मंगळवार, एप्रिल 21, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“१८ वर्षांची प्रतीक्षा संपली”, विराट कोहलीच्या RCB ला घवघवीत यश, कलाकरांकडून कौतुक, म्हणाले, “मेहनतीचं…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जून 4, 2025 | 10:53 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
IPL 2025

"१८ वर्षांची प्रतीक्षा संपली", विराट कोहलीच्या RCB ला घवघवीत यश, कलाकरांकडून कौतुक, म्हणाले, "मेहनतीचं…"

IPL 2025 : आयपीएल २०२५ मध्ये विराट कोहलीच्या टीम आरसीबीने आश्चर्यकारक विजय मिळवला. १८ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर विराट कोहलीच्या संघाने आयपीएलचा ‘किताब जिंकला आहे. सामना जिंकल्यानंतर विराट कोहली खूप भावनिक झाला. त्याच वेळी, अनुष्का शर्मा देखील आनंदाने भावुक झालेली पाहायला मिळाली. मॅच जिंकल्यानंतर अनुष्का व विराटने प्रेमाची मिठी मारत हा आनंद, या भावना एकमेकांसह शेअर केल्या. विराटचे चाहते सर्वत्र हा आनंद साजरा करत आहेत. बॉलिवूडपासून टेलिव्हिजनपर्यंत प्रत्येकजण खूप आनंदी आहे आणि आरसीबीचे अभिनंदन करत आहे.

अभिनेता रणवीर सिंग यांनी दोन पोस्ट शेअर केल्या आहेत. त्याने विराटचा फोटो शेअर केला आणि लिहिले आहे की, “हेच सर्वकाही आहे”. तर आरसीबीच्या विजयाने रश्मिका मंदानाने लिहिले की, “विजयाचा हा एक सुगंध आहे”. तर अल्लू अर्जुनने लिहिले आहे की, “प्रतीक्षा संपली. Ee Sala Cup Namde. आम्ही १८ वर्षांपासून याची वाट पाहत होतो. प्रचंड अभिनंदन आरसीबी”. अनन्या पांडे, ईशान खट्टर आणि भूमी पेडनेकर यांनीही आरसीबीला विजयाबद्दल अभिनंदन केले आहे.

आणखी वाचा – वैष्णवीच्या मृत्यूबाबत संशय, साडी व पंखा ७१ किलो वजन पेलू शकेल का?, फॉरेन्सिक रिपोर्ट ठरणार महत्त्वाचे

अभिनेता सोनू सूद यांनी आरसीबीचा विजय साजरा करणारे अनेक फोटो शेअर केले आहेत. आणि कॅप्शनमध्ये असं लिहिले आहे की, “आरसीबी. मेहनतीचे फळ नेहमीच गोड असतं. अभिनंदन. पंजाबचे कठोर नशीब. पंजाब टीमही कठोर परिश्रमांसह खेळली. दोन्ही बाजूंनी आदर”. स्मृति इराणी यांनी आरसीबीसाठी पोस्ट शेअर करत अभिनंदन केले. त्याने लिहिले, “ई साला कप नामडे हे आता एक स्वप्न नाही. बंगलोर ही तुमची रात्र आहे. मिम्स, हार्टब्रेक आणि इतक्या वर्षांच्या अपेक्षेने बदला घेतला. हे अशा चाहत्यांसाठी आहे ज्यांनी कधीही अपेक्षा सोडल्या नाहीत. आरसीबी आणि विराट कोहली यांचे अभिनंदन”.

आणखी वाचा – अन्न तुंबलेल्या पाण्याजवळ ठेवले आणि…; झेप्टोचा किळसवाणा प्रकार समोर, तुम्हीही ऑर्डर करत असाल तर…

एल्विश यादव याने देखील पोस्ट शेअर करत, “आरसीबी अभिनंदन. फायनली पहिली आयपीएल ट्रॉफी. विराटसाठी खूप आनंद झाला”. अभिनेता नकुल मेहता याने लिहिले, “बेंगलुरू उद्या बंद होणार आहे. चक दे फट्टे”.

Tags: IPL 2025rcb winvirat kohli
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Famous Actress and Actor Wedding News
Entertainment

“सुपारी फुटली, लग्न ठरलं” सुप्रसिद्ध अभिनेत्री-अभिनेता अडकणार लग्नबंधनात; सोशल मीडियावर VIDEO VIRAL

एप्रिल 21, 2026 | 4:28 pm
dipika kakar two new cysts
Entertainment

कॅन्सर सर्जरीनंतर दीपिका कक्करची तब्येत पुन्हा बिघडली, दुसऱ्यांदा झाला हा आजार, लेकाची वाटतेय काळजी

एप्रिल 20, 2026 | 3:46 pm
Atlee Baby Girl
Entertainment

सुप्रसिद्ध दिग्दर्शक दुसऱ्यांदा झाला बाबा, घरी आली चिमुकली परी, स्पेशल पोस्टद्वारे दिली गुडन्यूज

एप्रिल 20, 2026 | 12:34 pm
 Deepika Padukone pregnant
Entertainment

४० व्या वर्षी दुसऱ्यांदा आई होणार दीपिका पदुकोण, प्रेगन्सी किटद्वारे दिली गुडन्यूज, लेक दुवाचीही दिसली झलक

एप्रिल 20, 2026 | 11:48 am
Next Post
Virat kohli anushka sharma viral video

१८ वर्षांनंतर हातात ट्रॉफी, बायकोला घटट् मिठी अन् विराट कोहलीला अश्रू अनावर, अनुष्का शर्माजवळ येताच...; व्हिडीओ व्हायरल

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.