Prithvik Pratap Wedding : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेता पृथ्वीक प्रतापने लग्न केलं असल्याचं समोर आलं आहे. अभिनेत्याच्या इन्स्टाग्राम पोस्टवरुन त्याने लग्न केलं असल्याचं जाहीर केलं. यापूर्वी लग्नाची कोणतीही माहिती न देता त्याने थेट लग्नाचे फोटो शेअर करत लग्न केलं असल्याची आनंदाची बातमी चाहत्यांसह शेअर केली आहे. पृथ्वीकने त्याच्या बायकोबरोबरचे खास फोटो शेअर करत त्याने ही गुडन्यूज दिली आहे. त्याच्या लग्नाच्या बातमीने अनेकांना धक्का बसला आहे.
पृथ्वीकने अत्यंत साधेपणाने लग्न केलं असल्याचं समोर आलं आहे. “२५-१०-२०२४. एक नवी सुरुवात व्हावी या ही बंधनाने, साक्षीदार व्हावं मग मोगऱ्याच्या ही सुगंधाने!”, असं खास कॅप्शन देत त्याने लग्न केलं असल्याचं सांगितलं आहे. यावेळी पृथ्वीक व त्याच्या बायकोचा खास पारंपरिक अंदाज लक्ष वेधून घेत आहे. अत्यंत साधेपणाने पृथ्वीकने हे लग्न केलं असल्याचं समोर आलं आहे.
आणखी वाचा – बच्चन कुटुंबियांचं नक्की चाललंय तरी काय?, एकीकडे नात्यात दुरावा तर दुसरीकडे खरेदी केले एकत्र १० घरं कारण…
लग्नासाठी पृथ्वीकने पांढऱ्या रंगाचं धोतर व कुर्ता परिधान केला आहे. आणि पृथ्वीकच्या बायकोने ऑफ व्हाईट आणि सोनेरी रंगाची साडी नेसली आहे. दोघांनी एकूणच साऊथ इंडियन लूकला पसंती दर्शविली असल्याचं दिसत आहे. गळ्यात त्यांनी मोगऱ्याच्या फुलांच्या वरमाला घातलेल्या दिसत आहेत. पृथ्वीकच्या अत्यंत साधा व सिंपल लूकने साऱ्यांच्या नजरा वळविल्या आहेत. त्याच्या पत्नीचं नाव प्राजक्ता असे आहे.
पृथ्वीकने दिलेल्या या गोड बातमीवर कलाकार मंडळींनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. छोट्या पडदयावरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या लोकप्रिय कार्यक्रमातून पृथ्वीकने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर जगभरात या कार्यक्रमाचे अनेक चाहते आहेत. या कार्यक्रमातील प्रत्येक पात्र आता प्रेक्षकांच्या आवडीचे झाले आहेत. आपल्या विनोदाच्या अनोख्या शैलीने या कार्यक्रमातील प्रत्येक कलाकाराने प्रेक्षकांच्या मनात स्वत:ची जागा निर्माण केली आहे.