बुधवार, जून 4, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“माझा हा पहिलाच पुरस्कार पण…”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम प्रियदर्शिनी इंदलकरची इन्स्टाग्रामवर भावुक पोस्ट, म्हणाली, “हा क्षण गमावल्याबद्दल…

Saurabh Moreby Saurabh More
डिसेंबर 22, 2023 | 11:19 am
in Entertainment
Reading Time: 2 mins read
google-news
maharashtrachi hasyajatra fame actress priyadarshini indalkar shared special post on instagram

"माझा हा पहिलाच पुरस्कार पण…", 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम प्रियदर्शिनी इंदलकरची इन्स्टाग्रामवर भावुक पोस्ट, म्हणाली, "हा क्षण गमावल्याबद्दल…

महाराष्ट्राची हास्यजत्रा या लोकप्रिय कार्यक्रमातून घराघरांत फोकहलेली अभिनेत्री म्हणजे प्रियदर्शिनी इंदलकर. पुण्याची विनम्र अभिनेत्री म्हणून ती अवघ्या महाराष्ट्रात प्रसिद्ध झाली. प्रियदर्शिनीने तिच्या विनोदी अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. अभिनेत्री तिच्या अभिनयामुळे जितकी चर्चेत असते, तितकीच ती सोशल मीडियावर पोस्टमुळेदेखील चर्चेत असते. नुकत्याच केलेल्या एका फोटोशूटमुळे ती चांगलीच चर्चेत आली होती. प्रियदर्शिनी सोशल मीडियावर अनेक स्टायलिश लूकमधले फोटो शेअर करत असते. तसेच तिच्या कामाची माहितीही पोस्ट करत असते. अशातच प्रियाने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या एका पोस्टमुळे चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. (Priyadarshini Indalkar On Instagram)

प्रियाला नुकताच एक पुरस्कार मिळाला असून या पुरस्कारामुळे ती भारावून गेली आहे. याच संदर्भात तिने एक भावुक पोस्ट शेअर केली आहे. प्रियाला नुकताच कोकण चित्रपट महोत्सव अंतर्गत ‘फुलराणी’ या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे. याबद्दल तिने असे म्हटले आहे की, “चित्रपटासाठी माझा हा पहिलाच पुरस्कार आणि दुर्दैवाने मी या कार्यक्रमाला अनुपस्थित होते. कारण मी नाटकासाठी उत्तरेला गेले होते. माझा पहिला पुरस्कार स्वीकारण्याचा क्षण गमावल्याबद्दल मी आनंदी त्याचबरोबर नाराज आहे.”   

View this post on Instagram

A post shared by Priyadarshini Indalkar (@shini_da_priya)

यापुढे तिने असं म्हटले आहे की, “पहिल्या दिवसापासून माझ्यावर विश्वास विश्वास जोशी  या व्यक्तीची मी आभारी आहे. तुमच्यामुळे हा पुरस्कार मिळणारच होता. कोकण चित्रपट महोत्सव व सिंधुरत्न कलावंत मंच या शाब्बासकीसाठी धन्यवाद. विजय पाटकर सर तुम्ही मला २०१८ मध्ये माईमसाठी व आता चित्रपटातील अभिनयासाठी मला पुरस्कार दिलात त्यासाठी तुमचेही अभार. अमृता राव, श्वेता बापट, स्वानंद केळकर, जाई जोशी तुमचेही धन्यवाद, लॉकडाऊननंतर तुम्ही हा चित्रपट बनवलात. त्याचबरोबर चित्रपटाच्या सगळ्या कलाकार व टीमचे धन्यवाद, तुम्हा सर्वांमुळे हा चित्रपट शक्य झाला, नाहीतर ‘फुलराणी’ इतकी सुंदर सजली नसती. सर्वाना टॅग करत आहे.  पण काही राहुन गेले असेल तर वाईट वाटून घेऊ नका”

आणखी वाचा – शाहरुख खानचा ‘डंकी’ पाहण्यासाठी चित्रपटगृहांमध्ये तुफान गर्दी, रेकॉर्डब्रेक कमाई करणार, एका दिवसातच कमावले तब्बल…

“सुबोधदादा, माझ्यातल्या अभिनेत्रीला बागडण्यासाठी प्रोत्साहन देणाऱ्या, तुझ्यातल्या अभिनेत्याचे मनापासून आभार. या चित्रपटाने मला दिग्गज अभिनेते विक्रम गोखले यांच्याबरोबर काम करण्याची व त्यांच्याबरोबर डान्स करण्याची संधी दिली.  दुर्दैवाने त्यांचा हा शेवटचा चित्रपट होता. पण मी त्यांचे डोळे आयुष्यभर विसरणार नाही.” असं म्हणत प्रियाने चित्रपटातील मेकअप व वेशभूषा करणाऱ्या कलाकारांपासून चित्रपटांचे संगीत व गीतलेखन करणाऱ्या सर्वांचेच आभार मानले आहेत व त्यानं धन्यवादही म्हटले आहे.  

आणखी वाचा – मलायका अरोरासह घटस्फोट, गर्लफ्रेंडलाही सोडलं, आता भलत्याच मुलीबरोबर अरबाज खान करणार लग्न, तयारी सुरु

दरम्यान, ओंकार राऊत, समीर चौघुले, सुबोध भावे, आरती मोरे, शरयू दाते, पृथ्वीक प्रताप, वनिता खरात, अक्षया नाईक, श्याम राजपूत, ईशा डे, आनंदी जोशी, गुरु ठाकूर, सुशांत शेलार आदि कलाकारांनी तिला कमेंट्समध्ये अभिनंदन म्हटले आहे. तर तिच्या अनेक चाहत्यांनीही कमेंट्सद्वारे तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.       

Tags: entertainmententertainment newsmaharashtarcahi hasyajtramaharashtrachi hasy jatramarathi actressMarathi newspriyadarshini indalkar
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Gurmeet Choudhary On Robbery
Entertainment

सुप्रसिद्ध अभिनेत्याच्या घरी चोरी, घरकाम करणाऱ्या व्यक्तीनेच केला विश्वासघात, अभिनेता म्हणाला, “मुली सुखरुप आहेत पण…”

जून 4, 2025 | 11:51 am
Virat kohli anushka sharma viral video
Entertainment

१८ वर्षांनंतर हातात ट्रॉफी, बायकोला घटट् मिठी अन् विराट कोहलीला अश्रू अनावर, अनुष्का शर्माजवळ येताच…; व्हिडीओ व्हायरल

जून 4, 2025 | 11:47 am
IPL 2025
Entertainment

“१८ वर्षांची प्रतीक्षा संपली”, विराट कोहलीच्या RCB ला घवघवीत यश, कलाकरांकडून कौतुक, म्हणाले, “मेहनतीचं…”

जून 4, 2025 | 10:53 am
Priyanka Chopra talk about virginity
Entertainment

“व्हर्जिनिटी एका रात्रीत संपते पण…”, प्रियांका चोप्राने केलेलं धक्कादायक विधान, स्त्रियांच्या सेक्स लाइफबाबत म्हणालेली…

जून 3, 2025 | 6:45 pm
Next Post
Siddharth Chandekar Ole Aale Movie Trailer

सिद्धार्थ चांदेकरच्या 'ओले आले' चित्रपटाचा मजेशीर ट्रेलर प्रदर्शित, बापलेकाची जोडी देणार आयुष्य जगण्याची नवी उमेद

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.