Bigg Boss Marathi 5 Updates : ‘बिग बॉस मराठी’च्या नव्या पर्वाने साऱ्यांना वेड लावलं आहे. अल्पावधीतच हा रिऍलिटी शो प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. सर्वत्र या कार्यक्रमाची चर्चा सुरु असलेली पाहायला मिळत आहे. तर ट्रॉफी जिंकण्यासाठी स्पर्धकांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. टास्क साठी स्पर्धकांची होणारी बैठक, भांडण हे सार प्रेक्षकांना पाहणं रंजक ठरत आहे. अशातच आता ‘बिग बॉस मराठी’ सीझन ५ मध्ये दोन गट झालेले पाहायला मिळत आहे. ‘बिग बॉस मराठीच्या नव्या पर्वातील सर्वच स्पर्धकांनी पहिलाच आठवडा अगदी गाजवला. पहिल्याच आठवड्यात एकमेकांशी जुळून न घेता त्यांनी लढाई करण्यास सुरुवात केली.
दरम्यान भाऊचा धक्कामध्ये रितेश देशमुख याने स्पर्धकांची चांगलीच शाळा घेतली. स्पर्धकांमध्ये चाललेलं भांडण, वाद पाहून रितेशने चुका असणाऱ्या साऱ्यांना सुनावलं आणि जे स्पर्धक खेळत नाही आहेत त्यांना खेळ खेळण्यास प्रवृत्त केलं. पहिल्याच आठवड्यात या सीझनच्या सर्वच स्पर्धकांना कॅप्टन्सी टास्कला मुकावं लागलं. स्पर्धकांच्या चुकीमुळे सर्व स्पर्धकांना कॅप्टन्सी टास्क खेळता आला नाही मात्र आता या सर्व स्पर्धकांना दुसऱ्या आठवड्यात कोण कॅप्टन होणार याची साऱ्यांना उत्सुकता लागून राहिली आहे.
‘बिग बॉस मराठी’ सीझन ५मध्ये दुसऱ्या आठवड्यात कॅप्टन्सी टास्कमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. दोन गटांमध्ये कॅप्टन्सी टास्कवरुन नेमकं कोण जिंकणार याची साऱ्यांना उत्सुकता लागून राहिली आहे. अशातच समोर आलेल्या प्रोमोमध्ये असं पाहायला मिळत आहे की, दोन्ही गट आपापल्या परीने प्लॅनिंग करताना दिसत आहेत. यावेळी अंकिता म्हणते, “आता मोटरमन बनण्यासाठी ते दोघे पावरफुल आहेत तर तेच बनणार आता आपल्याला निक्कीला आउट करावं लागेल”. यावर अभिजीत म्हणतो, “नाही. निक्कीला नको. निक्कीला ठेवावं लागेल”. यावर वर्षा ताई म्हणतात, “कशाला?”.
अभिजीत वर्षा ताई यांना समाजवत म्हणतो, “ते आपण बघूया”. यावर वर्षा ताई म्हणतात, “मला असं वाटत निक्कीला आपण उडवलं पाहिजे. आता तिचं खच्चीकरण करायला हवं”.यावर अभिजीत म्हणतो, “आता नको यासाठी की निक्की त्या दोघांना कंट्रोलमध्ये ठेवू शकते. आणि सगळं कंट्रोलमध्ये ठेवायचं असेल तर निक्कीला ठेवावं लागेल”. तर इकडे दुसऱ्या गटात, जान्हवी अरबाज व वैभवला अभिजीतला “आधी काढा”, असं म्हणते. तर इकडे अभिजीत सर्वांना, घाबरु नका. काही झालं तर ‘बिग बॉस आहेत असं म्हणत त्यांना धीर देताना दिसत आहे. त्याचवेळी सूरजलाही ते समजावत आहेत की, “काही झालं तरी हात उचलायचा नाही, तोंडाने किती काही हवं ते बोल”.