बुधवार, जून 4, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“बोलणं होत नाही म्हणून…”, लेक सासरी गेल्यानंतर अरुण कदम यांना नातवाची येत आहे आठवण, म्हणाले, “मी व माझी बायको…”

Saurabh Moreby Saurabh More
डिसेंबर 28, 2023 | 10:05 am
in Entertainment
Reading Time: 2 mins read
google-news
maharashtrachi hasyajatra fame actor arun kadam misses his grandson post shared on instagram

"बोलणं होत नाही म्हणून…", लेक सासरी गेल्यानंतर अरुण कदम यांना नातवाची येत आहे आठवण, म्हणाले, "मी व माझी बायको…"

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या लोकप्रिय कार्यक्रमातून महाराष्ट्राच्या घराघरांत पोहोचलेले अभिनेते म्हणजे अरुण कदम. संपूर्ण महाराष्ट्र त्यांना ‘दादूस’ या नावानेही ओळखतो. आपल्या विनोदाने चर्चेत राहणारे अरुण कदम सोशल मीडियावरदेखील तितकेच चर्चेत असतात. सोशल मीडियावर ते अनेक फोटो, व्हिडीओ शेअर करताना दिसतात. त्याचबरोबर ते त्यांच्या नातवाबरोबरचे काही खास क्षणही शेअर करत असतात. अशातच त्यांनी नुकतीच शेअर केलेली एक पोस्ट नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे.  (Arun Kadam On Instagram)

काही दिवसांपूर्वीच अरुण यांची लेक सुकन्या आई झाली. सुकन्याने एका गोंडस मुलाला जन्म दिला. कदम कुटुंबियांनी चिमुकल्याचं अगदी जंगी पद्धतीने स्वागत केलं. अरुण सध्या आजोबा असल्याच्या आनंद लुटत आहेत. त्याचबरोबरीने आता अरुण यांच्या नातवाच्या बारसाचे व्हिडीओ शेअर केले होते. त्यांनी बाळाचं ‘अथांग’ असं नाव ठेवलं होतं. ते लाडक्या नातवाबरोबरचे अनेक  फोटो व व्हिडीओ सोशल मीडियाद्वारे शेअर करत असतात. अशातच नुकतीच त्यांनी त्यानच्या नातवाबद्दल एक खास पोस्ट शेअर केली आहे.   

View this post on Instagram

A post shared by Arun kadam (@ladka.dadus)

आणखी वाचा – “वेदना, झोप नाही अन्…”, गरोदरपणानंतर सई लोकूरची झाली आहे अशी अवस्था, म्हणाली, “घाण डायपर…”

अरुण कदम यांनी इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे त्यांच्या नातवाचे काही फोटो शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करत त्यांनी फोटोखाली एक पोस्टदेखील लिहिली आहे. यामध्ये त्यांनी असे म्हटले आहे की, “माझा नातु ठाण्यात त्याच्या घरी गेल्यामुळे आमची भेट होत नाही, बोलणंही होत नाही. मग मी व माझी बायको व्हिडिओ कॅालवर बोलतो. व्हिडीओ कॉलवर अथांग आधी आम्हाला शोधतो मग हसतो.”

आणखी वाचा – मोदक, लाडू, पंगत अन्…; आमिर खानच्या लेकीच्या लग्नापूर्वीच्या विधींना सुरुवात, महाराष्ट्रीयन पद्धतीने थाट, पूर्वाश्रमीच्या पत्नीची हजेरी

दरम्यान, अरुण कदम यांच्या नातवाबरोबरच्या अनेक फोटो व व्हिडीओला चाहते भरभरून प्रतिसाद देत असतात. अशातच या फोटोलादेखील चाहत्यांनी लाईक्स व कमेंट्सद्वारे प्रतिसाद दिला आहे. याआधीही त्यांनी सई ताम्हणकर व अंगाई गातानाचा व्हिडीओ शेअर केला होता. त्यालादेखील चाहत्यांनी तुफान प्रतिसाद दिला होता.

Tags: arun kadamarun kadam daughetrArun Kadam shares his Grandson videoentertainment newsmaharashtrachi hasy jatramarathi actormarathi entertainmentMarathi news
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

IPL 2025
Entertainment

“१८ वर्षांची प्रतीक्षा संपली”, विराट कोहलीच्या RCB ला घवघवीत यश, कलाकरांकडून कौतुक, म्हणाले, “मेहनतीचं…”

जून 4, 2025 | 10:53 am
Priyanka Chopra talk about virginity
Entertainment

“व्हर्जिनिटी एका रात्रीत संपते पण…”, प्रियांका चोप्राने केलेलं धक्कादायक विधान, स्त्रियांच्या सेक्स लाइफबाबत म्हणालेली…

जून 3, 2025 | 6:45 pm
Vaishnavi Hagawane Death
Social

वैष्णवीच्या मृत्यूबाबत संशय, साडी व पंखा ७१ किलो वजन पेलू शकेल का?, फॉरेन्सिक रिपोर्ट ठरणार महत्त्वाचे

जून 3, 2025 | 6:00 pm
Zepto News
Social

अन्न तुंबलेल्या पाण्याजवळ ठेवले आणि…; झेप्टोचा किळसवाणा प्रकार समोर, तुम्हीही ऑर्डर करत असाल तर…

जून 3, 2025 | 4:23 pm
Next Post
Mugdha Vaishampayan and Prathamesh Laghate

Video : सासरी भजनात दंग झाली मुग्धा वैशंपायन, व्हिडीओ शेअर करत म्हणाली, "घरचा दत्तजयंती उत्सव अन्…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.