Bigg Boss Marathi 5 Updates : ‘बिग बॉस मराठी’ सीझन ५ सुरु झाल्यापासून अल्पावधीतच या शोने हवा केली आहे. यंदाच्या या नव्या पर्वात अगदी पहिल्याच आठवड्यात दोन गट झाले असून स्पर्धकांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळाली. यंदाच्या या नव्या पर्वात निक्की तांबोळी, वैभव चव्हाण, जान्हवी किल्लेकर, अरबाज पटेल हे स्पर्धक एका गटात तर अभिजीत सावंत, अंकिता वालावलकर, वर्षा उसगांवकर, धनंजय पोवार, सूरज चव्हाण, योगिता चव्हाण, आर्या ही मंडळी एका गटात असून खेळ खेळताना दिसत आहेत.
पहिल्या आठवड्यात या स्पर्धकांनी कॅप्टन्सी टास्क गमावला. मात्र या आठवड्यात दोन्ही गटात कॅप्टन्सी टास्कवरुन चांगलीच लढत पाहायला मिळाली. दरम्यान या करन्सी टास्कदरम्यान स्पर्धकांमध्ये राडा पाहायला मिळाला. घरातील स्पर्धकांमध्ये currency वरुन जोरदार वाद होतात आणि या वादामध्ये सर्वांचाच पारा चढतो. या टास्कमध्ये जान्हवी व निक्की अंकिता वालावलकरच्या बेडवर चढून तिची चादर ओढत तिलाही ओढताना दिसत आहेत. हे चित्र पाहून अनेकांनी जान्हवी व निक्कीला चांगलेच सुनावले आहे.
![](https://marathi.itsmajja.com/wp-content/uploads/2024/08/Screenshot-2024-08-06-121106.jpg)
घरातील हे भांडण पाहून प्रेक्षकवर्ग व ‘बिग बॉस’चे आधीचे सदस्य यावर मत मांडताना दिसत आहेत. ‘बिग बॉस’च्या आधीच्या सीझनमध्ये अभिनेत्री मीरा जगन्नाथ पाहायला मिळाली. आता मीराने इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर करत सदस्यांना चांगलाच टोला लगावला आहे. मीराने ‘बिग बॉस’च्या घरातील फोटो शेअर करत म्हटलं आहे की, “रात्री कोणाच्या ही अंथरुणात जाणं खूप चुकीचं आहे आणि ही जान्हवी”, असं म्हणत तिने अंकिताच्या बेडवर चढून भांडतानाचा फोटो पोस्ट केला आहे.
तर ही पोस्ट तिने अरबाज, निक्की, वैभव, जान्हवी यांना टॅग करुन त्यांच्यावर राग व्यक्त केला आहे. ‘बिग बॉस’च्या प्रत्येक सीझनने आजवर धुमाकूळ घातला आहे. आणि आता हा पाचवा सीझनही धुमाकूळ घालायला सज्ज होणार आहे. आता या आठवड्यात कॅप्टन्सीची बुलेट ट्रेन हा टास्क रंगला ससून या आठवड्यात कॅप्टन कोण होणार हे पाहणं रंजक ठरणार आहे.