गुरूवार, मे 15, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“काही दिवस १२-१३ तास सतत रडतेय आणि…”, आशुतोषच्या मृत्यूनंतर अरुंधतीने शेअर केली पोस्ट, म्हणाली, “दुखवट्याचे सीन्स…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
मार्च 27, 2024 | 4:06 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Madhurani Prabhulkar Post

"काही दिवस १२-१३ तास सतत रडतेय आणि...", आशुतोषच्या मृत्यूनंतर अरुंधतीने शेअर केली पोस्ट, म्हणाली, "दुखवट्याचे सीन्स..."

‘आई कुठे काय करते’ ही मालिका गेली सव्वाचार वर्ष प्रेक्षकांचं भरभरुन मनोरंजन करत आहे. या मालिकेतील कलाकार मंडळीही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहेत. या मालिकेमुळे अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर हिला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. अभिनेत्रीला अरुंधती या पात्रामुळे विशेष ओळख मिळाली. मात्र मालिकेत आलेल्या टर्न-ट्विस्टमुळे अभिनेत्रीला बरेचदा ट्रोलिंगचा सामनाही करावा लागला आहे. बरेचदा अभिनेत्री सोशल मीडियावरही बऱ्यापैकी सक्रिय असलेली पाहायला मिळाली आहे. (Madhurani Prabhulkar Post)

सध्या मालिकेत खूप मोठं रंजक वळण आलेलं पाहायला मिळालं. अरुंधतीचा मालिकेतील नवा प्रवास सुरु होणार असल्याचं दाखवण्यात आलं. तर अरुंधतीचा नवरा आशुतोषचा मालिकेत मृत्यू दाखवण्यात आला. आशुतोषच्या मृत्यूने सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगलेली पाहायला मिळाली. आशुतोषची मालिकेतील एक्झिट चाहत्यांच्या पसंतीस पडली नाही. तर चाहते, प्रेक्षक व कलाकार मंडळीही आशुतोषला मालिकेत मिस करताना दिसले. तर अभिनेत्री मधुराणी हिनेदेखील ओंकार गोवर्धन म्हणजेच आशुतोषसाठी खास पोस्ट शेअर करत मिस करत असल्याचं म्हटलं.

आणखी वाचा – केतकी माटेगांवकरला चाहत्याने विचारलं तिचं रिलेशनशिप स्टेटस, अभिनेत्री उत्तर देत म्हणाली, “मी माझ्या…”

View this post on Instagram

A post shared by Madhurani Gokhale Prabhulkar (@madhurani.prabhulkar)

मधुराणीने खास सीन दरम्यानचे एकत्र फोटो शेअर करत कॅप्शन देत म्हटलं की, “मधले काही दिवस कोणतीही पोस्ट करायच्या मनस्थितीमध्ये नव्हते त्यामुळे ही पोस्ट उशिराने करतेय. आशुतोषचं जाणं अनेकांना आवडलं नाही. कसं आवडेल. आपल्याला आयुष्यात घडणाऱ्या अप्रिय घटना आवडत नाहीत पण त्या स्वीकाराव्या लागतात. तसंच आशुतोषच जाणं आपल्याला स्वीकारावं लागेल. गेले अनेक दिवस दुखवट्याचे सीन करत आहे. १२/ १३ तास सलग असे काही दिवस रडत आहे. अभिनय अभिनय म्हटलं तरी तुमच्यातला एक भाग तुम्ही ओतता, काही पणाला लावता तेव्हाच तो खरा वाटतो. हे काही दिवस प्रचंड थकवणारे होते. इतके की त्याचा काही प्रमाणात तब्येतीवरही परिणाम झालाच”.

आणखी वाचा – ‘रामायण’ चित्रपटात रणबीर कपूर राम तर कौशल्याच्या भूमिकेत दिसणार ‘ही’ अभिनेत्री, ‘ॲनिमल’मध्ये साकारली होती अभिनेत्याच्या सासूची भूमिका

पुढे तिने लिहिलं आहे की, “डेलीसोपमध्ये भावनिक व्यवस्थापन करण्यासाठी बऱ्याचदा वेळ मिळत नाही. आणि त्याचे परिणाम दिसून येतात. अरुंधती आशुतोषला मिस करत आहे तशीच आम्हा सगळ्यांना ओंकारची तितकीच आठवण येत आहे. ओंकार आपल्या फालतू पासून गंभीर विषयावरच्या गप्पा, नव्वदीतील गाणी मोठमोठ्याने गाणं, विषय कुठलाही असो त्यातील तुला सखोल माहीत असणं, आणि आजूबाजूचं वातावरण हसतखेळत ठेवायचं तुझं कसब, हे सगळं मिस करत आहे. पुढे परत काम करुच. पण हा प्रवास कायम स्मरणात राहील”.

Tags: aai kuthe kay karteentertainmentMadhurani Prabhulkar Postmarathi serial
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Virat Kohli Fitness
Lifestyle

वाढतं वजन, धावायलाही अवघड, स्वतःचीच लाज वाटू लागली अन्…; विराट कोहलीने असं कमी केलं वजन

मे 15, 2025 | 7:00 pm
navri mile hitlerla serial off air
Entertainment

झी मराठी वाहिनीवरील सुप्रसिद्ध मालिका वर्षभरानंतर बंद होणार, कलाकार भावुक, म्हणाले, “इथली माणसं…”

मे 15, 2025 | 5:16 pm
kalki koechlin water birth
Entertainment

कल्की कोचलिनने पाण्यात मुलाला दिला जन्म, चुडैल म्हणून लोकांनी हिणवलं अन्…; ‘वॉटर बर्थ’ नक्की काय?

मे 15, 2025 | 3:43 pm
Tinnu Anand On Trolling
Entertainment

रस्त्यावरच्या कुत्र्यांना हॉकी स्टिकने मारण्याच्या विधानावरुन टिनू आनंद यांचं स्पष्टीकरण, म्हणाले, “कुत्र्यांनी माझ्यावर हल्ला केला तर…”

मे 15, 2025 | 3:33 pm
Next Post
bharti singh on kapil sharma show

कपिल शर्माच्या ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’मध्ये भापती सिंह दिसणार?, सतत होणाऱ्या चर्चांवर स्वतःच दिलं सडेतोड उत्तर, म्हणाली, "समोरुन फोन…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.