शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम नम्रता संभेरावचा नवराही आता चित्रपटात काम करताना दिसणार, रुपेरी पडद्यावर दोघांची केमिस्ट्री पाहायला मिळणार

Majja Webdeskby Majja Webdesk
नोव्हेंबर 14, 2023 | 12:25 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम नम्रता संभेरावचा नवराही आता चित्रपटात काम करताना दिसणार, रुपेरी पडद्यावर दोघांची केमिस्ट्री पाहायला मिळणार | maharashtrachi hasyajatra fame actress namrata sambherao husband yogesh sambherao working togethr in ekda yeun tar bagha movie

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम नम्रता संभेरावचा नवराही आता चित्रपटात काम करताना दिसणार, रुपेरी पडद्यावर दोघांची केमिस्ट्री पाहायला मिळणार

यंदा दिवाळीनिमित्त सर्वत्र आनंदाचं व उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे. सर्वसामान्यांपासून ते दिग्गजांपर्यंत सर्वजण दिवाळी हा सण मोठ्या धूमधडाक्यात साजरा करताना दिसत आहेत. लक्ष्मीपूजन, नरक चतुर्दशीबरोबरच नवरा-बायकोच्या नात्याचा पवित्र सण म्हणजे ‘पाडवा’. पाडव्यानिमित्त नवरा-बायको एकमेकांना भेटवस्तू देत पाडवा साजरा करतात. सामान्यांबरोबरच मनोरंजन क्षेत्रातील अनेक कलाकार मंडळी त्यांचा पाडवा उत्साहाने साजरा करतात. प्रत्येक पाडवा हा नवरा-बायकोसाठी खास असतो. अशातच यंदाचा पाडवा ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्री नम्रतासाठीही खास आहे. (Actress Namrata Sambherao And Yogesh Sambherao Working Together In Movie)

नम्रता आणि तिचा नवरा योगेश संभेराव हे सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असतात. नम्रता योगेशबरोबरचे अनेक फोटो, व्हिडीओ तिच्या सोशल मीडियावर शेअर करत असते. सोशल मीडियावर या जोडीला नेटकरी लाईक्स व कमेंट्स करत प्रतिसाद देतात. अशातच सोशल मीडियावरील ही प्रसिद्ध जोडी आता एका चित्रपटातदेखील एकत्र पाहायला मिळणार आहे. नम्रताचा नवरा योगेश संभेराव तिच्यासह आगामी सिनेमात झळकणार आहे. त्यामुळे नम्रतासाठी यंदाचा पाडवा हा नक्कीच खास आहे.

View this post on Instagram

A post shared by Namrata Yogesh Sambherao (@namrata_rudraaj)

आणखी वाचा – ‘जय जय स्वामी समर्थ’ फेम अक्षय मुडावदकर अभिनयक्षेत्रात येण्याआधी ‘या’ क्षेत्रात करत होता काम, म्हणाला, “मी आठ वर्ष…”

येत्या ८ डिसेंबर रोजी नम्रताचा ‘एकदा येऊन तर बघा’ हा चित्रपट प्रदर्शित होणार असून या चित्रपटात तिच्याबरोबर तिचा नवरा योगेशही असणार आहे. या चित्रपटात योगेश एका लहानश्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटातील त्याच्या भूमिकेबद्दल अद्याप काही माहिती समोर आलेली नाही. या चित्रपटातील ही खास भूमिका त्याने नम्रताला यंदाच्या पाडव्याचं गिफ्ट म्हणून दिलं आहे आणि यामुळे नम्रतादेखील नक्कीच आनंदी असणार, असं म्हणायला हरकत नाही. येत्या ८ डिसेंबर रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

आणखी वाचा – “दुबई ते मुंबई असं हवेत असताना…”, विमानातच साजरा झाला संकर्षण कऱ्हाडेचा वाढदिवस, म्हणाला, “एअर इंडियाने मला…”

लेखक-अभिनेता प्रसाद खांडेकर ‘एकदा येऊन तर बघा’ या चित्रपटाच्या निमित्ताने दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करत आहे. सयाजी शिंदे, गिरीश कुलकर्णी, विशाखा सुभेदार, तेजस्विनी पंडित, भाऊ कदम, पॅडी कांबळे, प्रसाद खांडेकर, नम्रता संभेराव, ओंकार भोजने, वनिता खरात, शशिकांत केरकर, रोहित माने, सुशील इनामदार अशी भली मोठी फौज या चित्रपटात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. त्यामुळे सर्वांना या सिनेमाची उत्सुकता आहे.

Tags: entertainment newsmaharashtrachi hasyajtramarathi actressnamrata sambherao
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Dia Mirza Pregnancy
Women

…अन् गरोदरपणात दिया मिर्झाला झाला नको तो संसर्ग, लेकाच्या जीवावरही बेतलं, ३६ तासांनी शस्त्रक्रिया झाली आणि…

जून 7, 2025 | 10:00 am
Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Next Post
Surabhi Bhave Answers To Trollers

"मी हिंदू आहे त्यामुळे कधी बकरा कापला…", फटाके वाजवू नका सांगितल्यानंतर ट्रोल झालेल्या प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीची पोस्ट, म्हणाली, "अकलेचे तारे…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.