शुक्रवार, जून 6, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Kolkata Rape Case प्रकरणी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्याची थेट पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांना विनंती, म्हणाला, “जसं राम मंदीर उभारण्यात आलं तसं…”

Saurabh Moreby Saurabh More
ऑगस्ट 18, 2024 | 2:42 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Omkar Raut on Kolkata Rape Case

Kolkata Rape Case प्रकरणी 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेता ओंकार राऊतची पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांना विनंती, म्हणाला...

Kolkata Rape Case : कोलकाता डॉक्टरच्या बलात्कार व हत्येच्या प्रकरणामुळे संपूर्ण देशभरातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. ९ ऑगस्टला घडलेल्या या घटनेनंतर देशभरात ठिकठिकाणी निषेध, आंदोलनं होतं आहेत. याप्रकरणातील तरुणीला न्याय मिळण्याकरिता अनेक नागरिक रस्त्यावर उतरले आहेत. कलाक्षेत्रातून घटनेचा निषेध करून आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी केली जात आहे. या प्रकरणानंतर संपूर्ण देश हादरला आहे. आपला राग, आपला आक्रोश, आपली चीड हे कलाकार सोशल मीडिया पोस्टद्वारे व्यक्त करताना दिसत आहेत. (Onkar Raut on Kolkata Rape Case)

या लज्जास्पद घटनेबाबत आता सर्वसामान्यांसोबतच सेलिब्रेटीही आवाज उचलत आहेत. त्यात केवळ बॉलिवूडकरांचाच नव्हे तर मराठी सेलिब्रेटींचाही समावेश असलेला पाहायला मिळतोय. अशातच आता पीडित डॉक्टर तरुणीला न्याय मिळावा यासाठी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिननेता ओंकार राऊतने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत पीडितेच्या न्यायाबद्दल मागणी केली आहे.

ओंकारने इन्स्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने असं म्हटलं आहे की, “जसं ३७० हटवला गेला, जसं राम मंदीर उभारण्यात आलं, जसा अटल सेतु बांधण्यात आला, जसा कोस्टल रोड बनत आहे. तसंच बलात्कार करणाऱ्याला फाशी ही शिक्षा देण्यात यावी आणि तसा कायदा करण्यात यावा. ही सरकारला विनंती”. यापुढे त्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मेन्शन करत “तुम्हाला हे अगदीच शक्य आहे” असं त्याने म्हटलं आहे.

आणखी वाचा – Satvya Mulichi Satavi Mulgi मालिकेत शतग्रीवचा राक्षसाचा राजाध्यक्षांच्या घरात प्रवेश, नवीन कथानक पाहून प्रेक्षक नाराज, म्हणाले, “काय बालिशपणा…”

कोलकता येथे ९ ऑगस्ट रोजी झालेल्या डॉक्टरवरील अत्याचार प्रकरणामुळे देशात जागोजागी संतापाची लाट उसळली आहे. ज्या ठिकाणी पालक आपल्या मुलांना मोठ्या विश्वासाने शिकायला पाठवतात. जिथे त्यांच्या सुरक्षेची हमी दिली जाते अशा ठिकाणीच या घटना घडल्यामुळे मुलींच्या सुरक्षतेचा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित झाला आहे.

आणखी वाचा – Bigg Boss Marathi : वर्षा उसगांवकरांच्या मातृत्वाबद्दल बोलल्यावरुन रितेशकडून निक्कीची चांगलीच कानउघडणी, म्हणाला, “तुम्ही एक स्त्री असूनही…”

दरम्यान,कोलकाता बलात्कार प्रकरणावर सिद्धार्थ चांदेकर, हेमांगी कवी, सई ताम्हणकर, समीर विद्वांस, जिनिलीया देशमुख, नेहा शितोळे, अनघा अतुल, अमित रेखी, हेमंत ढोमे, मंजिरी ओक, रोहित परशुराम यांसारख्या अनेक मराठी कलाकारांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. तसंच प्रीती झिंटा, समंथा रुथ प्रभू, क्रिती सेनॉन, आलिया भट्ट, हृतिक रोशन, ट्विंकल खन्ना यांसारख्या अनेक बॉलिवूड कलाकारांनीही आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.       

Tags: kolkata rape caseOmkar RautOmkar Raut on Kolkata Rape
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
Marathi movie Yek Number poster released Produced by actress Tejaswini pandit

तेजस्विनी पंडितच्या नवीन चित्रपटाची घोषणा, “मी महाराष्ट्राचा, महाराष्ट्र माझा” लिहिलेल्या हिरोची चर्चा, पोस्टरने वेधलं लक्ष

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.