शनिवार, सप्टेंबर 12, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

अशोक सराफ यांना पद्मश्री पुरस्कार मिळणार? सुधीर मुनगंटीवारांची मोठी घोषणा, म्हणाले, “त्यांच्या नावाची शिफारस मी…”

Majja Webdeskby Majja Webdesk
ऑगस्ट 21, 2023 | 10:39 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Ashok Saraf Padma Shri award

अशोक सराफ यांनी पद्मश्री पुरस्कार मिळणार? सुधीर मुनगंटीवारांची मोठी घोषणा, म्हणाले, “त्यांच्या नावाची शिफारस मी...”

मराठी चित्रपटसृष्टी सातासमुद्रापलिकडे पोचवण्यामागे अनेक दिग्गज कलाकार मंडळींचं मोठं योगदान आहे. त्यातीलच एक कलाकार म्हणजे ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ. अशोक सराफ यांचं काम आणि त्यांच्या अभिनयाचे लाखो चाहते आहेत. त्यांचे चित्रपट आजही प्रेक्षक आवडीने पाहतात. नुकतंच त्यांना शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. या कार्यक्रमाला सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवारही उपस्थित होते. यावेळी सुधीर मुनगंटीवार यांनी मोठी घोषणा केली.

अशोक सराफ यांच्या नावाची पद्मश्री पुरस्कारासाठी शिफारस करणार असल्याचं यावेळी सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितलं. दरम्यान सांस्कृतिक मंत्र्यांच्या घोषणेनंतर अशोक सराफ यांनी प्रेक्षकांचे आभार मानले. सुधीर मुनगंटीवार म्हणाले, “कधी अशोक सराफ यांनी विनोदाचा बादशाह म्हटलं जातं, कधी विनोदवीर म्हटलं जातं, विनोदी देशाचा प्रधानमंत्रीही म्हटलं जातं. पण हे सगळं खरं आहे. रडवण्याचा अभिनय करणं हे तसं कठीण. पण हसवण्याचा अभिनय करुन समोरच्यांना हसवणं हे तसं महाकठीण. हे महाकठीण काम अशोक सराफ यांनी अनेक वर्ष अभिनय करत केलं. त्याबद्दल त्यांचं मनापासून अभिनंदन”.

आणखी वाचा – “हा निर्लज्जपणा येतो कुठून?”, रीलसाठी कवितांचा वापर करणाऱ्यांवर भडकला जितेंद्र जोशी, म्हणाला, “त्याचीच कविता…

View this post on Instagram

A post shared by ASHOK MAMA & NIVEDITA MA'AM ❤️???????? (@_ashok_loves_nivedita_)

पुढे ते म्हणाले, “पद्म पुरस्कारासाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने नावं सुचवायची असतात, त्याचा मी अध्यक्ष आहे. मी खरंतर मनात विचार करत होतो कोणती कोणती आणि कशी नावं सुचवायची?. पण इथं आल्यावर माझा निर्णय पक्का झाला की महाराष्ट्र सरकारच्या वतीने पद्म पुरस्कारासाठी अशोक सराफ यांचं नाव निश्चितपणे पाठवलं पाहिजे आणि ते आम्ही पाठवणार”.

आणखी वाचा – “बाळासाहेब व दिघेसाहेब…” निर्माते मंगेश देसाईंनी ‘धर्मवीर २’ बाबत दिले स्पष्टीकरण, म्हणाले, “राजकारण आणि चित्रपट हे माझ्यासाठी…”

सुधीर मुनगंटीवार यांनी घोषणा केल्यानंतर अशोक सराफ यांनी हात जोडले. तसेच त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहण्यासारखा होता. या कार्यक्रमादरम्यान अशोक यांनी त्यांच्या मनातील भावनाही व्यक्त केल्या. “आजचा सत्कार मी कधीही विसरु शकत नाही. कलेच्या क्षेत्रात विविधता आणण्याचा प्रयत्न करत असताना कलाकाराला प्रेक्षकांकडून मिळणारे पाठबळ फार महत्वाचे असतात. त्याशिवाय कलाकाराचे प्रयत्न व्यर्थ आहेत. मला कायमच असे पाठबळ महाराष्ट्रातील प्रेक्षकांनी दिलं”. असं म्हणत अशोक सराफ यांनी आनंद व्यक्त केला.

Tags: ashok sarafmarathi actormarathi actressmarathi movie
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Aali Mothi Shahani Ganesh Vandana
Entertainment

बाप्पाच्या भक्तीत रंगणार ‘आली मोठी शहाणी’ मधील ‘गणेश वंदना’,

सप्टेंबर 12, 2026 | 10:16 am
Kaakul Marathi Movie
Entertainment

‘काकुळ’च्या थरारक रहस्याचा उलगडा होणार नोव्हेंबरमध्ये, मोनालिसा बागलची प्रमुख भूमिका

सप्टेंबर 9, 2026 | 9:50 am
Dashami Movie Song
Entertainment

‘बुरी नजर वाले.. तेरा मुँह काला’ चा स्वॅग, ‘दशमी’ चित्रपटाचं हटके गाणं चर्चेत

सप्टेंबर 9, 2026 | 9:40 am
Daryabhavani Marathi Movie
Entertainment

‘दर्याभवानी’ साठी दिग्पाल लांजेकरांचे अनोखं गाऱ्हाणं, शूटिंगला सुरुवात, होणार ‘या’ दिवशी प्रदर्शित

सप्टेंबर 9, 2026 | 9:32 am
Next Post
sara kahi tichyasathi new serial cast

'सारं काही तिच्यासाठी' म्हणत पत्राद्वारे व्यक्त झाल्या ४००० बहिणी, 'झी मराठी'वरील नवीन मालिका ठरते चर्चेचा विषय

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.