बुधवार, एप्रिल 15, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

अवाढव्य खर्च, शाही थाटमाट अन्…; आरती सिंह व दीपक चौहान यांचा विवाहसोहळा संपन्न, नववधूच्या लूकची होतेय चर्चा

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
एप्रिल 26, 2024 | 10:10 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Aarti Singh And Dipak Chauhan Wedding

अवाढव्य खर्च, शाही थाटमाट अन्…; आरती सिंह व दीपक चौहान यांचा विवाहसोहळा संपन्न, नववधूच्या लूकची होतेय चर्चा

बऱ्याच दिवसांपासून कलाविश्वात एकामागोमाग एक कलाकार मंडळी लग्नबंधनात अडकत आहेत. अशातच गोविंदाची भाची व कृष्णा अभिषेकची बहीण आरती सिंहच्या लग्नाची बरेच दिवसांपासून चर्चा सुरु होती. अखेर आरती सिंह लग्नबंधनात अडकली आहे. मुंबईतील जुहू येथील इस्कॉन मंदिरात आरती सिंह व दीपक चौहान यांनी लग्नगाठ बांधली. अगदी शाही थाटामाटात दोघांचा लग्नसोहळा पार पडला. आरतीचा भाऊ कृष्णा अभिषेकसह अनेक सेलिब्रिटींनी या लग्नाला हजेरी लावली होती. (Aarti Singh And Dipak Chauhan Wedding)

बहिणीच्या लग्नात कृष्णा अभिषेकच्या खास लूकची विशेष चर्चा रंगली. पत्नी कश्मिराबरोबर तो पांढऱ्या रंगांच्या मॅचिंग कपड्यांमध्ये दिसला. बहिणीच्या लग्नात तो खूपच भावुकही झालेला पाहायला मिळाला. त्यांची दोन्ही मुलंही मॅचिंग शेरवानीमध्ये पापाराझींना फोटो देताना दिसली. आरती व दीपक एका नवविवाहित जोडप्याच्या रुपात पहिल्यांदाच मीडियासमोर आले आणि रिसेप्शनच्या बाहेर उभ्या असलेल्या पापाराझींना पोज दिली. यावेळी पोझ देताना आरतीने तिच्या पतीच्या खांद्यावर हात ठेवला. त्यानंतर आरतीने पापाराझींचे हात जोडून स्वागत केले आणि तिच्या लग्नाच्या या सोहळ्याचा भाग झाल्याने त्यांचे आभार मानले.

आणखी वाचा – अहिल्यादेवींना वाचवून पारूचा जीव धोक्यात, प्रकृती गंभीर असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं अन्…; आदित्य तिला वाचवू शकेल का?

View this post on Instagram

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

कमीतकमी मेकअपसह लाल रंगाच्या वधूच्या लेहेंग्यात आरती खूपच सुंदर दिसत होती. तर नवरा मुलगाही पांढऱ्या रंगाच्या शेरवानीमध्ये उठून दिसत होता. आरतीचा लेहेंगा पाहून नेटकरीही खूप प्रभावित झाले आणि त्यांनी तिची खूप प्रशंसा केली. आरती व दीपक यांच्या लग्नाची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली. या नववधूवराच्या हटके लूकने साऱ्यांच्या मनात घर केलं.

आणखी वाचा – आईने फसवलं, पतीकडून विश्वासघात अन् मुलींनीही सोडली साथ ; सचिन पिळगांवकरांबरोबर दिसलेली ‘ही’ सुप्रसिद्ध अभिनेत्री जगत आहे एकाकी जीवन

आरती व दीपक यांनी काल रात्री एका भव्य संगीत सोहळ्याचे आयोजन केले होते आणि त्यात अंकिता लोखंडे आणि तिचा पती विकी जैन, माहिरा शर्मा, युविका चौधरी, भारती सिंग यांच्यासह अनेक टीव्ही सेलिब्रिटी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे बरेच व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आले आहेत आणि चाहते आरतीच्या लग्नातील व्हिडीओला भरभरून प्रतिसाद देत आहेत. पापाराझींनी शेअर केलेल्या इंस्टाग्रामवरील पोस्टमध्ये आरती दीपकसह केक कापताना दिसली.

Tags: Aarti Singh And Dipak ChauhanAarti Singh And Dipak Chauhan Weddingentertainmentkrushna abhishek sister wedding
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Rakhi Sawant and Raqesh Bapat bonding
Entertainment

“मला माझा संसार हवाय”, राकेश बापटच्या एकतर्फी प्रेमात आहे राखी, म्हणाली, “मी बॉलिवूड सोडेन”

एप्रिल 15, 2026 | 4:38 pm
Rakhi Sawant Interview
Entertainment

वडिलांचा विरोध, छोटे कपडे घालून आयटम साँग आणि…; Dramaqueen राखी सावंतचा स्ट्रगल, म्हणाली, “कोणाचा बाप बसलाय…”

एप्रिल 15, 2026 | 1:26 pm
Bobby Deol alcohol quit
Entertainment

“कुटुंबातील सदस्य घाबरले”, दीड वर्षांपासून दारूपासून दूर राहिलाय बॉलिवूड अभिनेता, लवकर थकायचा आणि…

एप्रिल 15, 2026 | 11:49 am
rakhi sawant desinger dress
Entertainment

‘बिग बॉस मराठी’च्या फिनालेसाठी १२ लाखाचा ड्रेस, राखी सावंतची जय्यत तयारी, दुबईला जाऊन…

एप्रिल 15, 2026 | 11:08 am
Next Post
Govinda At Aarti singh Wedding

भाचीच्या लग्नात मामाचीचं हवा! अखेर आरती सिंहच्या लग्नात पोहोचला गोविंदा, मीडियासमोर येत म्हणाला, "देवाकडे प्रार्थना करतो की…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.