सोमवार, सप्टेंबर 7, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“वेदना, झोप नाही अन्…”, गरोदरपणानंतर सई लोकूरची झाली आहे अशी अवस्था, म्हणाली, “घाण डायपर…”

Saurabh Moreby Saurabh More
सप्टेंबर 6, 2024 | 10:05 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
bigg boss marathi fame actress sai lokur shared her situation after pregnancy from instagram

"वेदना, झोप नाही अन्…", गरोदरपणानंतर सई लोकूरची झाली आहे अशी अवस्था, म्हणाली, "घाण डायपर…"

‘बिग बॉस मराठी’ या लोकप्रिय कार्यक्रमातून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे सई लोकूर. या कार्यक्रमातून सई चांगलीच प्रसिद्धीझोतात आली. गेल्या अनेक दिवसांपासुन सईचे प्रेग्नंसी फोटोशूट चांगलेच चर्चेत होते. अशातच तिने नुकतीच सोशल मीडियावर आई झाल्याची बातमी सर्वांबरोबर शेअर केली होती. १७ डिसेंबर रोजी तिला कन्यारत्न प्राप्त झाले होते. आई झाल्याची गुडन्यूज सांगत तिने सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केली होती.

“आमच्या बाळाच्या येण्याची बातमी सांगताना आम्हाला खूप आनंद होत आहे. आई व बाळ दोघंही सुखरुप आहे. सगळ्यांच्या प्रेमासाठी व शुभेच्छांसाठी खूप धन्यवाद.” असं म्हणत तिने तिच्या बाळाबद्दलची एक खास पोस्ट शेअर केली होती. या पोस्टला चाहत्यांनी लाईक्स व कमेंट्स करत चांगलाच प्रतिसाद दिला होता. तसेच काही दिवसांपूर्वी तिने “आम्ही घरी येत आहोत” असं म्हणत तिच्या पती व बाळाबरोबरचा एक फोटो शेअर केला होता.

आणखी वाचा – मोदक, लाडू, पंगत अन्…; आमिर खानच्या लेकीच्या लग्नापूर्वीच्या विधींना सुरुवात, महाराष्ट्रीयन पद्धतीने थाट, पूर्वाश्रमीच्या पत्नीची हजेरी

अशातच आता अभिनेत्रीने तिच्या सोशल मीडियावर आणखी एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टद्वारे तिने तिच्या सध्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत. सईने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर दोन स्टोरी पोस्ट शेअर केले असून या स्टोरीद्वारे तिने तिच्या आईपणाविषयी संमिश्र भावना व्यक्त केल्या आहेत. यात तिने असे म्हटले आहे की, “खूप तक्रारी आहेत, पण तरीही काहीही तक्रार नाही, मी माझ्या छोट्या परीसाठी हे सर्व आनंदाने स्वीकारत आहे, आम्ही खूप सहनशील आहोत आणि आम्ही हे करू शकतो.”

आणखी वाचा – Bigg Boss 17 : “मी त्याला ओळखते तो…”, विकी जैनने अंकिता लोखंडेवर हात उचलल्यानंतर अभिनेत्रीच्या आईची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या, “तो माझ्याबरोबर…”

यापुढे तिने आणखी एक पोस्ट शेअर करत असे म्हटले आहे की, “वेडेवाकडे वेळापत्रक, झोपेशिवायच्या अनेक रात्री, वेदनादायक टाके, दुर्गंधीयुक्त डायपर, कायम दुखणारी पाठ, सैल ओटीपोट, थकलेले शरीर आणि बरेच काही.” दरम्यान, या पोस्टद्वारे तिने मातृत्वाचा आनंदासह त्यासाठी सोसाव्या लागणाऱ्या अनेक गोष्टींचा उल्लेख केला आहे. त्याचबरोबर या गोष्टींचा ती आनंदाने उपभोग घेत आहे व तिचे मातृत्व एन्जॉय करत आहे.

Tags: entertainmententertainment newsmarathi actressmarathi entertainmentMarathi newssai lokursai lokur baby showersai lokur bigg boss
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Suraj Chavan Baby
Entertainment

सूरज चव्हाण झाला बाबा, घरी आली गोड परी, लग्नाच्या वर्षभरातच दिली गुडन्यूज

सप्टेंबर 5, 2026 | 11:03 am
Leena Bhagwat Health Update
Entertainment

मराठी अभिनेत्रीचा आवाजाशी सामना, छोटीशी सर्जरीही झाली, हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आणि…

सप्टेंबर 2, 2026 | 11:20 am
Kapil Honrao Social Media Break
Entertainment

तुलना, प्रेशर अन्…; मराठी अभिनेत्याचा मोठा निर्णय, सोशल मीडियाला केला रामराम, म्हणाला, “शर्यतीपासून…”

सप्टेंबर 2, 2026 | 9:45 am
Aali Mothi Shahani Teaser
Entertainment

हृता दुर्गुळे आणि सारंग साठ्ये यांच्या ‘आली मोठी शहाणी’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

सप्टेंबर 1, 2026 | 1:04 pm
Next Post
maharashtrachi hasyajatra fame actor arun kadam misses his grandson post shared on instagram

"बोलणं होत नाही म्हणून…", लेक सासरी गेल्यानंतर अरुण कदम यांना नातवाची येत आहे आठवण, म्हणाले, "मी व माझी बायको…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.