बुधवार, एप्रिल 15, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

उर्फी जावेदचा चेहराच बदलला, भयानक आजारामुळे ओळखणंही झालं कठीण, नक्की झालं तरी काय?, फोटो व्हायरल

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जून 3, 2024 | 2:47 pm
in Trending
Reading Time: 3 mins read
google-news
Uorfi Jawed face

उर्फी जावेदचा चेहराच बदलला, भयानक आजारामुळे ओळखणंही झालं कठीण, नक्की झालं तरी काय?, फोटो व्हायरल

 अतरंगी वेषामुळे उर्फी जावेद नेहमी चर्चेत असते. तिचे अनेक व्हिडीओ व फोटो नेहमीच सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. तिच्या अतरंगी पेहरावामुळे तिला अनेकदा ट्रोलिंगचादेखील सामना करावा लागला आहे. मात्र कोणाच्याही बोलण्याला न जुमानता तिने तिचे काम सुरुच ठेवले. ती स्वतःदेखील सोशल मीडियावर अधिक सक्रीय असते. त्यामधून ती काही मेकअप, कपडे याबद्दलच्या टिप्स शेअर करत असते. तसेच आपल्या ड्रेसचे व्हिडीओ व फोटोदेखील शेअर करत असते. पण अशातच आता तिचे काही फोटो पाहून तिच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. (Uorfi Jawed face)

उर्फीने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन स्वतःचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ती नेहमीपेक्षा वेगळी दिसत आहे. तिच्या डोळ्यांना व ओठांना खूप सूज आलेली दिसून येत आहे. हे फोटो पाहून नेटकऱ्यांनी ओठांवर ट्रीटमेंट केल्याचे म्हंटलं आहे. मात्र उर्फीने स्वतः शेअर करत लिहिले आहे की, “माझ्या फोटोवर अनेकांनी खूप प्रतिक्रिया दिल्या आहेत. मी फिलर्स केल्याचेही सर्वजण बोलत आहेत. पण मला खूप ॲलर्जीचा त्रास आहे. माझ्या चेहऱ्यावर नेहमी सूज असते. मी रोज अशाच अवस्थेत उठते. तसेच यामुळे मला नेहमी त्रासदेखील होतो”.

आणखी वाचा – “आपणच याला जबाबदार आहे का?”, पाणीटंचाईमुळे भडकली सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री, ‘ते’ दृश्य पाहून म्हणाली, “कोणी का बोलत नाही?”

View this post on Instagram

A post shared by Uorfi (@urf7i)

पुढे ती म्हणाली की, “फोटोमध्ये माझ्या चेहऱ्यावर जी सूज दिसत आहे ती फिलर्समुळे नाही तर ती ॲलर्जी आहे. सध्या माझी इम्युनोथेरपी सुरु आहे. पण नंतर मला जेव्हा तुम्ही सुजलेल्या चेहऱ्याने बघाल तेव्हा समजून जा की मला ॲलर्जी झाली आहे. मी नॉर्मल फिलर्स व बोटॉक्स व्यतिरिक्त काहीही केले नाही. ही ट्रीटमेंट मी वयाच्या 18व्या वर्षापासून घेत आहे. त्यामुळे मी अशा सुजलेल्या चेहऱ्याने कधी दिसले तर फिलर्स न करण्याचा सल्ला देऊ नका. अशावेळी मला तुमच्या आधाराची गरज आहे”.

आणखी वाचा – सरप्राइज, साडी दिली, डान्सही केला अन्…; रवी जाधव यांनी त्यांच्याच घरी छाया कदम यांचं केलं जंगी स्वागत, बायकोनेही केला पाहुणचार आणि…

उर्फीच्या या पोस्ट अनेक नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका नेटकऱ्याने लिहिले आहे की, “देव तुला हे सगळे सहन करण्याची ताकद देवो. आजूबाजूच्या नकारात्मकतेवर लक्ष देऊ नकोस”, दुसरा नेटकरी लिहितो की, “ऐकून वाईट वाटलं. कृपया तू काळजी घे”.

उर्फीच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर नुकतीच ती ‘लव्ह सेक्स और धोका 2’ या चित्रपटामध्ये दिसून आली होती.

Tags: dressourfi jawedpostswelling face
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Rakhi Sawant Interview
Entertainment

वडिलांचा विरोध, छोटे कपडे घालून आयटम साँग आणि…; Dramaqueen राखी सावंतचा स्ट्रगल, म्हणाली, “कोणाचा बाप बसलाय…”

एप्रिल 15, 2026 | 1:26 pm
Bobby Deol alcohol quit
Entertainment

“कुटुंबातील सदस्य घाबरले”, दीड वर्षांपासून दारूपासून दूर राहिलाय बॉलिवूड अभिनेता, लवकर थकायचा आणि…

एप्रिल 15, 2026 | 11:49 am
rakhi sawant desinger dress
Entertainment

‘बिग बॉस मराठी’च्या फिनालेसाठी १२ लाखाचा ड्रेस, राखी सावंतची जय्यत तयारी, दुबईला जाऊन…

एप्रिल 15, 2026 | 11:08 am
Salman Khan Skipped Asha Bhosle Funeral
Entertainment

Asha Bhosle Funeral : मुंबईत असूनही आशा भोसलेंच्या अंत्यसंस्काराला शाहरुख आणि सलमान खान का आले नाहीत?, कारण समोर…

एप्रिल 15, 2026 | 9:47 am
Next Post
Marathi singer and Big Boss Marathi fame Utkarsh Shinde shared a special video of his sister's wedding on social media.

"दहा भावांची एक बहीण आणि...", शिंदे कुटुंबातील लाडक्या मुलीचा शाही विवाहसोहळा संपन्न, भावंडंही भावुक, उत्कर्ष म्हणाला, "काकू गेल्यानंतर..."

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.