शुक्रवार, जून 6, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

मराठी मालिकेतील प्रसिद्ध अभिनेत्रीचं थाटामाटात लग्न, पारंपरिक लूकने वेधलं लक्ष, पाहा फोटो

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
डिसेंबर 19, 2023 | 12:40 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Varada Patil Wedding

मराठी मालिकेतील प्रसिद्ध अभिनेत्रीचं थाटामाटात लग्न, पारंपरिक लूकने वेधलं लक्ष, पाहा फोटो

सध्या सर्वत्र लगीनघाई सुरु असलेली पाहायला मिळत आहे. सिनेसृष्टीतही एकामागोमाग एक कलाकार मंडळी लग्नबंधनात अडकत असल्याचं पाहायला मिळत आहे. सुरुची अडारकर-पियुष रानडे तसेच प्रसाद जवादे- अमृता देशमुख ही कलाकार मंडळी नुकतीच विवाहबंधनात अडकली. याशिवाय मुग्धा-प्रथमेश, स्वानंदी- आशिष या जोड्या लवकरच बोहोल्यावर चढणार आहेत. एकूणच सर्वत्र लग्नाचे वारे वाहत असताना आणखी एक मराठी सिनेसृष्टीतील अभिनेत्री लग्नबंधनात अडकली आहे. (Varada Patil Wedding)

‘लेक माझी दुर्गा’, ‘पुण्यश्लोक अहिल्याबाई’ या मालिकांमधून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे वरदा पाटील. छोट्या पडद्यावरून घराघरांत पोहोचलेली वरदा पाटील लग्नबंधनात अडकली असल्याचं समोर आलं आहे. वरदाने स्वतःच्या ऑफिशिअल इन्स्टाग्राम अकाउंटवरून तिच्या लग्नसोहळ्याचे फोटो शेअर केले आहेत. अगदी शाही थाटामाटात वरदाचा विवाहसोहळा संपंन्न झाला असल्याचं समोर आलं आहे.

आणखी वाचा – लग्नाच्या ३०व्या वाढदिवसानिमित्त सचिन खेडेकरांनी बायकोसह सिगारेट ओढतानाचा फोटो केला शेअर, म्हणाले, “माझ्या आयुष्यातील…”

वरदाने प्रणय पटेलसह लगीनगाठ बांधली असल्याचं समोर आलं आहे. वरदाच्या लग्नातील खास फोटोंनी साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. लग्नसाठी वरदाचा ब्राईड लूक साऱ्यांच्या विशेष पसंतीस पडला. वरदाने तिच्या लग्नात लाल रंगाचा घागरा परिधान केला होता. यांत तिचं सौंदर्य अधिकचं खुलून आलेलं दिसलं. रोमँटिक पोज देत वरदाने तिच्या पतीसह फोटो शेअर केलेले पाहायला मिळाले. वरदाच्या या पोस्टवर सिनेसृष्टीतील बऱ्याच कलाकार मंडळींनी कमेंट करत तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

View this post on Instagram

A post shared by Pranay Patel (@pranaypatell)

आणखी वाचा – “पूजेला आलेल्या भटजीसारखा…”, व्याहीभोजनाचा फोटो शेअर केल्यानंतर प्रथमेश लघाटे ट्रोल, संताप व्यक्त करत म्हणाला, “पारंपरिक गोष्टीत रोमान्स…”

‘कलर्स मराठी’ वाहिनीवरील ‘लेक माझी दुर्गा’ या मालिकेतून वरदा छोट्या पडद्यावर झळकली. या मालिकेत वरदा मुख्य भूमिकेत असलेली पाहायला मिळाली. दुर्गा ही भूमिका ती साकारत होती. मात्र वरदाने ही मालिका अर्ध्यावरून सोडलेली पाहायला मिळाली. यावेळी वरदाने मालिका सोडल्यामुळे बऱ्याच चर्चांना उधाण आलं होत. त्यानंतर मालिकेत वरदाची जागा अभिनेत्री रश्मी अनपट हिने घेतली.

Tags: entertainmentmarathi actressvarada patil actressvarada patil marriageVarada Patil Wedding
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
Bigg Boss 17 Latest News

Video : 'बिग बॉस १७' च्या घरात हाणामारी, अंकिता लोखंडे-विकी जैनने अभिषेकला जोरात ढकललं अन्…; म्हणाला, "४० वर्षांचा म्हातारा…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.