Vanita Kharat With Husband : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रम लोकप्रिय कार्यक्रमांपैकी एक आहे. संपूर्ण जगभरात या कार्यक्रमाने प्रेक्षकांना वेड लावलं आहे. या कार्यक्रमातील कलाकारांचेही लाखो चाहते दिवाने आहेत. महाराष्ट्राबरोबरच हा कार्यक्रम सध्या संपूर्ण जगभरात प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यात व्यस्त आहे. छोट्या पडद्यावरील या विनोदी कार्यक्रमाने प्रेक्षकांच्या मनात आपले एक वेगळेच स्थान निर्माण केले आहे. गेली अनेक वर्षे हा कार्यक्रम प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. त्यामुळे या शोचे फक्त महाराष्ट्र व भारतातच नव्हे तर भारताबाहेरही अनेक चाहते आहेत. दरम्यान, या कलाकारांचे परदेश दौरे हे सतत सुरु असलेले पाहायला मिळतात. अशातच हास्यजत्रेची संपूर्ण टीम लंडन दौऱ्याला निघाली असल्याचं समोर आलं आहे.
या कार्यक्रमात प्रेक्षकांचं भरभरुन मनोरंजन करणारी अभिनेत्री वनिता खरात नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. वनिताने कोळीवाड्याची रेखा अशी स्वतःची ओळख बनवली असून ही ओळख तिने जगभरात पोहोचवली आहे. वनिताने तिच्या विनोदी अभिनयाने प्रेक्षकांची मन जिंकली आहेत. वनिता खरात गेल्या वर्षी लग्नबंधात अडकली. नवऱ्याबरोबरचे अनेक रील व्हिडीओ ती नेहमीच शेअर करताना दिसते.
![](https://marathi.itsmajja.com/wp-content/uploads/2024/11/image-42.png)
अशातच लंडनला जाताना वनिताला एअरपोर्टवर सोडायला तिचा नवरा सुमितदेखील आला होता. वनिताने सुमितबरोबरचा फोटो पोस्ट केला आहे. शिवाय सुमितनेही त्याच्या अकाउंटवर हास्यजत्रेतील कलाकारांना निरोप देतानाच व्हिडीओ पोस्ट केला आहे. सुमित नेहमीच बायकोचे लाड करताना दिसतो. कामावरुन येताच तो बरेचदा वनिताला खास स्वतःच्या हाताने माशाचं चमचमीत जेवणही बनवून देतो.
आणखी वाचा – उघड्यावरच आलिया भट्ट बदलत होती कपडे, सतत ‘तो’ व्यक्ती फेऱ्या मारु लागला अन्…; ‘तो’ भयंकर प्रकार समोर
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमाचे शो लंडनमध्ये येत्या २३ आणि २४ नोव्हेंबरला होणार आहेत. वनितासह प्रसाद खांडेकर, नम्रता संभेराव, प्रभाकर मोरे, सचिन गोस्वामी, अरुण कदम, समीर चौघुले, चेतना भट, प्रियदर्शिनी इंदलकर, ओंकार राऊत, शिवाली परब, प्रथमेश शिवलकर ही कलाकार मंडळी लंडन दौऱ्याला निघाली आहेत. एअरपोर्टवरील या कलाकारांचे एकत्र फोटोही सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.