छोट्या पडद्यावरील ‘आई कुठे काय करते’ ही मालिका गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आले आहे. मालिकेत भलेही वारंवार ट्विस्ट पाहायला मिळत असले, तरी ही मालिका गेल्या अनेक दिवसांपासून टीआरपीच्या शर्यतीत कायम आहे. याचे कारण आहे, ते कलाकारांचा अभिनय. मालिकेतील प्रत्येक कलाकारांना व त्यांनी साकारलेल्या पात्रांना प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळत आहे. त्यातच मालिकेची मुख्य नायिका ‘अरुंधती’ची देशभरात मोठी फॅन फॉलोविंग आहे. (Madhurani Gokhale-Prabhulkar)
अभिनेत्री मधुराणी गोखले-प्रभुलकर या मालिकेत ‘अरुंधती’ हे मुख्य पात्र साकारत आहे. मालिकेतील तिच्या भूमिकेला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळत आहे. याच प्रेमाचा भाग म्हणून चाहते तिला सतत काहीना काही भेटवस्तू पाठवत असतात. अशीच एक भेटवस्तू एका चाहतीने मधुराणीला दिली असून चाहत्यांचे अभिनेत्रीवर किती प्रेम आहे, याची प्रचिती पुन्हा एकदा दिसून आली आहे. मधुराणीला एक छानसं पोर्ट्रेट भेट देण्यात आली आहे. जे पाहताना ती फारच भारावून गेली.
मधुराणीने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर या सुंदर भेटवस्तूचा व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यात तिला पाठवण्यात आलेले ते सुंदर पोर्टेटची झलक तिच्या चाहत्यांना दाखवत आहे. पुढे त्यावर लिहिलेली एक छानशी कविता सादर केली. यावेळी ही भेटवस्तू उघडताना अभिनेत्री भारावून गेली होती. हा व्हिडिओ शेअर करताना मधुराणीने एक सुंदरसं कॅप्शन देत म्हटलंय, “इतक्या प्रेमाने इतकं सुंदर पेन्टिंग कुणी करून पाठवल्यावर मन इतकं भरून येतं की डोळयातून वाहून जातं. शिल्पा पवार ह्या कलावतीचे खूप खूप आभार, आणि उदंड प्रेम.”
अभिनेत्री मधुराणी गोखले-प्रभुलकर अभिनयाबरोबरच सोशल मीडियावर सक्रिय आहे. ती तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर नेहमीच अनेक फोटोज व व्हिडिओज शेअर करत असते. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून मधुराणी तिच्या घटस्फोटाच्या चर्चांमुळे चर्चेत आली होती. (Madhurani Gokhale-Prabhulkar gifted portrait by Fan)