अभिनेता आमिर खान व त्याची पत्नी किरण राव दोघेही त्यांच्या कौटुंबिक नात्यामुळे चर्चेत असतात. लग्नाच्या १६ वर्षानंतर दोघांनीही संगनमताने घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. मात्र विभक्त झाल्यानंतर दोघेही अनेक कार्यक्रमांमध्ये एकत्र हजेरी लावताना दिसले. नुकतेच दोघेही ‘लापता लेडीज’च्या प्रमोशनदरम्यान एकत्र पाहायला मिळाले. किरण सध्या या चित्रपटाची दिगदर्शिका म्हणून काम पाहत आहे. सुमारे ११ वर्षानंतर तिने चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा हाती घेतली. नुकतेच किरणने आपल्या खासगी व व्यावसायिक आयुष्यावर भाष्य केले आहे. (kiran rao on aamir khan)
काही अंतर्गत मतभेदामुळे आमिर व किरणने २०२१ मध्ये वेगळे होण्याचा निर्णय घेतला. काही दिवसांपूर्वी आमिरची मुलगी आयराच्या लग्नामध्ये एकत्र दिसले होते. आता पुन्हा एकदा दोघंही चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान एकत्र स्पॉट झालेले पाहायला मिळाले. त्यावेळी किरण आपल्या नात्याबद्दल आणि याचा मुलांवर काय परिणाम होईल याबद्दल दिलखुलासपणे व्यक्तही झाली.
किरण म्हणाली की, “आमच्या १२ वर्षाच्या मुलावर कोणताही वाईट परिणाम होऊ नये यासाठी आमिरने आमचा घटस्फोट खूप चांगल्या पद्धतीने हाताळला. घटस्फोटानंतर आम्ही एकमेकांशी चांगले संबंध ठेवले. तेव्हा आम्ही ठरवले होते की, आपल्याला वेगळे व्हायचे आहे आणि समाजाच्या नजरेमध्ये वेगळे व्हायचे आहे. विभक्त होण्याची घोषणा करताना आमचा मुलगा आझादला कोणताही धक्का बसणार नाही याची मात्र आम्ही काळजी घेतली होती”, असेही तिने सांगितले.
आणखी वाचा – अनन्या पांडे होणार मावशी, बहिणीने व्हिडीओ शेअर करत दिली गुडन्यूज
याबरोबरच आमिरनेही एकदा किरणबद्दलचा एक मजेशीर किस्सा सांगितला होता. तो म्हणाला की, “किरण व मी एकत्र बसलेले असताना तिला विचारले की, पती म्हणून माझ्यात काय कमी आहे? आणि मी माझ्यामध्ये कोणत्या सुधारणा करु शकतो ? त्यावर किरणने माझ्याबद्दल तब्बल १५-२० मुद्दे लिहून काढून माझ्या हातात दिले आणि म्हणाली हे सुधारा”, हा किस्सा सांगताना आमिर खूप हसत होता. किरण व आमिर हे नात्याने वेगळे झाले असले तरीही त्यांच्यामधील मैत्रीचे नाते हे सदाबहार आहे. याबरोबरच दोघेही व्यावसायिक क्षेत्रामध्ये एकत्रितपणे काम करत आहेत. सध्या किरण व आमिर त्यांच्या ‘लापता लेडीज’चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत.