Amitabh And Abhishek Bachchan Property : बच्चन कुटुंब हे नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असलेलं पाहायला मिळालं आहे. गेल्या काही काळापासून कुटुंबातील मतभेदाच्या अफवांना वेग आला असल्याचं समोर आलं. अनेक महिन्यांपासून कुटुंबातील हे वाद सुरु आहेत. याशिवाय अभिषेक बच्चन व ऐश्वर्या राय बच्चन यांच्या घटस्फोटाच्या अफवा पसरल्याच्या चर्चेलाही उधाण आल्याचं पाहायला मिळालं. पण ज्युनियर बच्चन किंवा ऐश्वर्या या दोघांनीही यावर अद्याप काहीही भाष्य केलेलं नाही. अनंत व राधिका अंबानीच्या लग्नापासून बच्चन कुटुंब व ऐश्वर्या यांच्यातील मतभेदाच्या बातम्यांना सुरुवात झाली आणि अलीकडेच ऐश्वर्याने तिच्या चुलत भावाच्या वाढदिवसाच्या पार्टीत अभिषेक न दिसल्याने या अफवांना वेग आला.
या सगळ्या दरम्यान एक मोठी बातमी समोर येत आहे. अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यांनी दिवाळीपूर्वी रिअल इस्टेट मार्केटमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. बच्चन कुटुंबाने एक-दोन नव्हे तर १० फ्लॅट्स मिळून खरेदी केले आहेत, ज्यांची किंमत करोडोंच्या घरात आहे. अमिताभ बच्चन व अभिषेक बच्चन यांनी मुलुंड पश्चिम, मुंबई येथे ही नवीन मालमत्ता खरेदी केली आहे. ज्याची किंमत २४.९५ कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे. अहवालानुसार, हे नुकतेच बांधलेले अपार्टमेंट्स ओबेरॉय रियल्टीच्या इटरनियाच्या प्रीमियम निवासी प्रकल्पाचा भाग आहेत. येथे 3 BHK आणि 4 BHK रेडी-टू-मूव्ह-इन फ्लॅट्स आहेत.
आणखी वाचा – Tharal Tar Mag : मधुभाऊंच्या सुटकेसाठी अर्जुनचे प्रयत्न, सायली सोडून जाणार याचीही भीती, पुढे काय घडणार?
मीडिया रिपोर्ट्सनुसार, बच्चन कुटुंबाने येथे एकूण १० अपार्टमेंट खरेदी केले आहेत. या डीलमध्ये प्रत्येक अपार्टमेंटसाठी दोन समर्पित कार पार्किंग जागा देखील समाविष्ट आहेत. या प्रकल्पावर एकूण १.५० कोटी रुपयांचे मुद्रांक शुल्क लावण्यात आले आहेत. या १० फ्लॅटचे क्षेत्रफळ १०,२१६ स्क्वेअर फूट असल्याचे सांगितले जात आहे. यापैकी सहा अपार्टमेंट्स अभिषेक बच्चनने खरेदी केल्याचे सांगण्यात येत आहे, ज्याची किंमत सुमारे १४.७७ कोटी रुपये आहे, तर अमिताभ बच्चन यांनी उर्वरित चार अपार्टमेंट खरेदी केले आहेत.
आणखी वाचा – नातं जपलं! सूरज चव्हाणच्या गावी पोहोचली जान्हवी किल्लेकर, फोटो शेअर करत म्हणाला, “लाडकी ताई…”
या गुंतवणुकीमुळे बच्चन कुटुंबाने रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक वाढवली आहे. निवासी गुंतवणुकीव्यतिरिक्त, अमिताभ बच्चन यांनी यावर्षी अयोध्येत अंदाजे १४.५ कोटी रुपये खर्चून १०,००० चौरस फुटांचा भूखंड खरेदी केला आहे.