आलिया भट्ट ही मनोरंजन सृष्टीतील एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. आजवर आलिया अनेक हिंदी तसेच हॉलिवूड चित्रपटांमध्ये दिसून आली आहे. आजवर ती अनेक चित्रपटांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना दिसते. तिला ‘गंगुबाई काठियावाडी’ या चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कारदेखील मिळाला आहे. तिचा ‘हायवे’ हा चित्रपट अधिक चर्चेत आला होता. यामध्ये आलियाबरोबर रणदीप हुड्डादेखील दिसून आला होता. दोघांची केमेस्ट्री लोकांच्या अधिक पसंतीस पडली होती. या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रसिद्ध दिग्दर्शक व निर्माते इम्तियाज अलीमे केले. या चित्रपटाच्या चित्रिकरणादरम्यान आलियाला कोणत्या समस्या आल्या होत्या याबद्दल त्याने एका कार्यक्रमामध्ये सांगितले होते. इम्तियाज नक्की काय म्हणाला? याबद्दल आपण आता जाणून घेऊया. (imtiyaz ali on alia bhatt)
इम्तियाज गोव्यातील भारतीय आंतरराष्ट्रीय फिल्म महोत्सव (IFFI) दरम्यान चित्रपटाच्या सेटवर महिलांच्या सुरक्षेसंबंधी भाष्य केले आहे. त्याने मुख्य भूमिका साकारणाऱ्या आलिया भट्टबद्दल भाष्य केले आहे. ‘हायवे’ चित्रपटातील त्याने एक घटना शेअर केली आणि यामुळे एका क्रू मेंबरला कामावरुन काढले होते.
इम्तियाजने सांगितले की, “२०१३ साली आम्ही, रणदीप व आलिया एकत्रित चित्रीकरण करत होतो. त्यावेळी कोणत्याही व्हॅनिटी व्हॅन नव्हत्या. आलियाला कपडे बदलावे लागत होते. वेगवेगळ्या जागी जावं लागायचं. एक व्यक्ती सतत आलियाच्या आसपास फिरायचा. त्यामुळे एकदा मला एका माणसाला कामावरुन काढावं लागलं होतं”.
इम्तियाजने अनेक घटना सांगितल्या आहेत. तो म्हणाला की, “आता वेळ बदलली आहे. अभिनेत्री आता सेटवर सुरक्षित आहेत”. ‘जब वी मेट’ चित्रपटादरम्यान करीना कपूरबद्दलचा अनुभवदेखील शेअर केला आहे. तो म्हणाला की, “’जब वी मेट’ चित्रपटाचे चित्रिकरण करताना एक शॉट घ्यायचा होता. त्यावेळी कॅमेरामॅनने सांगितले की एका शॉटसाठी उजेडाची गरज आहे. करीना शॉटसाठी तयार होती. रेल्वे डब्यात तिची वरची सीट होती आणि तिला झोपेत बडबडायचं होतं. मी जेव्हा तिला खाली उतरायला लावलं तोपर्यंत एक क्रू मेंबर तिच्याकडे वेगळ्या नजरेने बघत होता. मात्र करीना सीट सोडायला तयार नव्हती”, असे अनेक प्रसंग अभिनेत्रींबरोबर होत असल्याचे त्याने सांगितले आहे.