहेत”. यावेळी रसिका व वनिताच्या पतीचं त्यांच्या पत्नीवर असणारं प्रेम दिसून आलं. (Vanita Kharat Sumit Londhe)

Tags: its majja exclusivemaharashtrachi hasyajatraRasika Vengurlekarsumit londhevanita kharatvanita kharat husband
Kshitij Lokhande

Kshitij Lokhande

Latest Post

Bapya Marathi Movie Songs
Entertainment

‘कारट्या’ची धूम, ‘बाप्या’च्या युथफुल रॅप साँगचा सोशल मीडियावर धुमाकूळ, सिनेमॅटिक शूट लक्षवेधी

एप्रिल 14, 2026 | 4:46 pm
Alia Bhatt Has Opened Up About Motherhood
Entertainment

आलिया भट्टच्या तीन वर्षीय मुलीला वाटते अपयशाची भीती, सद्गुरुंना विचारलं, “मी चांगली आई आहे का?”

एप्रिल 14, 2026 | 2:24 pm
Abhishek Bachchan 0n IPL
Entertainment

“ते माझ्या बजेटच्या बाहेर होतं”, अभिषेक बच्चनने IPL मध्ये कोणताही संघ न खरेदी करण्यामागचे सांगितलं कारण, म्हणाला, “खूप महाग…”

एप्रिल 14, 2026 | 1:10 pm
Digambar Naik Controversy
Entertainment

‘दशावतार’ चित्रपटात दिगंबर नाईक पाहिजे होता?, अभिनेत्याने व्यक्त केली खंत, म्हणाले, ” मालवणी माणूस नको…”

एप्रिल 14, 2026 | 12:21 pm
Next Post
Hemant Dhome angry on Mumbai-Goa Highway Condition

मुंबई-गोवा महामार्गावरील रस्त्यांची अवस्था पाहून भडकला हेमंत ढोमे, फोटो शेअर करत म्हणाला, “रागाचं रुपांतर आता…”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.