‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या लोकप्रिय कार्यक्रमातून महाराष्ट्राच्या घराघरांत पोहोचलेले अभिनेते म्हणजे अरुण कदम. संपूर्ण महाराष्ट्र त्यांना ‘दादूस’ या नावानेही ओळखतो. आपल्या विनोदाने चर्चेत राहणारे अरुण कदम सोशल मीडियावरदेखील तितकेच चर्चेत असतात. सोशल मीडियावर ते अनेक फोटो, व्हिडीओ शेअर करताना दिसतात. त्याचबरोबर ते त्यांच्या नातवाबरोबरचे काही खास क्षणही शेअर करत असतात. अशातच त्यांनी नुकतीच शेअर केलेली एक पोस्ट नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. (Arun Kadam On Instagram)
काही दिवसांपूर्वीच अरुण यांची लेक सुकन्या आई झाली. सुकन्याने एका गोंडस मुलाला जन्म दिला. कदम कुटुंबियांनी चिमुकल्याचं अगदी जंगी पद्धतीने स्वागत केलं. अरुण सध्या आजोबा असल्याच्या आनंद लुटत आहेत. त्याचबरोबरीने आता अरुण यांच्या नातवाच्या बारसाचे व्हिडीओ शेअर केले होते. त्यांनी बाळाचं ‘अथांग’ असं नाव ठेवलं होतं. ते लाडक्या नातवाबरोबरचे अनेक फोटो व व्हिडीओ सोशल मीडियाद्वारे शेअर करत असतात. अशातच नुकतीच त्यांनी त्यानच्या नातवाबद्दल एक खास पोस्ट शेअर केली आहे.
आणखी वाचा – “वेदना, झोप नाही अन्…”, गरोदरपणानंतर सई लोकूरची झाली आहे अशी अवस्था, म्हणाली, “घाण डायपर…”
अरुण कदम यांनी इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे त्यांच्या नातवाचे काही फोटो शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करत त्यांनी फोटोखाली एक पोस्टदेखील लिहिली आहे. यामध्ये त्यांनी असे म्हटले आहे की, “माझा नातु ठाण्यात त्याच्या घरी गेल्यामुळे आमची भेट होत नाही, बोलणंही होत नाही. मग मी व माझी बायको व्हिडिओ कॅालवर बोलतो. व्हिडीओ कॉलवर अथांग आधी आम्हाला शोधतो मग हसतो.”
दरम्यान, अरुण कदम यांच्या नातवाबरोबरच्या अनेक फोटो व व्हिडीओला चाहते भरभरून प्रतिसाद देत असतात. अशातच या फोटोलादेखील चाहत्यांनी लाईक्स व कमेंट्सद्वारे प्रतिसाद दिला आहे. याआधीही त्यांनी सई ताम्हणकर व अंगाई गातानाचा व्हिडीओ शेअर केला होता. त्यालादेखील चाहत्यांनी तुफान प्रतिसाद दिला होता.