रविवार, एप्रिल 19, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘महाभारत’ मालिकेत ‘कुंती’ची भूमिका साकारलेली अभिनेत्री आता कसं आयुष्य जगते?, चित्रपटांमध्ये काम करणंही सोडलं अन्…

Majja Webdeskby Majja Webdesk
मार्च 19, 2024 | 4:11 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Mahabharat fame actress nazneen

‘महाभारत’ मालिकेत ‘कुंती’ची भूमिका साकारलेली अभिनेत्री आता कसं आयुष्य जगते?, चित्रपटांमध्ये काम करणंही सोडलं अन्…

बी. आर. चोप्रा यांची ‘महाभारत’ या मालिकेने  आजवर प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. १९८८ साली सुरू झालेल्या या मालिकेने प्रेक्षकांच्या घरात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. या मालिकेतील सर्व पात्र आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहेत. त्यातील एक महत्त्वाचे पात्र म्हणजे ‘कुंती’. अभिनेत्री नाजनीन यांनी यामध्ये ‘कुंती’ ची भूमिका केली होती. या भूमिकेमुळे त्यांना खूप पसंती मिळाली होती. पण या आधी त्या अनेकदा मोठ्या पडद्यावरही दिसून आल्या होत्या. सध्या नाजनीन काय करतात हे जाणून घेऊया. (Mahabharat fame actress nazneen)

‘महाभारत’मध्ये ‘कुंती’ची भूमिका करणाऱ्या नाजनीन यांनी चित्रपटांमध्येही काम केले होते. १९७२ साली तिने ‘सा-रे-गा-मा-पा’ या चित्रपटातून त्यांनी अभिनयक्षेत्रात पदार्पण केले आहे. याव्यतिरिक्त अजून दोन चित्रपटांमध्ये काम केले होते मात्र काही कारणांमुळे ते प्रदर्शित होऊ शकले नाहीत.

आणखी वाचा – “नोकरी करणाऱ्या महिला मुर्ख का?”, ‘घरोघरी मातीच्या चुली’चा प्रोमो पाहून भडकले प्रेक्षक, ‘तो’ सीन पाहून मुर्खही म्हटलं कारण…

त्यांना अनेक चित्रपटांमध्ये बहीणींच्या भूमिका मिळण्यास सुरुवात झाली. मात्र त्यांना मुख्य भूमिका करायच्या होत्या. त्यांनी आपल्या करिअरमध्ये २२ चित्रपटांमध्ये काम केले. यामध्ये अनेक बी ग्रेड चित्रपटदेखील होते. १९७४ साली त्यांनी ‘कोरा कागज’ या चित्रपटामध्ये जया बच्चन यांच्या बहिणीची भूमिका केली होती. या भूमिकेने त्यांना खूप प्रसिद्धी मिळाली. त्यानंतर १९७६ साली त्यांनी ‘चलते चलते’ व १९७७ साली त्या ‘दिलदार’ या चित्रपटामध्ये दिसून आल्या होत्या. या सर्व चित्रपटांमध्ये त्या बहिणीच्या भूमिकेमध्ये दिसून आल्या होत्या. पण ‘चलते चलते’ या चित्रपटामध्ये त्यांनी बिकिनी परिधान केली होती. तेव्हा मात्र त्या जास्तच चर्चेत आल्या होत्या. त्यांचा शेवटचा चित्रपट ‘आदमखोर’ हा होता. हा चित्रपट १९८६ साली प्रदर्शित झाला होता.

आणखी वाचा – असाही लग्नसोहळा! नंदेश उमप यांनी पत्नीसह पुन्हा केलं लग्न, शाही थाट, डिझाइनर कपड्यांनी वेधलं लक्ष, पाहुणे मंडळींची गर्दी अन्…

त्यांना चित्रपटांमध्ये हवी तशी प्रसिद्धी मिळाली नाही. त्यामुळे त्यांनी लहान पडद्यावर काम करण्याचा विचार केला. अशातच त्यांना बी. आर. चोप्रा यांची ‘महाभारत’ही मालिका मिळाली. पण या मालिकेमध्ये त्यांना आईची भूमिका मिळाली असल्याने पुढे त्यांना कधीही मुख्य भूमिका करण्यासाठी मिळाली नाही. ‘कुंती’ हे अजरामर भूमिका मिळाल्यानंतरही त्या अभिनय क्षेत्रात स्वतःला सिद्ध करु शकल्या नाहीत आणि मनोरंजन विश्वापासून पूर्णतः लांब झाल्या.

Tags: Actress Nazneenbollywood actresskuntiMahabharat
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Bigg Boss Marathi 6 Controversy
Entertainment

स्वयंपाक घरात उंदीर, टॉवेल, रेझर शेअर केले आणि…; ‘बिग बॉस मराठी ६’मधून बाहेर येताच स्पर्धकाने दाखवली परिस्थिती, म्हणाली, “स्किन इन्फेक्शन…”

एप्रिल 18, 2026 | 2:00 pm
Siddharth Venugopal actor death news
Entertainment

सुप्रसिद्ध साऊथ अभिनेत्याचे कॅन्सरने निधन, वयाच्या ४१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीला धक्का

एप्रिल 18, 2026 | 1:28 pm
Akshaya Tritiya 2026
Lifestyle

अक्षय तृतीया 2026 च्या लक्ष्मीपूजनासाठी घराची तयारी कशी कराल?, दरवाजे, खिडक्या, आरसे…

एप्रिल 18, 2026 | 12:16 pm
how sleep can impact heart health
Lifestyle

झोपेच्या कमतरतेमुळे डायबिटीस, हृदयविकार, लठ्ठपणा, मानसिक समस्यांचा धोका वाढतो, जाणून घ्या यावर उपाय…

एप्रिल 18, 2026 | 11:50 am
Next Post
Javed Akhtar on Religion

"मी नास्तिक मुस्लिम कारण…", जावेद अख्तर यांचं मोठं विधान, धर्माबाबतही केलं भाष्य, म्हणाले, "पाकिस्तानात जावे असं…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.