‘झी मराठी’वरील लोकप्रिय मालिकेतील ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ ही मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. मालिकेत अक्षरा व अधिपतीच्या बॉण्डिंगवर चाहते भरभरुन प्रेम करताना दिसतात. मालिकेतील अधिपती म्हणजेच अभिनेता हृषीकेश शेलार याच्या या मालिकेतील भूमिकेने प्रेक्षकांचं मनं जिंकलं. या मालिकेतील अधिपतीच्या संवादाने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं आहे. हृषिकेशने या मालिकेआधी ‘सुंदरा मनामध्ये भरली’ मालिकेत दौलतची भूमिका साकारली होती. (Hrishikesh Shelar Wife)
या मालिकेतील दौलत रसिकांच्या चांगलाच पसंतीस उतरला. हृषीकेश शेलार हा विवाहित असून त्याच्या पत्नीचे नाव स्नेहा काटे शेलार असे आहे. हृषिकेशची पत्नी स्नेहा ही देखील एक उत्तम अभिनेत्री आहे. दोघांच्या लग्नाचीही बरीच चर्चा सोशल मीडियावर रंगलेली पाहायला मिळाली. गेल्यावर्षी ही जोडी पुन्हा एकदा चर्चेत आलेली पाहायला मिळाली. हृषीकेश व स्नेहाने मागील वर्षी चाहत्यांशी गुडन्यूज शेअर केली. दोघांनी आई-बाबा झाल्याची आनंदाची बातमी दिली. त्यांच्या लेकीचं नाव रुही असे आहे.
स्नेहा हिची बहीण देखील अभिनयक्षेत्रात कार्यरत आहे. अभिनेत्री काजल काटे असे तिच्या बहिणीचे नाव आहे. काजलदेखील अभिनेत्री असून आजवर तिने अनेक मालिकांमधून महत्त्वपूर्ण भूमिका साकारत प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. आजवर मालिकांमधून दोन्ही बहिणींचा अभिनय प्रेक्षकांनी पाहिला आहे. एव्हढंच नाही तर, काजल मॉडेलिंगससुद्धा करते. स्नेहाने ‘स्वराज्य जननी जिजामाता’, ‘एक महानायक डॉ. बी. आर. आंबेडकर’ या मालिकांमधून आपल्या अभिनयाची छाप प्रेक्षकांच्या मनावर पाडली आहे. ती अभिनयाच्या माध्यमातून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवत असतानाच अभिनेता हृषीकेश शेलारसह लग्नबंधनात अडकली.
स्नेहाने आता मालिकाविश्वातून ब्रेक घेतला आहे. बाळाला जन्म दिल्यानंतर तिने मालिकांमधून कामासाठी ब्रेक घेतला आहे. पण आता स्नेहा पुन्हा एकदा त्याच नव्या दमात, नव्या जोशात, अभिनय करायला केव्हा सज्ज होणार याकडे साऱ्यांच्या नजरा लागून राहिल्या आहेत.