बुधवार, जून 17, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

असाही लग्नसोहळा! नंदेश उमप यांनी पत्नीसह पुन्हा केलं लग्न, शाही थाट, डिझाइनर कपड्यांनी वेधलं लक्ष, पाहुणे मंडळींची गर्दी अन्…

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
मार्च 19, 2024 | 2:15 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Nandesh Umap Wedding

असाही लग्नसोहळा! नंदेश उमप यांनी पत्नीसह पुन्हा केलं लग्न, शाही थाट, डिझाइनर कपड्यांनी वेधलं लक्ष, पाहुणे मंडळींची गर्दी अन्...

शाहिरी बाजातील गाणी संपूर्ण महाराष्ट्रात खूप लोकप्रिय आहेत. आपल्या महाराष्ट्राला लोकसंगीताचा वारसा लाभला आहे. हा संगीताचा वारसा मराठी कलाक्षेत्रातील कलाकार मंडळी पुढे नेताना दिसत आहेत. अशातच शाहिरी बाजासाठी लोकप्रिय असणाऱ्या गायकांच्या यादीत एका गायकाचं नाव आवर्जून घेतलं जातं. ते नाव म्हणजे नंदेश उमप. अनेक रिऍलिटी शोमधूनही नंदेश उमप हे नांव घराघरांत पोहोचलं. पोवाडा, अभंग अशी खासियत असलेल्या नंदेशने रसिक प्रेक्षकांच्या मनात घर केलं. याशिवाय त्याने त्याच्या भारदस्त आवाजाने अनेक चित्रपटांमधील गाण्यांमधून छाप पाडली आहे. (Nandesh Umap Wedding)

अशातच नंदेश उमप हे नांव सध्या चर्चेत आलेलं पाहायला मिळत आहे. नंदेश त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. नंदेश उमपच्या लग्नाला २५ वर्षे पूर्ण झाली आहेत. लग्नाच्या २५व्या वाढदिवसानिमित्त नंदेश त्याच्या पत्नीसह परत लग्नबंधनात अडकला आहे. अभिनेत्री समीरा गुजर हिने त्यांच्या लग्नाचे अनेक फोटो शेअर केले आहेत. दोघांच्या या पुनश्च शाही विवाहसोहळ्याचे अनेक फोटोही समोर आले आहेत. जवळचे कुटुंबीय, नातेवाईक व कलाकार मंडळींच्या उपस्थितीत त्याने हा लग्नसोहळा उरकला.

आणखी वाचा – “लग्नाच्या ३३ वर्षांनंतरही तो…”, आदेश बांदेकरांचा खरा स्वभाव कसा?, घरातील वागणूकीबाबत बायकोचं भाष्य, सुचित्रा म्हणाल्या, “स्वामींच्या कृपेने…”

View this post on Instagram

A post shared by Samira Gujar – Joshi (@sangesamira)

“माझ्या लाडक्या नंदेश दादा व सरिता वहिनीच्या लग्नाचा २५वा वाढदिवस. बावनकशी सोन्यासारख्या मौल्यवान जोडीचा संसाराचा रौप्य महोत्सव त्यांच्या लेकीने, आयुषीने फार सुरेख समारंभ आयोजित करत पार पाडला. हे माझेच कुटुंब आहे आणि माझे हे कुटुंब असेच आनंदात राहो आणि लोकांना आनंदी करत राहो”, असं हटके कॅप्शन अभिनेत्रीने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरुन शेअर केलेल्या पोस्टने साऱ्यांचं लक्ष वेधलं आहे.

आणखी वाचा – नवस फेडायला पोहोचले थेट कोकणात, ‘नवरा माझा नवसाचा २’च्या शूटिंगसाठी कलाकारांचा ट्रेनने प्रवास, धमाल-मस्ती अन्…

नंदेश उमप यांचे वडील शाहीर विठ्ठल उमप यांचा वारसा त्यांचा मुलगा पुढे नेत आहे. नंदेश-सरिता यांच्या विवाहसोहळ्याचे फोटो लक्ष वेधून घेत आहे. नंदेश व सरिता यांचे वरमाला घालत तसेच अंगठी घालतानाचे अनेक फोटो त्यांचे व्हायरल होतं आहेत. अभिनेत्री सुकन्या मोने यांनीही नंदेशच्या लग्नाला हजेरी लावली होती.

Tags: entertainmentmarathi singernandesh umapNandesh Umap Wedding
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Shalva Kinjawadekar new serial
Entertainment

चार महिने तीन तास वर्कआउट आणि…; भूमिकेसाठी फिटनेसकडे लक्ष देतोय मराठी अभिनेता, नव्या मालिकेत झळकणार

जून 17, 2026 | 3:39 pm
sanchita ugale suicide
Entertainment

“लोकं मला घाबरतात, माझे सगळे पैसे संपले”, आत्महत्येपूर्वी अभिनेत्री सहा महिने डिप्रेशनमध्ये, डॉक्टरांशी संवाद उघड

जून 17, 2026 | 12:15 pm
Rushi Manohar Marathi Actor
Entertainment

मराठी सिनेविश्वाचा आश्वासक नायक ऋषी मनोहर, लवकरच ‘कप बशी’ चित्रपटात दिसणार महत्त्वाच्या भूमिकेत

जून 17, 2026 | 10:52 am
sanchita ugale death reason
Entertainment

लेकीवर अत्याचार, पैशांची, इतर गोष्टींची मागणी आणि…; सुप्रसिद्ध अभिनेत्रीच्या आत्महत्येनंतर वडिलांचा मोठा खुलासा, म्हणाले…

जून 17, 2026 | 9:42 am
Next Post
Gharoghari Matichya Chuli Serial Troll

“नोकरी करणाऱ्या महिला मुर्ख का?”, ‘घरोघरी मातीच्या चुली’चा प्रोमो पाहून भडकले प्रेक्षक, ‘तो’ सीन पाहून मुर्खही म्हटलं कारण…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.