शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

लग्नानंतर लीलाची पहिली मंगळागौर, ऐजेंसाठी घेतला खास उखाणा, म्हणाली, “वचन देते मी तुम्हाला…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
ऑगस्ट 6, 2024 | 3:28 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Navari Mile Hitlerla New Promo lila special ukhana

नवरी मिळे हिटलरला मालिकेत साजरी झाली लीलाची मंगळागौर, उखाणा ऐकून सगळेच चक्रावले

‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘नवरी मिळे हिटलरला’ ही मालिका जेव्हापासून सुरु झाली तेव्हापासून या मालिकेने प्रेक्षकांना खुर्चीत खिळवून ठेवलं. एकूणच मालिकेत एक वेगळाच प्रवास पाहायला मिळत आहे. लग्नानंतर लीला एजेंच्या घरी चांगली रुळू लागलेली पाहायला मिळत आहे. तर आता लीलाने तिच्या तिन्ही सूनांनाही आता बोटावर नाचवायला सुरुवात केली आहे. तर इकडे एजे व लीला यांचा लुटुपुटुचा भांडण असलेला प्रवास सुरु झाला आहे. दोघेही एकमेकांची एकमेकांच्या नकळत काळजी घेताना दिसत आहेत. (Navari Mile Hitlerla New Promo)

एजे व लीला एकीकडे एकमेकांची काळजी घेताना दिसत आहेत. एजेंच्या मते ही माणुसकी असली तरी एजे यांच्याकडून लीलाची घेतली जाणारी काळजी तिला आवडू लागली आणि आता लीलानेही मनाशी ठामपणे निर्णय घेतला आहे की, मी आता यापुढे एजेंना समजून घेणार आहे. आणि याची सुरुवात तिने एजेंच्या खोलीत शिरुन केली आहे. एकत्र राहिलो तरच लीला एजेंना समजून घेईल असं तिला वाटत आहे. अशारीतीने लीला व एजेंचा हा संसार सुरु झाला.

आणखी वाचा – Bigg Boss Marathi : “रात्री असं अंथरुणात जाणं…”, सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीचा जान्हवी किल्लेकरच्या वागणूकीवर संताप, अभिजीतच्या अंगावरही चढले अन्…

View this post on Instagram

A post shared by नवरी मिळे हिटलरला (@navarimilehittlerla)

दरम्यान मालिकेत नुकतीच लीलाची लग्नानंतरची पहिली मंगळागौर साजरी करण्यात आली. लग्नानंतरच्या या पहिल्या मंगळागौरीनिमित्त लीलाचा खास अंदाज साऱ्यांच्या पसंतीस पडला. यावेळी लीलाने गुलाबी काठ असलेली अबोली रंगाच्या नऊवारी साडी नेसली होती. तर भरजरी असे दागिने तिने यावर घातले आहेत ते देखील लक्ष वेधून घेत आहेत. मंगळागौर कार्यक्रमात लीलाने घेतलेल्या भन्नाट उखाण्याने साऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. लीला या उखाण्याच्या माध्यमातून आजीला वचन देताना पाहायला मिळत आहे.

आणखी वाचा – Bigg Boss Marathi : “निक्कीला उडवा”, वर्षा उसगांवकरांचा राग काही संपेना, पण अभिजीत सावंतनेच पलटला गेम, तिला पाठिंबा देतोय कारण…

या प्रोमोमध्ये सर्व महिला मंगळगौर खेळताना दिसत आहेत. यावेळी लीला सगळ्यांसमोर उखाणा घेते की, “माझ्या लग्नाबद्दल सगळे काय ते हवं ते बोला पण हेच सत्य आहे की, मी घातलीये एजेंच्या गळ्यात वरमाळा. कोणाला आवडू दे किंवा न आवडू दे देवा मला हा संसार पेलवण्याची शक्ती दे. आजी एजेंचं नाव घेऊन वचन देते मी तुम्हाला तुमच्या प्रेमाचा मान ठेवेल ही लीला”, असा सुंदर उखाणा यावेळी लीलाने घेतला.

Tags: marathi serialNavari Mile HitlerlaNavari Mile Hitlerla New Promo
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Deepshikha Ngpal ready to marry after divorce
Entertainment

दोन घटस्फोटानंतर अजूनही तीन ते चारवेळा लग्न करण्याची दीपशिखा नागपालची इच्छा, वयाची ४५शी ओलांडून गेली तरी…

जून 7, 2025 | 1:26 pm
dipika kakar surgery
Entertainment

१४ तास ऑपरेशन, लिव्हरचाही काही भाग कापला अन्…; दीपिका कक्करची कॅन्सरशी झुंज, आता परिस्थिती अशी की…

जून 7, 2025 | 11:59 am
Next Post
Bigg Boss Marathi 5 nikki tamboli and varsha usgaonkar fight

Bigg Boss Marathi : आता वर्षा उसगांवकरच निक्की तांबोळीच्या हात धुवून पाठी, सकाळी सकाळी जुना मुद्दा उखरुन काढला अन्…; नक्की कोण चुकीचं?

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.