मराठी रील स्टार कोकण हार्टेड गर्ल म्हणजे अंकिता वालावलकर तिच्या रील्समुळे सतत चर्चेत असते. ती तिच्या युट्युब चॅनेल व सोशल मीडियाद्वारे विविध व्हिडीओज व रील्स शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहते. कधी तिच्या व्हिडीओचे कौतुक होते, तर कधी ती ट्रोलर्सची शिकार होताना दिसते. मध्यंतरी, तिच्या राजकीय प्रवेशाबाबत अनेक चर्चा सुरु झाल्या होत्या. अशातच, तिच्या एका व्हिडिओची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होताना दिसत आहे. (Kokanhearted Girl chat with Madhuri Dixit)
अंकिता उत्तम रिल स्टारबरोबरच एक उत्तम निवेदिका देखील असून ती ही भूमिका अत्यंत चोखपणे पार पडते. नुकताच झी मराठी पुरस्कार सोहळा संपन्न झाला, यावेळी अंकिताने निवेदिकेची भूमिका साकारत सर्वांशी संवाद साधला. बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षित हिने नुकतीच हजेरी लावली होती. यावेळी अंकिता आणि माधुरीमध्ये मराठीत संवाद होताना दिसत आहे. तिने हा व्हिडीओ इंस्टाग्रामवर शेअर केला, जो सध्या चर्चेत आला आहे. पण याच व्हिडिओवर एकाने कमेंटद्वारे ट्रोल केलं असून त्या ट्रोलरला तिने सडेतोड उत्तर दिलं.
समोर आलेल्या या व्हिडीओत दोघींमध्ये मालवणी भाषेत संभाषण पाहायला मिळत आहे. दोघींच्या संभाषणाला सुरुवात करतात ती “माझाच धकधक जाता” असं म्हणत दोन मिनिटे थांबते. त्यानंतर ती माधुरीला असा प्रश्न विचारते की, “सहसा आपण बोलतो की, मला जर आज मुलगी असती, तर तिने हे काम केलं असतं. तुमच्या घरी तर तुम्हाला दोन मुलं आहे. तर घरच्या कार्यांमध्ये त्यांचा सहभाग कसा असतो?” यावर उत्तर देताना ती म्हणाली, “खूप असतो. कारण, माझ्या मुलांना काही काम दिलं तरी ते करतात. आणि मी याबाबतीत खूप भाग्यवान आहे की, माझा नवरा उत्साही असतो आणि तो सर्व कार्यात सगळी मदत करतो. तो दिसायला पण खूप सुंदर आहे.”
हे देखील वाचा – ‘जुळून येती रेशीमगाठी’चा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार?, प्राजक्ता माळी व ललित प्रभाकरच्या व्हिडीओने वेधलं लक्ष
पुढे अंकिता माधुरीला सांगते की, “माझ्या बाबांनी तुम्हाला एक निरोप दिला की, आता तुमची मुलं लहान आहेत. पण जर नेने कुटुंबियांमध्ये जर कोण व्यक्ती लग्नाचं असेल, तर तुम्ही सासूबाई म्हणून आम्हाला पसंत आहात.” यावर माधुरी हसताना दिसते. पुढे ती माधुरीला कोकणात आल्याचं सांगताना म्हणते, “मागे तुम्ही कोकणात येऊन गेला. तिथे काजू वगैरे घेतला, ते आम्ही दुसऱ्या दिवशी पेपरला वाचलं. जेव्हा पुढच्या वेळेस तुम्ही याल, तेव्हा आम्हाला नक्की सांगा.”, असं म्हणत ती माधुरी पोझ घेण्यासाठी उभ्या राहतात.हे देखील वाचा –
हे देखील वाचा – Video : …अन् ‘आई कुठे…’मधील कांचन आजीला ‘ती’ अभिनेत्री मिठी मारुन ढसाढसा रडू लागली, म्हणाली, “नाराज होते, चिडते आणि…”

तिने या व्हिडिओला “कशे वाटले पोजी”, असं कॅप्शन दिलं. दरम्यान, तिचा हा व्हिडीओ नेटकऱ्यांच्या चांगलाच पसंतीस उतरताना दिसत आहे. मात्र काही नेटकऱ्यांना ते खटकला असून नेटकरी तिला ट्रोल करत आहे. एक नेटकरी यावर ट्रोल करत अशी कमेंट केली की, “नशीब अशी कमेंट कोणी केली नाही की, ‘पैसे घेऊन निवेदिका म्हणून काम करणारीला कसला स्वाभिमान आला?'”. त्यावर तिने “कसं आहे काका, मला जे म्हणायचं आहे ते तुम्हाला कळलं असतं. तर आज तुम्ही कंमेंट करणाऱ्या कम्युनिटी मध्ये नसता. असो, दिवाळी आहे. जळा”, असं सडेतोड उत्तर दिलं. तिच्या या उत्तरावर चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केला.