शनिवार, एप्रिल 18, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“अत्यंत थर्डक्लास आणि…”, फॉलोअर्स बघून काम मिळतं हे पाहून भडकला प्रसाद ओक, म्हणाला, “वेळीच ठेचलं पाहिजे…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
मे 2, 2024 | 11:51 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Prasad Oak On Influencers

"अत्यंत थर्डक्लास आणि…", फॉलोअर्स बघून काम मिळतं हे पाहून भडकला प्रसाद ओक, म्हणाला, "वेळीच ठेचलं पाहिजे…"

सोशल मीडियाचा वापर आता सर्वच क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर होताना पाहायला मिळत आहे. सोशल मीडियावर इन्फ्लुएन्सर्सचे व्हायरल होणारे रील व्हिडीओ सगळ्यांच्याच पसंतीस पडतात. ही इन्फ्लुएन्सर्स मंडळी वेगवगेळ्या विषयांवर हटके रील, व्हिडीओ बनवत तगडा असा कंटेन्ट प्रेक्षकांसाठी आणतात. प्रेक्षकवर्गही या इन्फ्लुएन्सर्सचा खूप मोठा चाहता आहे. लाखोंच्या घरात याइन्फ्लुएन्सर्सचे फॉलोअर्स असून त्यांच्यातही स्पर्धा सुरु असलेली पाहायला मिळते. सोशल मीडियावरुन ते थेट चित्रपटांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका मिळण्यापर्यंतचा या इन्फ्लुएन्सर्सचा प्रवास सुरु झाला आहे. (Prasad Oak On Influencers)

केवळ फॉलोअर्स जास्त आहेत म्हणून या इन्फ्लुएन्सर्सला मालिका, चित्रपटात अभिनयाची संधी मिळते. ही बाब अनेकदा कलाकार मंडळींना खटकली आहे. यावरुन बऱ्याच कलाकारांनी भाष्यही केलं आहे. अशातच आता अभिनेता, दिग्दर्शक प्रसाद ओक याने देखील या मुद्द्यावर त्याचं असं परखड मत मांडलं आहे. अभिनेता म्हणून प्रसादने नेहमीच प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. इतकंच नव्हे तर उत्तम दिग्दर्शक म्हणूनही प्रसादने अभिनयसृष्टीत छाप पाडली आहे. प्रसादने नुकतीच एका युट्युब चॅनेलला मुलाखत दिली.

आणखी वाचा – “भाऊ वडिलांना अग्नी देत होता आणि…”, प्रसाद ओकने सांगितली ती दुःखद घटना, म्हणाला, “त्यांना शेवटचं पाहताही आलं नाही कारण…”

View this post on Instagram

A post shared by PRASAD OAK : प्रसाद ओक (@oakprasad)

प्रसादने ‘कॉकटेल स्टुडिओ’ ‘या युट्युब चॅनेलला मुलाखत दिली. यावेळी त्याने अनेक विषयांवर भाष्य केलं. यावेळी बोलताना त्याने केवळ फॉलोर्सच्या जोरावर इन्फ्लुएन्सर्सला काम मिळतं, या मुद्द्यावर स्पष्ट मत मांडलं आहे. या मुद्द्यावर बोलताना प्रसाद म्हणाला, “दुर्दैवी आहे. अत्यंत थर्ड क्लास क्राइटेरिया आहे हा की ज्यांचे फॉलोअर्स जास्त तो चांगला किंवा मोठा अ‍ॅक्टर्स आहे. हा हिंदीवाल्यांनी आणलेला ट्रेंड आहे; जो मराठीत रुजू पाहतोय. पण तो वेळीच ठेचला गेला पाहिजे आणि तो ठेचला जाईलच”.

आणखी वाचा – मैत्रिणीचं यश पाहून प्रसाद खांडेकरने कौतुक करत लिहिलं पत्र, नम्रता संभेरावला म्हणाला, “तुझ्या कामावर विश्वास होता म्हणून…”

पुढे तो म्हणाला, “जोपर्यंत मराठीमध्ये परेश मोकाशी, आदित्य सरपोतदार, प्रवीण तरडे, मी स्वतः, रवी जाधव, विजू माने, अभिजीत पानसे अशी अनेक नावं घेता येतील माझ्या सहकारी मित्रांची जे परफॉर्मन्सवर विश्वास ठेवणारे दिग्दर्शक आहेत. तोपर्यंत या फॉलोअर्सच्या कॅटगिरीचा मराठीत काही फार फरक पडेल किंवा त्याने काही खूप मोठा बदल होईल असं मला अजिबात वाटतं नाही. हिंदीवाले ते करत आहेत. पण अखेर तो अ‍ॅक्टर्स म्हणून कसा आहे हे कळल्यानंतर ते स्वतः त्याला अनफॉलो करत असतील, असं मला वाटतं आहे”.

Tags: marathi actormarathi serialprasad oakPrasad Oak On Influencers
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

how sleep can impact heart health
Lifestyle

झोपेच्या कमतरतेमुळे डायबिटीस, हृदयविकार, लठ्ठपणा, मानसिक समस्यांचा धोका वाढतो, जाणून घ्या यावर उपाय…

एप्रिल 18, 2026 | 11:50 am
Kadambari Mali Interview
Entertainment

“१६ वर्षाचीच मुलगी Lead हवी”, लीडच्या भूमिका न मिळण्यावर मराठी अभिनेत्रीच भाष्य, म्हणाली, “फुकट काम…”

एप्रिल 18, 2026 | 11:00 am
Humidity Infections Summer health issues
Lifestyle

आजकाल तुम्हालाही ताप आणि पोटदुखीचा त्रास होतोय का?, असे होण्यामागचं कारण आहे…

एप्रिल 18, 2026 | 9:50 am
patralekhaa body shamed
Entertainment

मुलाला जन्म दिला, दोन चित्रपटांची निर्मिती आणि…; बॉडी शेमिंग करताच भडकली अभिनेत्री, म्हणाली, “माझे वजन…”

एप्रिल 17, 2026 | 5:11 pm
Next Post
Satvya Mulichi Satavi Mulgi serial update new twist

नेत्रा, अद्वैत व इंद्राणी सोडून कुटुंबातील सगळेच सदस्य रुपालीच्या ताब्यात, त्रिनयनाच्या लेकी आता पुढे काय करणार?

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.