प्रत्येक महिलेला नटायला, तयार व्हायला खूप आवडतं. सुंदर, छान असा ड्रेस, साडी परिधान करायला सगळ्याच महिलांना आवडतं. सध्या तर सर्वत्र लग्नाचा सीझन सुरु आहे. त्यामुळे बऱ्याचशा महिला साडी नेसण्याला प्राधान्य देतात. काठपदर साडी, जरीची साडी, बनारसी साडी, कांजीवरम, पैठणी अशा अनेक प्रकारच्या साड्या बाजारात उपलब्ध आहेत. मात्र प्रश्न असतो तो मॅचिंग ब्लाऊजचा. हे ब्लाऊज कसे असावेत? चांगले ब्लाऊज परवडतील अशा दरात कुठे मिळतील? त्याचप्रमाणे ब्लाऊजमध्ये वेगळ्या व्हरायटी कुठे मिळतील? याबद्दल आपण आता सविस्तरपणे जाणून घेऊया. (budgetfriendly blouse collection)
साडी म्हंटलं की मॅचिंग ब्लाऊज हा हवाच. पण आता महागाई सर्वच ठिकाणी वाढलेली दिसून येते. एक ब्लाऊज शिवण्यासाठी तुमच्या खिशातून १००० रुपये हमखास जाणार. मात्र तुम्हाला हवा तसाच ब्लाऊज मिळेल की नाही? याची मात्र काहीच शाश्वती देता येत नाही. पण हवे तसे, हव्या त्या डिझाईनमध्ये आणि खिशालापण परडवतील असे ब्लाऊज तुम्हाला मिळाले तर? वाटलं ना आश्चर्य? दादरमध्ये अशी एक जागा आहे जिथे तुम्हाला रेडीमेड म्हणजेच तयार ब्लाऊज मिळतील.
दादर येथील ‘मिधा फॅशन’मध्ये तुम्हाला एका पेक्षा एक असे सुंदर ब्लाऊज कलेक्शन तुम्हाला मिळू शकेल. या ठिकाणी सुंदर, तसेच प्लस साईजमध्ये ब्लाऊज उपलब्ध आहेत. डिझायनर, ब्राइडल, पूजा, इतर कार्यक्रमासाठी स्पेशल असे ब्लाऊज तुम्हाला इथे मिळतील. ब्लाऊजची किंमत ५०० रुपयांपासून सुरु होते ते अगदी ३००० रुपयांपर्यंतचे ब्लाऊज तुम्हाला मिळू शकतील. या ठिकाणी तुम्हाला हवे तसे ब्लाऊज शिवूनदेखील मिळतील. विशेष म्हणजे तुम्हाला या ठिकाणी प्लस साईजदेखील उपलब्ध होतील.
त्यामुळे तुमच्या घरात आता कोणताही कार्यक्रम असेल आणि ब्लाऊजचं टेंशन असेल तर या दुकानामध्ये नक्की भेट द्या. यासाठी तुम्ही मिधा फॅशन, शॉप नंबर ३७, नक्षत्र शॉपिंग सेंटर, रानडे रोड, दादर पश्चिम, मुंबई या पत्त्यावर नक्की जा आणि तुम्हाला हवे तसे आणि पाहिजे त्या किंमतीमध्ये ब्लाऊज खरेदी करा.