कलाकारांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जाणून घ्यायला चाहतेमंडळींना उत्सुकता लागून राहिलेली असते. त्यांच्या खासगी आयुष्यातील अनेक फोटो, व्हिडीओ ही मंडळी सोशल मीडियावरुन नेहमीच काही ना काही शेअर करत असतात. बरेचदा काही कलाकार मंडळी स्वतःहून चाहत्यांसह वैयक्तिक आयुष्याबाबतची माहिती शेअर करत असतात. तर काही कलाकार त्यांच्या कुटुंबाला लांब ठेवणं पसंत करतात. बरेचदा ही कलाकार मंडळी त्यांच्या मुलांबरोबरचे खास बॉंडिंगही शेअर करताना दिसतात. अशातच एका मराठमोळ्या आणि प्रेक्षकांच्या लाडक्या अभिनेत्याने त्याच्या लेकीबरोबरचा खास व्हिडीओ शेअर केला आहे. (Sagar Karande Daughter)
अभिनेता सागर कारंडे याने देखील त्याच्या कुटुंबाला सोशल मीडियापासून वा झगमगत्या दुनियेपासून दूर ठेवलेलं असल्याचं पाहायला मिळतं. मात्र अधूनमधून तो लेकीबरोबरचे फोटो सोशल मीडियावरुन शेअर करताना दिसतो. सागरला एक लेक असून तिचं नाव सई असे आहे. चित्रीकरणाच्या व्यस्त श्येड्युलमधून वेळात वेळ काढत तो त्याचा अमूल्य वेळ लेकीबरोबर शेअर करताना दिसतो.
अशातच सागरने त्याच्या लेकीबरोबर खास क्वालिटी टाइम शेअर करतानाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये सागर व सई एकत्र वेळ घालवत एन्जॉय करताना दिसत आहेत. या व्हिडीओखाली दिलेल्या खास कॅप्शनने साऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. “भाग्यवान असतात ते लोक ज्यांच्या घरी मुली जन्माला येतात, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे”, असं कॅप्शन देत त्याने हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये सागर त्याच्या लेकीला घेऊन मॉलमध्ये घेऊन गेला असून तिथे मॉल एक्स्प्लोर करतानाचे खास क्षण त्याने शेअर केले आहेत.
चला हवा येऊ द्या या लोकप्रिय कॉमेडी शोमधून अभिनेता सागर कारंडे घराघरांत पोहोचला. मात्र हा कार्यक्रम बंद होण्यापूर्वीच सागरने या कार्यक्रमातून एक्झिट घेतली. त्यावेळी सागरला या कार्यक्रमात चाहते मिस करताना दिसले. यानंतर आता सागरने हिंदी मालिकाविश्वात पदार्पण केले आहे. ‘मॅडनेस माचायेंगे’ या शोमध्ये आता त्याची एन्ट्री झाली आहे. हिंदीतील छोट्या पडद्यावर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आलेला ‘मॅडनेस माचायेंगे’ हा शो सध्या चांगलाच गाजत आहे. ‘मॅडनेस माचायेंगे’ हा शो हिंदी असला, तरी यामध्ये सगळेच मराठी कलाकार आपल्या विनोदाची जादू दाखवताना दिसत आहेत.