शुक्रवार, जून 6, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“सहकार्य करणारे कलाकार खूप कमी आणि…”, भार्गवी चिरमुलेबरोबरचा फोटो शेअर करत प्रसाद खांडेकरची पोस्ट, म्हणाला, “पहाटे शिफ्ट संपते तेव्हा…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
मार्च 30, 2024 | 1:17 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Prasad Khandekar On Bhargavi Chirmuley Birthday

"सहकार्य करणारे कलाकार खूप कमी आणि...", भार्गवी चिरमुलेबरोबरचा फोटो शेअर करत प्रसाद खांडेकरची पोस्ट, म्हणाला, "पहाटे शिफ्ट संपते तेव्हा..."

सिनेसृष्टीत आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या अभिनेत्रींच्या यादीत अभिनेत्री भार्गवी चिरमुले हिचं नाव आवर्जून घेतलं जातं. भार्गवीने आजवर अनेक मालिका, चित्रपटांमधून महत्त्वपूर्ण भूमिका साकारत प्रेक्षकांची मन जिंकली आहेत. ‘वहिनी साहेब’ या मालिकेतील भूमिकेने अभिनेत्रीला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. अभिनयशिवाय भार्गवी उत्कृष्ट नृत्यांगना आहे. तिने स्वतःचं युट्यूब चॅनेलही सुरु केलं असून ते उत्तम सुरु आहे. अभिनेत्री बरेचदा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत राहिली. (Prasad Khandekar On Bhargavi Chirmuley Birthday)

भार्गवीने सिनेसृष्टीत काम करत असताना बऱ्याच कलाकारांसह मैत्री केली. आज भार्गवीच्या वाढदिवसानिमित्त अभिनेता प्रसाद खांडेकरने केलेल्या पोस्टची चर्चा रंगली आहे. भार्गवीबरोबरचा फोटो शेअर करत अभिनेत्याने इंस्टाग्राम अकाऊंटवरून तिला शुभेच्छा दिल्या आहेत. प्रसादही नेहमीच सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असतो. महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमातून तो नेहमीच प्रेक्षकांचं मनोरंजन करत असतो. अशातच प्रसादने हटके कॅप्शन देत भार्गवीला दिलेल्या शुभेच्छा साऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहेत.

आणखी वाचा – “तुला परफॉर्म करताना पाहिलं तेव्हा…”, ‘चंद्रा’ गाणं घडवणाऱ्या आशिष पाटीलने सुरु केला स्वतःचा डान्स स्टुडिओ, अमृता खानविलकर म्हणाली, “मेहनत…”

View this post on Instagram

A post shared by Prasad Khandekar (@prasadmkhandekarofficial)

ही पोस्ट शेअर करत प्रसादने शुभेच्छा देत म्हटलं आहे की, “दहा ते दहाची शिफ्ट ज्यावेळी काही कारणास्तव पहाटे ५ला संपते. त्यावेळी ही एवढे उत्साही आणि सहकार्य करणारे आर्टिस्ट फारच कमी असतात, त्यापैकी एक भार्गवी तू आहेस. खूपच गोड व्यक्ती आणि कमाल अभिनेत्री आहेस. तसेच सुंदर नृत्यांगणाही आहेस. आता तर पॉडकास्टपण जोरात चाललाय बाबा. वाढदिवसाच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा मैत्रिणी”.

आणखी वाचा – Video : ‘गुलाबी साडी’वर प्रिया बापट-उमेश कामतचा भन्नाट डान्स, नवरा-बायकोचा पहिल्यांदाच एकत्र डान्स पाहून चाहतेही भारावले

प्रसादने कॅप्शनमध्ये भार्गवीची केलेली स्तुती आणि कौतुक अगदी खरं आहे. भार्गवी मुळातच खूप मेहनती अभिनेत्री असून ती तिच्या मेहनतीने सिनेसृष्टीत आपलं स्थान टिकवून आहे. कामाच्या बाबतीत अभिनेत्री कधीच हलगर्जीपणा करताना दिसलेली नाही. त्यामुळे मेहनती, कष्टाळू अभिनेत्रीच्या यादीत भार्गवीच नाव आवर्जून घेतलं जातं.

Tags: bhargavi chirmuleyentertainmentprasad khandekarPrasad Khandekar On Bhargavi Chirmuley Birthday.
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
sadhguru jaggi vasudev did go to the cemetery at midnight know the reason

रात्रीचे स्मशानामध्ये जायचे सद्गुरु जग्गी वासुदेव, जळत्या चितेमधून शरीराचे तुकडेही काढायचे अन्…; स्मशानामध्ये नेमकं ते काय करायचे?

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.