महाराष्ट्राची हास्यजत्रा या लोकप्रिय कार्यक्रमातून घराघरांत फोकहलेली अभिनेत्री म्हणजे प्रियदर्शिनी इंदलकर. पुण्याची विनम्र अभिनेत्री म्हणून ती अवघ्या महाराष्ट्रात प्रसिद्ध झाली. प्रियदर्शिनीने तिच्या विनोदी अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. अभिनेत्री तिच्या अभिनयामुळे जितकी चर्चेत असते, तितकीच ती सोशल मीडियावर पोस्टमुळेदेखील चर्चेत असते. नुकत्याच केलेल्या एका फोटोशूटमुळे ती चांगलीच चर्चेत आली होती. प्रियदर्शिनी सोशल मीडियावर अनेक स्टायलिश लूकमधले फोटो शेअर करत असते. तसेच तिच्या कामाची माहितीही पोस्ट करत असते. अशातच प्रियाने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या एका पोस्टमुळे चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. (Priyadarshini Indalkar On Instagram)
प्रियाला नुकताच एक पुरस्कार मिळाला असून या पुरस्कारामुळे ती भारावून गेली आहे. याच संदर्भात तिने एक भावुक पोस्ट शेअर केली आहे. प्रियाला नुकताच कोकण चित्रपट महोत्सव अंतर्गत ‘फुलराणी’ या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे. याबद्दल तिने असे म्हटले आहे की, “चित्रपटासाठी माझा हा पहिलाच पुरस्कार आणि दुर्दैवाने मी या कार्यक्रमाला अनुपस्थित होते. कारण मी नाटकासाठी उत्तरेला गेले होते. माझा पहिला पुरस्कार स्वीकारण्याचा क्षण गमावल्याबद्दल मी आनंदी त्याचबरोबर नाराज आहे.”
यापुढे तिने असं म्हटले आहे की, “पहिल्या दिवसापासून माझ्यावर विश्वास विश्वास जोशी या व्यक्तीची मी आभारी आहे. तुमच्यामुळे हा पुरस्कार मिळणारच होता. कोकण चित्रपट महोत्सव व सिंधुरत्न कलावंत मंच या शाब्बासकीसाठी धन्यवाद. विजय पाटकर सर तुम्ही मला २०१८ मध्ये माईमसाठी व आता चित्रपटातील अभिनयासाठी मला पुरस्कार दिलात त्यासाठी तुमचेही अभार. अमृता राव, श्वेता बापट, स्वानंद केळकर, जाई जोशी तुमचेही धन्यवाद, लॉकडाऊननंतर तुम्ही हा चित्रपट बनवलात. त्याचबरोबर चित्रपटाच्या सगळ्या कलाकार व टीमचे धन्यवाद, तुम्हा सर्वांमुळे हा चित्रपट शक्य झाला, नाहीतर ‘फुलराणी’ इतकी सुंदर सजली नसती. सर्वाना टॅग करत आहे. पण काही राहुन गेले असेल तर वाईट वाटून घेऊ नका”
“सुबोधदादा, माझ्यातल्या अभिनेत्रीला बागडण्यासाठी प्रोत्साहन देणाऱ्या, तुझ्यातल्या अभिनेत्याचे मनापासून आभार. या चित्रपटाने मला दिग्गज अभिनेते विक्रम गोखले यांच्याबरोबर काम करण्याची व त्यांच्याबरोबर डान्स करण्याची संधी दिली. दुर्दैवाने त्यांचा हा शेवटचा चित्रपट होता. पण मी त्यांचे डोळे आयुष्यभर विसरणार नाही.” असं म्हणत प्रियाने चित्रपटातील मेकअप व वेशभूषा करणाऱ्या कलाकारांपासून चित्रपटांचे संगीत व गीतलेखन करणाऱ्या सर्वांचेच आभार मानले आहेत व त्यानं धन्यवादही म्हटले आहे.
आणखी वाचा – मलायका अरोरासह घटस्फोट, गर्लफ्रेंडलाही सोडलं, आता भलत्याच मुलीबरोबर अरबाज खान करणार लग्न, तयारी सुरु
दरम्यान, ओंकार राऊत, समीर चौघुले, सुबोध भावे, आरती मोरे, शरयू दाते, पृथ्वीक प्रताप, वनिता खरात, अक्षया नाईक, श्याम राजपूत, ईशा डे, आनंदी जोशी, गुरु ठाकूर, सुशांत शेलार आदि कलाकारांनी तिला कमेंट्समध्ये अभिनंदन म्हटले आहे. तर तिच्या अनेक चाहत्यांनीही कमेंट्सद्वारे तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.