छोट्या पडद्यावरील लोकप्रिय शो ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’चे मुख्य सूत्रधार असलेले दिग्दर्शक सचिन गोस्वामी नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. कधी त्यांच्या शोमुळे, तर कधी त्यांच्या सोशल मीडिया पोस्टमुळे. आता सचिन गोस्वामी यांनी एक फेसबुक पोस्ट करत सध्याच्या परिस्थितीवर भाष्य करताना नागरिकांनी तरुणांना योग्य समुपदेशन करण्याचे आवाहन केले आहे. (sachin goswami)
हास्य जत्रेचे दिग्दर्शक सचिन गोस्वामी हे नेहमी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून विविध घडामोडी आणि राजकीय व अनेक मुद्द्यांवर आपलं मत व्यक्त करत असतात. त्यांच्या या पोस्ट्सला नेटकरी तितकाच प्रतिसाद देत त्यांच्या पोस्टवर व्यक्त होताना दिसतात. (sachin goswami facebook post)
काय म्हणाले सचिन गोस्वामी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये… (sachin goswami facebook post)
नुकतंच सचिन गोस्वामी यांनी सध्याच्या परिस्थितीवर भाष्य केलं असून ज्यात त्यांनी देशातील तरुणांना योग्य दिशेने जाण्याचे आवाहन केले आहे. सचिन गोस्वामी त्यांच्या पोस्टमध्ये म्हणतात, “समाजात नियोजनबद्धरीतीने विष कालवणे सुरू आहे.. आता ज्याचे खरच देशावर प्रेम आहे, अशा नागरिकांनी समाजातील या विषबाधा झालेल्या आपल्या परिचयातील युवकांना योग्य समुपदेशन करुन, सत्य सांगून, वास्तवाची जाणिव करून दिली पाहिजे.. आपल्या परिसरापुरता जरी प्रयत्न केला तरी समाजातील एकोपा वाढीस मदत होईल.. आता तटस्थता उपयोगाची नाही.. आपापल्या माध्यमांनी समाज निर्विष करू या.. संवेदनशील होऊ या… माणूस होऊ या…”

सचिन गोस्वामींच्या या पोस्टला नेटकरी कंमेंट करत आपलं मत मांडण्याबरोबर ते त्यांच्या मताशी सहमत असल्याचे म्हणत आहे. लवकरच दिग्दर्शक सचिन गोस्वामी ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्याची चाहते आतुरतेने वाट पाहत आहे. (sachin goswami facebook post)
हे देखील वाचा : घरच्यांचा विरोध तरीही यशस्वी ठरली सचिन मोटे यांची प्रेमकहाणी “विरोध असला तरीही लग्न झालं पण…..”
