कॉमेडीची बुलेट ट्रेन, फूबाईफू आणि महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमातून विनोदी अभिनेत्री विशाखा सुभेदार घरोघरी पोहोचली आहे. तसेच विशाखाने मराठी आणि हिंदी सिनेमांमध्ये काम केले असून तिने एक डाव भटाचा, जाऊ बाई जोरात, मी कात टाकली, भटाची बायपास, शांतेच कार्ट चालू आहे यांसारख्या नाटकांमध्ये काम केले आहे. नुकतीच विशाखाने सोशल मीडियावर कुर्रर्रर्र या नाटकाची पोस्ट शेअर केली असून त्या पोस्टला “विस्सा गावला रं गावला.. कुर्रर्रर्रर्र करताय अमेरिका टूर्रर्रर्रर्र” असे कॅप्शन दिले आहे.(vishakha subhedar kurrrr drama)

कुर्रर्रर्र या नाटकाचे १०० प्रयोग यशस्वीरित्या पार पडल्यांनंतर आता या नाटकाचा दौरा अमेरिकेला जाऊन पोहोचला आहे. याबद्दलची माहिती विशाखा सुभेदार हिने पोस्टद्वारे शेअर केली आहे. हे नाटक विनोदी प्रकारचं असून या नाटकामध्ये विशाखा सुभेदार सोबतच पॅडी कांबळे, नम्रता संभेराव आणि प्रसाद खांडेकर हे कलाकार आहेत. प्रसादने या नाटकात अभिनयासोबतच या नाटकाचे लेखन सुद्धा केले आहे.
====
हे देखील वाचा- नागराज आण्णांना चित्रपटात कास्ट करण्याची अनुराग कश्यपची इच्छा
====
मराठी नाटकाचे आता बाहेरगावी बऱ्यापैकी प्रयोग सुरु आहेत. अशातच आता कुर्रर्रर्र या नाटकाचा प्रयोग पहिल्यांदाच बाहेर गावी होणार असल्याने, कुर्रर्रर्र या नाटकाचे कलाकार त्यांचा आनंद विशाखाने शेअर केलेल्या फोटोमधून व्यक्त करताना दिसत आहेत.(vishakha subhedar kurrrr drama)