शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

कोकण रेल्वेमध्ये मोठी भरती, शैक्षणिक पात्रत किती?, कधीपर्यंत अर्ज भरता येणार?, ५६.१०० पर्यंत वेतन मिळणार

Majja Webdeskby Majja Webdesk
मे 17, 2024 | 4:52 pm
in Trending
Reading Time: 1 min read
google-news
Konkan Railway is going to recruit for various posts know more about this see the details

कोकण रेल्वेमध्ये मोठी भरती, शैक्षणिक पात्रत किती?, कधीपर्यंत अर्ज भरता येणार?, ५६.१०० पर्यंत वेतन मिळणार

तुम्ही सध्या बेरोजगार असेल किंवा तुम्ही एखाद्या चांगल्या नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी नोकरीची सुवर्णसंधी आहे. भारतीय रेल्वे अंतर्गत विविध पदांची भरती केली जाते. सध्या कोकण रेल्वेमध्ये विविध रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. नोकरीसाठी उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. सदर भरतीच्या माध्यमातून नेमकी कोणती आणि किती पदे भरली जाणार आहेत, या नोकरीसाठी अर्ज कुणी करावा, किंवा त्यासाठी शैक्षणिक पात्रता, निवड पद्धती आणि अर्जाची अंतिम तारीख काय आहे? याबद्दल सर्व माहिती तुम्हाला या बातमीमध्ये मिळेल.

या भरती प्रक्रियेची सर्वात विशेष बाब म्हणजे कोणत्याही प्रकारची परीक्षा उमेदवारांना द्यावी लागणार नाही. थेट मुलाखतीद्वारे उमेदवाराची निवड केली जाणार आहे. या भरती प्रक्रियेची अधिसूचनादेखील प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची सोपी प्रक्रिया काय आहे? जाणून घ्या…

आणखी वाचा – Video : …अन् ‘ती’ बातमी कळताच कार्तिकी गाडकवाडची सासू आनंदाने उड्या मारु लागली, आई झाल्यानंतर शेअर केलेला व्हिडीओ चर्चेत

  • AEE/करार या पदासाठी एकूण तीन पदांवर भरती करण्यात येणार आहे. या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स/मेकॅनिकल इंजिनीयरिंगमधील पदवी / डिप्लोमा असणे आवश्यक आहे. यासाठी ५६,१००/- रुपये इतके वेतन देण्यात येईल.
  • वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक/इलेक्ट्रिकल या पदासाठी एकूण तीन पदांवर भरती करण्यात येणार आहे. यासाठी शैक्षणिक पात्रता इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स/मेकॅनिकल इंजिनीयरिंगमधील पदवी/डिप्लोमा असणे आवश्यक आहे. तर या पदावर उमेदवारांची निवड झाल्यानंतर त्यांना ४४,९००/- रुपये इतके वेतन देण्यात येईल.
  • ज्युनियर तांत्रिक सहाय्यक/इलेक्ट्रिकल या पदासाठी एकूण १५ पदांवर भरती करण्यात येणार आहे. तर यासाठी उमेदवाराकडे इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स/मेकॅनिकल इंजिनीयरिंगमधील पदवी/डिप्लोमा असणे आवश्यक आहे. तर या पदासाठीच्या उमेदवारांसाठी ३५,४००/- रुपये इतके वेतन देण्यात येणार आहे.
  • ज्युनियर तांत्रिक सहाय्यक/सिव्हिल या पदासाठी एकूण चार पदांवर भरती करण्यात येणार आहे. यासाठी ITI (ड्राफ्ट्समन (इलेक्ट्रिकल)/इलेक्ट्रिकल इंजिनीयरिंग डिप्लोमा असणे आवश्यक आहे. या पदासाठी उमेदवारांची निवड झाल्यानंतर त्यांना ३५,४००/- रुपये इतके वेतन देण्यात येईल.
  • डिझाईन असिस्टंट/इलेक्ट्रिकल या पदासाठी एकूण दोन पदांवर भरती करण्यात येणार आहे. तर या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे कोणत्याही ट्रेडमधील मान्यताप्राप्त संस्थेतून ITI शिक्षण असावे. या पदावर उमेदवारांची निवड झाल्यानंतर त्यांना ३५,४००/- रुपये इतके वेतन देण्यात येईल.
  • तांत्रिक सहाय्यक/इलेक्ट्रिकल या पदासाठी एकूण १५ पदांवर भरती करण्यात येणार आहे. या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स/मेकॅनिकल इंजिनीयरिंगमधील पदवी/डिप्लोमा असणे आवश्यक आहे. यासाठी २५,५००/- रुपये इतके वेतन देण्यात येईल.

आणखी वाचा – ‘आई कुठे…’कडे प्रेक्षकांची पाठ, तर ‘ठरलं तर मग’च टीआरपीमध्ये पुढे, ‘पारू’ मालिकेचा टीआरपी नक्की किती?, संपूर्ण यादी समोर

यासाठी पात्र उमेदवारांना एक्झिक्युटिव्ह क्लब, कोकण रेल्वे विहार, कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडजवळ, सीवूड्स रेल्वे स्टेशन, सेक्टर-४०, सीवूड्स (पश्चिम), नवी मुंबई या पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर राहावे लागेल. या नोकरीच्या मुलाखती या ५ जून २०२४ ते २१ जून २०२४ दरम्यान घेण्यात येणार आहेत. ५, १०, १२, १४, १९, २१, २४ या दिवशी मुलाखती होणार आहेत. या नोकरीसंबंधी अधिक माहितीसाठी उमेदवारांनी कोकण रेल्वेच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी. 

Tags: Job Recruitment Marathi NewsKonkan Railway Job RecruitmentKonkan Railway Job Recruitment News
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
Aai Kuthe Kay Karte Promo

अरुंधतीने घर सोडून जाण्यासाठी संजनाचा आरडाओरडा, नको नको ते सुनावलं, आता काय निर्णय घेणार?

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.