शुक्रवार, एप्रिल 17, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“प्रत्येकाची दोन दोन लफडी आणि…”, आशुतोषच्या जाण्याने खचली अरुंधती, पोस्ट शेअर केल्यानंतर भडकले प्रेक्षक, म्हणाले, “मालिका बघणारेही…”

Saurabh Moreby Saurabh More
मार्च 27, 2024 | 5:20 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Madhurani Prabhulkar shared post for Omkar Govardhan and Fans commented on it

"प्रत्येकाची दोन दोन लफडी आणि...", आशुतोषच्या जाण्याने खचली अरुंधती, पोस्ट शेअर केल्यानंतर भडकले प्रेक्षक, म्हणाले, "मालिका बघणारेही..."

छोट्या पडद्यावरील मालिका या  अनेक प्रेक्षकांच्या जिव्हाळ्याचा विषय असतात. आजही असा एक प्रेक्षक वर्ग आहे जो रोज नित्यनियमाने मालिका बघतो आणि त्यावर आपली प्रतिक्रिया व्यक्त करतो. मालिकेतील कथानकाचा किंवा पात्राचा स्वतःच्या आयुष्याशी संबंध लावतात. अशीच एक मालिका म्हणजे ‘आई कुठे काय करते?’. छोट्या पडद्यावरील ‘आई कुठे काय करते?’ ही मालिका गेले काही दिवस चांगलीच चर्चेत आहे. मालिकेतील आशुतोष म्हणजेच अभिनेता ओंकार गोवर्धनच्या एक्झिटवर अनेक कलाकारांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

अशातच अरुंधती म्हणजेच अभिनेत्री मधुराणी प्रभुलकरने तिची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. मधुराणीने इन्स्टाग्रामवर ओंकार गोवर्धनबरोबरचे खास पोस्ट शेअर करत असं म्हटलं आहे की, “आशुतोषचं ‘जाणं’ अनेकांना आवडलं नाही. कसं आवडेल?. आपल्याला आयुष्यात घडणाऱ्या अप्रिय घटना आवडत नाहीतच… पण त्या स्वीकाराव्या लागतातच. तसंच आशुतोष जाणं आपल्याला स्वीकारावं लागेल. अरुंधतीला आशुतोषची आठवण येत आहे, तशीच आम्हा सगळ्यांनाही ओंकारची तितकीच आठवण येत आहे”

View this post on Instagram

A post shared by Madhurani Gokhale Prabhulkar (@madhurani.prabhulkar)

आणखी वाचा – केतकी माटेगावकर नेमकं कोणाला डेट करते?, अभिनेत्रीच्या रिलेशनशिपबाबत प्रश्न विचारताच दिलं थेट उत्तर, म्हणाली, “माझ्या कुटुंबियांच्या…”

मधुराणीच्या या पोस्टखाली अनेकांनी कमेंट्सवारे आपली प्रतिक्रियाही व्यक्त केली आहे. यात अनेकांनी मालिकेबद्दल त्यांची मतं व्यक्त केली आहेत. “मला असं वाटतं आता आईने कुठंच काही करू नये. मालिकेतून ब्रेक घेत घरी थांबावं. कारण अरुंधतीचं तिसरं लग्नं आम्ही बघू शकत नाही, बंद करा ही मालिका. घटस्फोट झाला आहे, तरी सासरी राहतात आणि प्रत्येकाची दोन दोन लफडी दाखवतात हे सगळं अतार्किक आहे, तुमच्या या मालिकेत एका सुद्धा जोडप्याचे सुखी आयुष्य नाही, ही मालिका बघणारे डोक्यावर पडले आहेत” अशा अनेक नकारात्मक कमेंट्स केल्या आहेत.

आणखी वाचा – “काही दिवस १२-१३ तास सतत रडतेय आणि…”, आशुतोषच्या मृत्यूनंतर अरुंधतीने शेअर केली पोस्ट, म्हणाली, “दुखवट्याचे सीन्स…”

दरम्यान, काहींनी मात्र आशुतोष अर्थात ओंकार गोवर्धनची आम्हाला आठवण येत असल्याचेही म्हटले आहे. “अरे हे इतकं दुःखदायक आहे की, मी स्वतः काहीतरी गमावलं आहे असं मला वाटत आहे. तुम्ही दोघेही मलिकेत खुप छान काम करता. तुमची जोडी खुप छान होती. आम्हाला तुमची आठवण येईल.” अशा सकारात्मक कमेंट्स करत आम्हाला आशुतोषची कायम आठवण येईल असं म्हटलं आहे.

Tags: madhurani prabhulkarmarathi entertainment newsOmkar Govardhan
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

 bollywood bodyguards salary
Entertainment

सेलिब्रिटी त्यांच्या बॉडीगार्डला लाखो रुपये देतात का?, शाहरुख खानच्या Ex Bodyguard चा खुलासा, म्हणाला, “पगारसुद्धा…”

एप्रिल 17, 2026 | 12:55 pm
Chahatt Khanna divorce
Entertainment

लग्नासाठी धर्म बदलला, घटस्फोट घेतला आणि…; सततच्या ट्रोलिंगवर अभिनेत्री स्पष्टच बोलली, म्हणाली, “मला जबरदस्ती…”

एप्रिल 17, 2026 | 12:10 pm
Ghabadkund Movie
Entertainment

घुंगरांचा आवाज, रहस्य थरार अन्…; सोन्याच्या मोहात विहिरीत उतरले संदीप पाठक, ‘घबाडकुंड’ मिळणार का?

एप्रिल 17, 2026 | 11:15 am
Bollywood casting meeting controversy
Entertainment

ऑडिशनला बोलावलं, चुकीचा स्पर्श केला आणि…; सुप्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग, म्हणाली, “त्याने अनेक महिलांना…”

एप्रिल 17, 2026 | 10:20 am
Next Post
sunil grover on kapil sharma

"तो फक्त पब्लिसिटी स्टंट", कपिल शर्माबरोबर झालेल्या भांडणावरुन सुनील ग्रोव्हरचा मोठा खुलासा, म्हणाला, "नाटक होतं कारण…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.