‘सारेगमप लिटल चॅम्प्स’ या कार्यक्रमातून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री जोडी म्हणजे मुग्धा वैशंपायन व प्रथमेश लघाटे. लवकरच ही जोडी लग्नबंधनात अडकणार असल्याचं समोर आलं आहे. ‘आमचं ठरलं’ म्हणत या जोडीने त्यांच्या नात्याची खुशखबर चाहत्यांसह शेअर केली होती. तेव्हापासून मुग्धा-प्रथमेशच्या लग्नाकडे साऱ्यांच्या नजरा लागून राहिल्या आहेत. मुग्धा व प्रथमेश यांच्या केळवणाचेही अनेक फोटो, व्हिडीओ पाहायला मिळाले. (Mugdha vaishampayan and prathamesh laghate)
काही दिवसांपूर्वीच मुग्धाची ‘ब्राईड टू बी’ पार्टी तिच्या मित्र मंडळींनी केली. मुग्धाच्या ‘ब्राईड टू बी’ पार्टीचे अनेक फोटोस सोशल मीडियावर पाहायला मिळाले. मुग्धा-प्रथमेश सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतात. सोशल मीडियावरून काही ना काही शेअर करून ते चाहत्यांच्या संपर्कात राहत असतात. अशातच या जोडीच्या आणखी एका पोस्टने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. मुग्धा व प्रथमेश यांनी एकत्र फोटो शेअर करत त्याखाली व्याहीभोजन असं कॅप्शन देत पोस्ट शेअर केली आहे.
या पोस्टमध्ये मुग्धा व प्रथमेश यांचा पारंपरिक अंदाज लक्षवेधी ठरला. या फोटोवरून नेटकऱ्यांनी प्रथमेशला ट्रोल केलेलं पाहायला मिळत आहे. मात्र प्रथमेशनेही नेटकऱ्याला उत्तर देत चांगलंच सुनावलेलं पाहायला मिळत आहे. नेटकऱ्याने त्यांचा पारंपरिक लूक व पोज पाहता, “मस्त जोडी आहे फक्त प्रथमेशला बोल रोमँटिक असल्यासारखं दिस. सत्यनारायणाच्या पूजेला आलेल्या भटजीसारखा उभा राहू नको. बाकी खुप छान” अशी कमेंट केली आहे. यावर उत्तर देत, “अण्णा. व्याहीभोजन ही आपली परंपरा आहे. पारंपरिक गोष्टीत कुठं रोमान्स घुसडवता राव? एवढा गोंधळ?” असं उत्तर देत चांगलंच सुनावलं आहे.
लवकरच मुग्धा व प्रथमेश लग्नबंधनात अडकणार आहेत. काही दिवसांपूर्वीच मुग्धाच्या मोठ्या बहिणीचं मृदुलच अगदी साध्या पद्धतीने विवाहसोहळा उरकला. यावेळी ही मुग्धा-प्रथमेशचा पारंपरिक लूक लक्षवेधी होता.