मंगळवार, एप्रिल 21, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“आमच्या १२ वर्षांच्या मुलाला…”, आमिर खानबरोबर घटस्फोट घेण्यावरुन पुन्हा एकदा किरण रावचे भाष्य, म्हणाली, “समाजाच्या नजरेमध्ये…”

Majja Webdeskby Majja Webdesk
फेब्रुवारी 28, 2024 | 5:52 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
kiran rao on aamir khan

"आमच्या १२ वर्षांच्या मुलाला…", आमिर खानबरोबर घटस्फोट घेण्यावरुन पुन्हा एकदा किरण रावचे भाष्य, म्हणाली, "समाजाच्या नजरेमध्ये…"

अभिनेता आमिर खान व त्याची पत्नी किरण राव दोघेही त्यांच्या कौटुंबिक नात्यामुळे चर्चेत असतात. लग्नाच्या १६ वर्षानंतर दोघांनीही संगनमताने घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. मात्र विभक्त झाल्यानंतर दोघेही अनेक कार्यक्रमांमध्ये एकत्र हजेरी लावताना दिसले. नुकतेच दोघेही ‘लापता लेडीज’च्या प्रमोशनदरम्यान एकत्र पाहायला मिळाले. किरण सध्या या चित्रपटाची दिगदर्शिका म्हणून काम पाहत आहे. सुमारे ११ वर्षानंतर तिने चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा हाती घेतली. नुकतेच किरणने आपल्या खासगी व व्यावसायिक आयुष्यावर भाष्य केले आहे. (kiran rao on aamir khan)

काही अंतर्गत मतभेदामुळे आमिर व किरणने २०२१ मध्ये वेगळे होण्याचा निर्णय घेतला. काही दिवसांपूर्वी आमिरची मुलगी आयराच्या लग्नामध्ये एकत्र दिसले होते. आता पुन्हा एकदा दोघंही चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान एकत्र स्पॉट झालेले पाहायला मिळाले. त्यावेळी किरण आपल्या नात्याबद्दल आणि याचा मुलांवर काय परिणाम होईल याबद्दल दिलखुलासपणे व्यक्तही झाली.

आणखी वाचा – “मी लग्न केल्यापासून…”, नवऱ्याबरोबर घटस्फोट घेण्यावरुन नेहा कक्करचे पाहिल्यांदाच भाष्य, म्हणाली, “खूप वाईट वाटतं कारण…”

View this post on Instagram

A post shared by Jio Studios (@officialjiostudios)

किरण म्हणाली की, “आमच्या १२ वर्षाच्या मुलावर कोणताही वाईट परिणाम होऊ नये यासाठी आमिरने आमचा घटस्फोट खूप चांगल्या पद्धतीने हाताळला. घटस्फोटानंतर आम्ही एकमेकांशी चांगले संबंध ठेवले. तेव्हा आम्ही ठरवले होते की, आपल्याला वेगळे व्हायचे आहे आणि समाजाच्या नजरेमध्ये वेगळे व्हायचे आहे. विभक्त होण्याची घोषणा करताना आमचा मुलगा आझादला कोणताही धक्का बसणार नाही याची मात्र आम्ही काळजी घेतली होती”, असेही तिने सांगितले.

आणखी वाचा – अनन्या पांडे होणार मावशी, बहिणीने व्हिडीओ शेअर करत दिली गुडन्यूज

याबरोबरच आमिरनेही एकदा किरणबद्दलचा एक मजेशीर किस्सा सांगितला होता. तो म्हणाला की, “किरण व मी एकत्र बसलेले असताना तिला विचारले की, पती म्हणून माझ्यात काय कमी आहे? आणि मी माझ्यामध्ये कोणत्या सुधारणा करु शकतो ? त्यावर किरणने माझ्याबद्दल तब्बल १५-२० मुद्दे लिहून काढून माझ्या हातात दिले आणि म्हणाली हे सुधारा”, हा किस्सा सांगताना आमिर खूप हसत होता. किरण व आमिर हे नात्याने वेगळे झाले असले तरीही त्यांच्यामधील मैत्रीचे नाते हे सदाबहार आहे. याबरोबरच दोघेही व्यावसायिक क्षेत्रामध्ये एकत्रितपणे काम करत आहेत. सध्या किरण व आमिर त्यांच्या ‘लापता लेडीज’चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत.

Tags: aamir khan sonaazad khanamir khanfather son relationkiran rao
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

dipika kakar two new cysts
Entertainment

कॅन्सर सर्जरीनंतर दीपिका कक्करची तब्येत पुन्हा बिघडली, दुसऱ्यांदा झाला हा आजार, लेकाची वाटतेय काळजी

एप्रिल 20, 2026 | 3:46 pm
Atlee Baby Girl
Entertainment

सुप्रसिद्ध दिग्दर्शक दुसऱ्यांदा झाला बाबा, घरी आली चिमुकली परी, स्पेशल पोस्टद्वारे दिली गुडन्यूज

एप्रिल 20, 2026 | 12:34 pm
 Deepika Padukone pregnant
Entertainment

४० व्या वर्षी दुसऱ्यांदा आई होणार दीपिका पदुकोण, प्रेगन्सी किटद्वारे दिली गुडन्यूज, लेक दुवाचीही दिसली झलक

एप्रिल 20, 2026 | 11:48 am
Deepali Sayed First Post After Bigg Boss Marathi 6
Entertainment

पाच लाखांची बॅग सोडली आणि…; एलिमिनेट झाल्यानंतर दिपाली सय्यदची पहिली पोस्ट, म्हणाली, “माझ्यासाठी…”

एप्रिल 20, 2026 | 11:29 am
Next Post
Mahesh kale congratulate to his wife purva gujar because of she did her Phd in Music Technology see the details

अभिमानास्पद! महेश काळे यांच्या पत्नीची ‘ऑस्कर’पर्यंत झेप, पोस्ट शेअर करत म्हणाले “जिद्द, मेहनत अन्...”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.